Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 22 ते 28 डिसेंबर दरम्यान मुंबईत, विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज एक आठवड्याचे निश्चित करण्यात आले आहे. पुढील कामकाजासंदर्भात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक दि. 24 डिसेंबर 2021 रोजी घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 22 ते 28 डिसेंबर दरम्यान मुंबईत, विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
विधिमंडळ
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 2:55 PM

मुंबई : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. 22 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2021 दरम्यान मुंबईत होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज एक आठवड्याचे निश्चित करण्यात आले आहे. पुढील कामकाजासंदर्भात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक दि. 24 डिसेंबर 2021 रोजी घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

विधानभवनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री ॲड्. अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

दर आठवड्याला होणार चाचणी

अधिवेशन कालावधीत लसीकरण पूर्ण म्हणजे ‌कोविड-19प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्यांनाच प्रवेश तसेच आरटीपीसीआर चाचणी देखील अनिवार्य करण्यात आले आहे. दर आठवड्याला ही चाचणी होणार आहे. मंत्री, राज्यमंत्री यांच्या सोबत केवळ एकाच अधिकाऱ्याला प्रवेश दिला जाणार असून विधानमंडळ सदस्यांचे स्वीय, सहायक, वाहनचालकांसाठी विधान भवनाच्या बाहेरील प्रांगणात स्वतंत्र व्यवस्था राहणार आहे. या काळात खासगी व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. या बैठकीत कामकाजाचा दिनक्रम, लक्षवेधी, प्रश्नोत्तरे आदींबाबत चर्चा झाली.

VIDEO: हिवाळी अधिवेशन फक्त 5 दिवसांचं, मार्चमध्ये नागपुरला विशेष अधिवेशन?

Devendra Fadnavis : ‘आम्ही पाडणार नाही, हे महाविकास आघाडी सरकार अंतर्विरोधानेच पडेल’, देवेंद्र फडणवीसांचा दावा

वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.