… तर लॉकडाऊनचा निर्णय घ्यावाच लागेल; छगन भुजबळांचा इशारा

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. (then maharashtra government can be imposes lockdown says chhagan bhujbal)

... तर लॉकडाऊनचा निर्णय घ्यावाच लागेल; छगन भुजबळांचा इशारा
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 1:47 PM

नाशिक: वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शासनाला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराच छगन भुजबळ यांनी दिला आहे. (then maharashtra government can be imposes lockdown says chhagan bhujbal)

शिवजयंती कार्यक्रमानिमित्ताने छगन भुजबळ यांनी आज नाशिक शहरातील विविध कार्यक्रमांना भेटी दिल्या. यावेळी पंचवटी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्णय घेण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात आपण अद्याप निर्णय घेतलेला नाही. लॉकडाऊन करणे नागरिकांना आणि शासनाला देखील परवडणारे नाही. मात्र रुग्णसंख्या वाढत राहिली तर मात्र यावर पुनर्विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे. लॉकडाऊनचा निर्णय हा पूर्णपणे नागरिकांच्या हातात आहे. जर नागरिकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले. मास्क आणि सॅनिटायजरचा वापर नियमित केला तरच हे शक्य आहे. अन्यथा शासनाला याचा पुनर्विचार करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

साहित्य संमेलनात मास्क शिवाय प्रवेश नाही

नाशिकमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलनासाठी महिना भराचा कालावधी बाकी आहे. यासाठी काटेकोर पद्धतीने नियोजन करण्यात येत असून साहित्य संमेलनाच्या ठिकाणी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येईल. या कार्यक्रमस्थळी मास्क शिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच याठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येऊन गर्दी होणार नाही याचे काटेकोर नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार जयवंतराव जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, नगरसेवक गजानन शेलार, गुरुमित बग्गा, युवक अध्यक्ष आंबदास खैरे, नाशिक महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, पंचवटी शिवजयंतीचे अध्यक्ष मामा राजवाडे आदी उपस्थित होते.

लग्न समारंभावर निर्बंध

दरम्यान, कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात लग्नसोहळ्यांवर पुन्हा एकदा निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे आता लग्नाला फक्त 100 लोकच उपस्थित राहू शकणार आहेत. नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी हे आदेश जारी केले आहेत. तसेच आगामी काळात हे निर्बंध आणखी कठोर होऊ शकतात, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. याशिवाय, नाशिकमधील प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये पुन्हा फलक लावण्यासही सुरुवात झाली आहे. कोरोनाचा एखादा रुग्ण आढळून आल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी केली जाणार आहे. (then maharashtra government can be imposes lockdown says chhagan bhujbal)

संबंधित बातम्या:

कोरोनाचा धोका वाढल्याने नाशिक प्रशासनाचा मोठा निर्णय; लग्न सोहळ्यांवर पुन्हा निर्बंध

नाशिक महापालिका निवडणुकीचे पडघम, भाजपकडून उद्घाटनांचा धडाका, शिवसेनेचा आक्षेप

Chandrakant Patil | शिवजयंतीवर निर्बध का ? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सवाल

(then maharashtra government can be imposes lockdown says chhagan bhujbal)

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.