टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालय आणि नायर रुग्णालयाला 100 वर्षे पूर्ण, मुख्यमंत्र्यांकडून 100 कोटीची घोषणा

नायर रुग्णालयाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 100 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केलीय. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाकडून एक अपेक्षाही व्यक्त केलीय. यावेळी बोलताना कोरोना संकटाच्या काळात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानले आहेत.

टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालय आणि नायर रुग्णालयाला 100 वर्षे पूर्ण,  मुख्यमंत्र्यांकडून 100 कोटीची घोषणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Sep 04, 2021 | 3:23 PM

मुंबई : नायर रुग्णालयाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली. नायर रुग्णालयाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 100 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केलीय. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाकडून एक अपेक्षाही व्यक्त केलीय. यावेळी बोलताना कोरोना संकटाच्या काळात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानले आहेत. (Uddhav Thackeray announces Rs 100 crore fund to Topiwala Medical College and Nair Hospital)

नायर रुग्णालयासाठी 100 कोटीची घोषणा

संस्था शंभर वर्षाची किंवा बिल्डिंग शंभर वर्षाची असं नाही. हि निर्जीव इमारत नाही तर या सर्वांनी जीव ओतून ती सजीव केलेली इमारत आहे. मग एकदा या वास्तूत जान आली की मग कसलाही पेशंट असला तरी तो बरा झालाच म्हणून समजा ही माझी धारणा, माझी भावना आहे. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही काळानुसार आधुनिकतेकडे जात आहात. महापालिकेकडून तर निधी येत असेलच, सरकारकडूनही निधी येत असेल. पण आज 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं महापालिका आणि सरकारच्या वतीनं, अर्थात दोन्ही खिसे सध्या तरी माझेच आहेत. म्हणून मी आज दोन्ही खिशात हात घालून 100 कोटी रुपयांचा निधी या संस्थेसाठी जाहीर करतो.

‘असं काही करुन दाखवा की 100 वर्षानंतर उपयोगी पडेल’

यामागे माझी भावना आहे की, अनेक दानशूर व्यक्तींनी काय त्यावेळी त्यांची परिस्थिती असेल. तेव्हा 40 हजार सुद्धा काय त्याची किंमत होती. अगदी ही जमीन देण्यापासून, घेण्यापासून, इमारत उभी करण्यापासून, आजसुद्धा कोण कुठून, कुणाचा संबंध असेल वा नसेल दानशूर व्यक्ती दान करत आलेले आहात. म्हणून तुम्ही सर्वांना जीवदान देऊ शकता. मग सरकार म्हणून, महापालिका म्हणून आपल कर्तव्य तर आहेच. पण 100 वर्षानिमित्त असं काही तरी काम करुन दाखवा की पुढील 100 वर्षानंतर म्हटलं गेलं पाहिजे की त्यावेळी केलेलं काम आजही उपयोगी पडत आहे, अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे.

‘देव डॉक्टरांच्या रुपात आलेला आहे’

मी फक्त कौतुक करु शकतो. शुभेच्छा देऊ शकतो. अभिनंदन करु शकतो. मात्र या संस्थेचा प्रवास सांगणारी जी एक शॉर्टफिल्म दाखवली ती थक्क करणारी आहे. सुरुवात कशी झाली. एखादी गोष्ट टिकवणं खूप गरजेचं असतं. संस्थेने त्या प्रतिकूल काळात काम सुरु ठेवलं. पारतंत्र्याच 25 वर्षे, जिद्द काय असू शकतं हे त्याचं अप्रतिम उदाहण आहे. जिद्द असेल तर काही नसलं तर करता येऊ शकतं हे या संस्थेने दाखवलं आहे. ही संस्था निर्माण केल्यानंतर स्वत:चा जीव धोक्यात टाकून इतरांचा जीव वाचवण्याचं काम सर्व डॉक्टर्स आणि पारिचारिकांनी केलं. रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी गेली शंभर वर्ष अहोरात्र मेहनत केली. मी मागे म्हटलं होतं. मंदिरं बंद आहेत, प्रार्थना बंद आहेत. देव आहेत कुठे? देव केवळ मंदिरात किंवा प्रार्थनास्थळात न राहता डॉक्टरांच्या रुपात आलेला आहे. हा खरा देव आहे. जो आपला जीव वाचवतोय. हे हॉस्पिटलसुद्धा एखाद्या मंदिरासारखं. व्यथा घेऊन जसं मंदिरात जातो तसं कुणीतरी दुर्दर आजाराने त्रस्त होऊन अनेकजण इथे येतात. त्यांच्यापैकी बहुतेक जण बरे होऊन हसतखेळत जातात. त्यामुळे तुमच्या सर्वांना मी मानाचा मुजरा करतो.

इतर बातम्या :

हॉस्पिटल म्हणजे मंदिर, तर डॉक्टर म्हणजे देव, ‘नायर’च्या शतकसोहळ्यात उद्धव ठाकरेंकडून 100 कोटींची घोषणा

VIDEO: हजारो लोकांसमोर आयुष्यात पहिल्यांदाच भाषण दिलं, नंतर काय घडलं?; राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी

Uddhav Thackeray announces Rs 100 crore fund to Topiwala Medical College and Nair Hospital

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.