देशभरातील बुद्ध विहारांचे संघटन सुरू; नाशिकमध्ये पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनात विविध ठराव संमत

देशभरातील बुद्ध विहारांच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाला नाशिकमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातील मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी विविध ठराव संमत करण्यात आले.

देशभरातील बुद्ध विहारांचे संघटन सुरू; नाशिकमध्ये पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनात विविध ठराव संमत
नाशिकमध्ये देशभरातील बुद्ध विहारांच्या राष्ट्रीय अधिवेशनाला मान्यवरांनी हजेरी लावली.
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 3:24 PM

नाशिकः देशभरातील बुद्ध विहारांच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाला नाशिकमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातील मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी विविध ठराव संमत करण्यात आले.

बौद्ध धम्म आणि आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक सुधीरराज सिंह यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन झाले. यावेळी अध्यक्ष म्हणून भिक्खू विनय बोधप्रिय, भदन्त शीलरक्षित महास्थवीर, भिक्खू कौंदिण्य, भिक्खू अश्वजित, सेवानिवृत्त न्यायाधीशळ अनिरुद्ध फुलमाळी उपस्थित होते. अधिवेशनाचे अध्यक्ष भदन्त विनय बोधीप्रिय म्हणाले की, बौद्ध संस्कृती धारण केल्याशिवय धम्म आत्मसात होत नाही. ही जगातील सर्वात प्राचीन आणि समृद्धी संस्कृती आहे. या संस्कृतीपासून बुद्ध विहार संस्कार केंद्राची सुरुवात झाली. काळानुरूप त्यात बदल झाला. मात्र, बौद्ध संस्कृती रुजविण्यासाठी तिचा वेलू गगनावरी नेण्यासाठी आपल्याला बुद्ध विहार संस्कृतीचे केंद्र करण्याची गरजय. हे बुद्ध विहार संघटित करण्यासाठी बुद्ध विहार समन्वय समिती चांगले काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

भदन्त विनय बोधीप्रिय पुढे म्हणाले की, बुद्ध विहारे ही बुद्ध धम्माची प्रमुख केंद्रे आहेत. मात्र, अनेक ठिकाणी त्यांची परिपूर्णता होत नसल्याचे दिसते. त्यामुळे विहारांचे देशभर एकच स्वरूप असावे. त्यासाठी 2014 पासून भारतातील सर्व विहारांना एकत्र आणून समन्वय साधण्याचे काम सुरू आहे. मात्र, आदर्श बुद्ध विहारांची निर्मिती कशी होणार यावर प्रमुख विचार होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी सुधीरराज सिंह म्हणाले की, मनुवाद्यांशी लढण्यासाठी संघटन नव्हे, तर संघाची गरज आहे. ते आपल्याला वारशाने मिळाले आहे. ते आत्मसात करण्यासाठी देशातील बुद्ध विहारांना जोडण्याचे काम सुरू आहे. यातून केवळ विहारांची नावे जोडली जाणार नाहीत, तर लोकांना एकसंघतेसाठी जोडले जाणार आहे. त्यामुळे कोणीही आम्हाला हरवू शकणार नाही, असा दावा त्यांनी केला.

अधिवेशनातील ठराव

युवावर्गाला धम्म चळवळीत सहभागी करून घेणे, मुलांना धम्म दीक्षा देणे, बौद्ध तत्वज्ञान आणि आंबेडकरवादाचा प्रचार आणि प्रसार करणे, पाली भाषेचे संवर्धन करणे. त्यासाठी संस्था निर्मिती आणि अभ्यासकांचा समूह बनवणे. दैनंदिन जीवनातील देव-देवतांचे महत्त्व कमी करणे, धार्मिक विधी संस्कारात एकसूत्रता आणणे, भिक्खू आणि उपासक-उपासिकांमध्ये समन्वय निर्माण करणे आदी ठराव यावेळी मांडण्यात आले. (The first national convention of Buddha Viharas in the country was held in Nashik)

इतर बातम्याः

मतदार यादीमधील नाव नोंदणी, दुरूस्तीसाठी नाशिक जिल्ह्यात विशेष शिबिर अन् ग्रामसभेचे आयोजन

अजित पवारांच्या मामांसह त्यांच्या अवतीभोवती असलेल्यांची चौकशी होणार, 4 दिवसांत 4 ठिकाणी प्रकरणं बाहेर येणार; सोमय्यांच्या दाव्यांचा चौकार

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.