भीषण अपघात ! इगतपुरीत पुलाचा कथडा तोडून पिकअप थेट रेल्वे रुळावर, तर चंद्रपुरात वऱ्हाडाची बस थेट नाल्यात

राज्यात काल तीन ठिकाणी विचित्र अपघात झाला. इगतपुरी, चंद्रपूर आणि पिंपरी चिंचवड येथे हा अपघात झाला. या तिन्ही अपघातात एकजण ठार झाला आहे. तर एकूण 28 प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भीषण अपघात ! इगतपुरीत पुलाचा कथडा तोडून पिकअप थेट रेल्वे रुळावर, तर चंद्रपुरात वऱ्हाडाची बस थेट नाल्यात
accidentImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 7:50 AM

निलेश दहाट, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, इगतपुरी : राज्यात काल तीन विचित्र अपघात झाले. इगतपुरी येथे बोरटेंभे शिवारात रेल्वे पुलावरून एक पिकअप पुलाचा कथडा तोडून थेट रेल्वे रुळावर आली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, दोनजण जखमी झाले आहेत. तर चंद्रपूर जिल्ह्यात वऱ्हाडाची बस थेट नाल्यात कोसळली. या अपघातात एक ठार झाला आहे. तर 24 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातातील सहाजण गंभीर आहेत. तसेच पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे गुरव येथे बीआरटी मार्गावर पीएमपीएल बसचा आणि खासगी चारचाकी कारचा समोरासमोर अपघात झाला आहे. यात दोन जण जखमी झाले आहेत.

इगतपुरी येथे मुंबई-आग्रा महामार्गावरील बोरटेंभे शिवारात रेल्वे पुलावरून एक पिकअप पुलाचा कथडा तोडून थेट रेल्वे ट्रॅकवर आली. या विचित्र अपघातात दोनजण जखमी झाले आहेत. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुदैवाने यावेळी भुसावळ-इगतपुरी मेमो गाडी येत असल्याने येथे हजर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याने या रेल्वेला लाल झेंडा दाखवत थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ आणि जीवित हानी टळली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्त पिकअप रेल्वे रुळावरून तात्काळ बाजूला केली. यामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर कुठल्याही प्रकारचा परिणाम झाला नाही.

हे सुद्धा वाचा

वऱ्हाडाची बस कोसळली

चंद्रपूर जिल्ह्यातही काल भीषण अपघात झाला. वऱ्हाडाची बस उलटून झालेल्या भीषण अपघातात एक प्रवासी ठार झाला आहे. बसमध्ये होते सुमारे 50 प्रवासी प्रवास करत होते. त्यात 24 प्रवासी जखमी झाले तर 6 प्रवासी गंभीर जखमी आहेत. या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजुरा येथून विवाह आटोपून नांदगाव येथे परत जात असताना हा अपघात झाला. किन्ही गावाजवळच्या वळणावर वेगात असलेली बस नाल्यात उलटली. त्यामुळे एकजण ठार झाला. रात्री झालेल्या अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. चंद्रपूर- बल्लारपूर- कोठारी- पोंभुर्णा पोलीस ठाण्याच्या पथकांनी घटनास्थळी पोचत मदतकार्यात सहभाग घेतला

चिंचवडमध्ये दोन जखमी

दरम्यान, पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे गुरव येथे बीआरटी मार्गात पीएमपीएल बसचा आणि खासगी चारचाकी कारचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात बससह चारचाकी वाहनांच मोठं नुकसान झालं आहे. पिंपळे सौदागरवरून भोसरीच्या दिशेने जाणाऱ्या बसचा पिंपळे गुरवच्या सुदर्शन चौकात बीआरटी मार्गात अपघात झाला. या अपघातात दोन व्यक्ती जखमी झाले असून त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याच बीआरटी मार्गात अनेकदा दुचाकीसह इतर वाहनांचा देखील अपघात झाल्याचं वारंवार पुढे आलेलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.