AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊन पूर्णपणे उठवलेला नाही, फक्त काही अटी शिथिल; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान

कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळणं अनिवार्य आहे. तसेच लॉकडाऊन पूर्णपणे उठवलेला नाही. (total lockdown not lifted in maharashtra says vijay wadettiwar)

लॉकडाऊन पूर्णपणे उठवलेला नाही, फक्त काही अटी शिथिल; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
विजय वडेट्टीवार, काँग्रेस
| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 10:34 AM
Share

नागपूर: कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळणं अनिवार्य आहे. तसेच लॉकडाऊन पूर्णपणे उठवलेला नाही. फक्त काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत, असं मोठं विधान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. (total lockdown not lifted in maharashtra says vijay wadettiwar)

विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. राज्यातील काही जिल्ह्यात अनलॅाकिंगला सुरुवात झाली आहे. पण पूर्णपणे अनलॅाक करण्यात आलेलं नाही. तर काही अटीच शिथिल केल्या आहेत. एकूण 43 युनिट तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी 18 युनिटलाच अनलॅाकिंगची परवानगी मिळाली आहे. अजून कोरोना संपलेला नाही. त्यामुळे पुन्हा कोरोना वाढल्यास जनता जबाबदार राहील. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळणं गरजेचं आहे. मास्क न घालता वावरल्यास कठोर कारवाई होईल, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे.

वडेट्टीवार काय म्हणाले?

लॅाकडाऊन पूर्णपणे उठवण्यात आलेला नाही, काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. कोरोना संपला नाही, कोरोनाचे नियम पाळणं अनिवार्य आहे. मास्क न घातल्यास होणार कठोर कारवाई

अनलॉकचे पाच टप्पे नेमके कसे आहेत?

पहिली लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.

दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.

तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील

चौथी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांवर व्यापलेले असतील तर

पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्यांवर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील

कोणत्या टप्प्यात किती जिल्हे

पहिल्या टप्प्यात 10 जिल्हे दुसर्‍या टप्प्यात 2 जिल्हे तिसरा 15 जिल्हे चौथ्या टप्प्यात 8 जिल्हे

पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे?

अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, यवतमाळ (total lockdown not lifted in maharashtra says vijay wadettiwar)

संबंधित बातम्या:

Pune Unlock: पुण्यातील निर्बंध उठणार, जाणून घ्या काय सुरु आणि काय बंद राहणार

Maharashtra Coronavirus LIVE Update : आजपासून पुणे अनलॉक, शहरातील पीएमपी बससेवा आजपासून 50 टक्के क्षमतेने सुरु

ठाण्यात ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी मोबाईल लसीकरण केंद्र; सोमवारपासून शुभारंभ

(total lockdown not lifted in maharashtra says vijay wadettiwar)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.