AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | साहित्य संमेलनाची डिजीटल कात; चक्क घरात बसून पाहता येणार, कसे घ्या जाणून…!

कोरोनाचा नवा विषाणू सापडलाय. त्यामुळे अनेकांनी नाशिकला यायचा बेत रद्द केला असेल. मात्र, निराश होऊ नका. तुम्हाला चक्क घरात बसून या संमेलनाचा आस्वाद घेता येणार आहे.

Nashik | साहित्य संमेलनाची डिजीटल कात; चक्क घरात बसून पाहता येणार, कसे घ्या जाणून...!
नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाचा लोगो.
| Edited By: | Updated on: Nov 29, 2021 | 8:02 AM
Share

नाशिकः नाशिकमधील साहित्य संमेलन चांगलेच चर्चेत आहे. थेट राजकीय व्यक्ती व्यासपीठावर असाव्यात का येथपासून ते नेमाडे साहित्य संमेलनाकडे फिरकतही नाहीत. संमेलनाचे स्वरूप फक्त उत्सवी झाले आहे, या ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या टीकेपर्यंत. मात्र, गंभीर साहित्य, खोल साहित्य हे अनेकांना माहिती नसते. काही जणांना रोजीरोटीकडे लक्ष देताना असा छंद जोपासणे शक्यही नसते. त्यामुळेच साहित्य संमेलन म्हटले की गर्दी होतेच. मात्र, नुकताच कोरोनाचा नवा विषाणू सापडलाय. त्यामुळे अनेकांनी नाशिकला यायचा बेत रद्द केला असेल. मात्र, निराश होऊ नका. तुम्हाला चक्क घरात बसून या संमेलनाचा आस्वाद घेता येणार आहे.

डिजीटल प्रयोग

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणाऱ्या एकाही कार्यक्रमांपासून साहित्य रसिक वंचित राहू नये यासाठी संमेलनाची सोशल मीडिया-डिजीटल मार्केटींग समिती संपूर्ण संमेलन रसिकांपर्यंत घेवून जाणार आहे. या संमेलनातील सर्व कार्यक्रम जसे ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, कविकट्टा, कविसंमेलन, विविध विषयांवरील परिसंवाद , बालसाहित्य मेळावा, आणि संस्कृतिक कार्यक्रम संमेलनाच्या अधिकृत सोशल मीडिया पेज , युट्यूब चॅनल आणि वेबसाईट वर लाईव्ह बघायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे संमेलनात आलेल्या रसिकांशी आणि निमंत्रितांशी आयोजक लाईव्ह गप्पा मारणार आहोत. यामुळे रसिकांना घरी बसून सुद्धा संमेलनाचा आस्वाद घेता येईल.

सोशल मीडिया पेजेस

संमेलनाची कार्यक्रम पत्रिका, संमेलन स्थळी येण्या-जाण्याची सोय व इतर तपशीलासाठी रसिकांनी संमेलनाची अधिकृत सोशल मीडिया पेजेस फॉलो करावीत, असे आवाहन सोशल मीडिया- डिजीटल मार्केटींग समितीचे प्रमुख हेमंत बेळे , पालक पदाधिकारी फणिंद्र मंडलिक आणि समिती सदस्य मिथिलेश मांडवगणे, आदित्य नाखरे, नितीन बिल्दीकर, सुमित गोखले, राहुल रायकर, अभिजित अष्टेकर, सचिन काठे, अमोल जोशी व रूचिता ठाकूर यांनी केले आहे. संमेलनाची अधिकृत सोशल मीडिया पेजेस अशी आहेत…

https://www.facebook.com/94abmssnsk/ https://www.youtube.com/channel/UCu_6zl1AaMGCRbo3ujLj4nw https://www.youtube.com/channel/ 94abmssnsk https://twitter.com/94abmssnsk https://www.instagram.com/94abmssnsk/ Website : https://www.94abmssnsk.com

पालवांची अक्षरमाला

अच्युत पालव, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुलेखनकार.

साहित्य संमेलनात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुलेखनकार अच्युत पालव यांचा ‘ऐसी अक्षरे’ हा सुलेखनावर आधारित प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम शनिवार 4 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अच्युत पालव संत ज्ञानेश्वर आणि संत रामदास यांनी रचलेल्या काही निवडक शब्द रचना घेऊन कॅनव्हासवर काम करणार आहेत. हे चालू असताना प्रसिद्ध गायिका मेघना देसाई गाणार आहेत. 6 फूट बाय 4 फुटाचे चार कॅनव्हास अच्युत पालव साकार करणार आहेत. गायन आणि सुलेखन अशी वेगळी मेजवानी साहित्य प्रेमींना ऐकायला आणि पाहायला मिळणार आहे. मध्यवर्ती हिरवळीवर हा कार्यक्रम होणार आहे.

इतर बातम्याः

महाविकास आघाडी सरकारला 2 वर्षे झाली, पण अनेकांना डायजेस्ट होत नाही; भुजबळांचा विरोधकांना टोला, मुख्यमंत्री बघेलांचा समता पुरस्काराने गौरव

नेमाडे साहित्य संमेलनाकडे फिरकतही नाहीत; अध्यक्षपद कसे मिळते याची सगळ्यांना कल्पना, पठारे यांचे खडेबोल

नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.