AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालघरमधील आदिवासी कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही; प्रविण दरेकरांचे आश्वासन

पालघर : जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील आसे येथील आत्महत्याग्रस्त वेठबिगारी, आदिवासी शेतमजूर काळू पवार यांच्या कुटुंबियांची विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज सांत्वनपर भेट घेतली.

पालघरमधील आदिवासी कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही; प्रविण दरेकरांचे आश्वासन
pravin darekar
| Edited By: | Updated on: Aug 22, 2021 | 11:24 PM
Share

पालघर : जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील आसे येथील आत्महत्याग्रस्त वेठबिगारी, आदिवासी शेतमजूर काळू पवार यांच्या कुटुंबियांची विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज सांत्वनपर भेट घेतली. ही घटना अतिशय गंभीर असून या आदिवासी कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. हा प्रश्न सुटेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. तसेच या आदिवासी कुटुंबाची घरकुल योजनेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा. त्यांच्या मुलांना आदिवासी आश्रम शाळेत दाखल करुन घ्या. खावटी योजनेचा लाभ या आदिवासी कुटुंबाला लवकर मिळवून द्या, अशा सूचना दरेकर यांना उपस्थित प्रांत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. (Until the tribal family in Palghar gets justice; we will not rest, says Pravin Darekar)

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आदिवासी कातकरी शेतमजुराचा वेठबिगारीच्या पाशात अडकून बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.पालघर जिल्हयातील मोखाडा या दुर्गम तालुक्यात एका मजुराला त्याच्या मुलाच्या कफनासाठी वेठबिगारी करण्याची वेळ ओढवली होती. काळू पवार असे या दुर्दैवी कातकरी शेतमजुराचे नाव आहे. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी या आदिवासी गावाला भेट दिली. या आदिवासी कुटुंबाला भाजपाच्या वतीने तातडीची आर्थिक मदत देण्यात आली असून त्यांना अन्न-धान्यासह जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या आहेत. याप्रसंगी भाजप आमदार मनिषा चौधरी, जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, तालुकाध्यक्ष संतोष सोते यांच्यासह प्रांत अधिकारी पोलिस अधीक्षक उपस्थित होते.

याप्रसंगी माध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, आदिवासी पाड्यावरील घटना अतिशय विदारक आहे. ही घटना पाहून व या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर आपण अस्वस्थ झालो आहोत. मन खरंच सुन्न झाले. कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी ही घटना आहे. घटना घडल्यानंतर 20 दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना ही घटना घडूनही 20 दिवस झाले तरी त्यांना माहित नाही. हे दुर्देवी आहे. पोलीस पाटीलांनीही या घटनेची माहिती दिली नाही. कुठल्या दबावाखाली येथील यंत्रणा काम करित आहे, याचा शोध घेतला पाहिजे. येथीला यंत्रणेचे हे सपशेल अपयश असल्याची टीका दरेकर यांनी केली.

…मग घरकुल व पंतप्रधान आवास योजनेचा काय फायदा?

सदर आदिवासी महिलेला अद्यापही घर मिळालेले नाही. घरकुल योजना व पंतप्रधान आवास योजनेमधूनही या आदिवासी महिलेला घर मिळत नसेल तर या योजनांचा काय फायदा? असा सवाल करतानाच दरेकर म्हणाले की, ठाणेपासून काही तासाच्या अंतरावरील आदिवासी गावातील हे विदारक चित्र पाहावयास मिळाले. या दुरावस्थेला येथील शासकीय यंत्रणा जबाबदार आहे. या आदिवासी महिलेप्रमाणे आज अनेक आदिवासी महिला घरकुल योजनेपासून वंचित राहिल्या आहेत, असं दरेकर म्हणाले.

कफनाच्या 500 रुपयांसाठी गडी म्हणून ठेवलं

दरेकर म्हणाले की, या आदिवासींसाठी काम करण्याची आवश्यकता आहे. त्या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहितीही कोणत्याही यंत्रणेने घेतलेली दिसत नाही. कफनासाठी 500 रु मागितले. पण त्या आदिवासीला गडी म्हणून ठेवले व त्याने आत्महत्या केली हे गंभीर आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून हा विषय नक्कीच धसास लावल्याशिवाय राहणार नाही, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

आदिवासी कुटुंबाची घरकुल योजनेची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना

निष्पाप आदिवासी व कातकरी बांधवांवर अन्याय होत असेल तर हे गंभीर आहे. सरकार म्हणून यांना न्याय मिळाला पाहिजे. प्रांत अधिकारी यांना सूचना देऊन त्या आदिवासी कुटुंबाची घरकुल योजनेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा. त्यांच्या मुलांना आदिवासी आश्रम शाळेत दाखल करुन घ्या. खावटी योजनेचा लाभ या आदिवासी कुटुंबाला लवकर मिळवून देण्याच्या सूचना उपस्थित शासकीय यंत्रणेला दरेकर यांनी दिल्या.

इतर बातम्या

राज ठाकरे माझ्यासाठी पाऊण तास उन्हात थांबले, पण उद्धव आले नाहीत; ‘तो’ किस्सा सांगताना आशिष शेलार भावूक

नारायण राणे म्हणाले, एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले; आता विनायक राऊत म्हणतात, राणेंना ठोकम ठोकीची सवयच

Video: मिलिंद नार्वेकरांच्या दापोलीतल्या ‘त्या’ बंगल्यावर अखेर जेसीबी, सोमय्या म्हणतात, करुन दाखवलं, पुढचा नंबर कुणाचा?

(Until the tribal family in Palghar gets justice; we will not rest, says Pravin Darekar)

अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.