मंत्री भुजबळ म्हणतायत, काही व्यापारी भाजपला मानणारे; त्यामुळे त्यांचा बंदला विरोध

उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचारप्रकरणी महाविकास आघाडीने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदकडे मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघातील व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

मंत्री भुजबळ म्हणतायत, काही व्यापारी भाजपला मानणारे; त्यामुळे त्यांचा बंदला विरोध
छगन भुजबळ, मंत्री.
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 1:42 PM

नाशिकः काही व्यापारी आम्हाला मानणारे आहेत. काही व्यापारी भाजपला मानणारे आहेत. त्यामुळे भाजपला मानणाऱ्या व्यापाऱ्यांचा महाराष्ट्र बंदला विरोध असणारच. राज्यात महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद आहे, असा दावा सोमवारी मंत्री छगन भुजबळ यांनी केला.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचारप्रकरणी महाविकास आघाडीने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदकडे मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघातील व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. शहरातील अनेक दुकाने उघडी आहेत. त्यामुळे येवल्यात तरी व्यावसायिक आणि दुकानदारांनी या बंदला प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे. याबद्दल मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, उत्तर प्रदेशातल्या लखीमपूरमध्ये मंत्रिपुत्राने शेतकऱ्यांना चिरडून मारले. त्या घटनेचा निषेध म्हणून आणि आरोपीला शिक्षा व्हावी म्हणून या बंदचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, काही व्यापारी आम्हाला मानणारे आहेत. काही व्यापारी भाजपला मानणारे आहेत. त्यामुळे भाजपला मानणाऱ्या व्यापाऱ्यांचा महाराष्ट्र बंदला विरोध असणारच, असा दावा त्यांनी केला. भुजबळ म्हणाले, महाराष्ट्र बंदला विरोध करण्याच्या तुरळक घटना घडल्या असतील. मात्र, त्याचा बंदवर काहीही परिणाम झाला नाही. हा बंद शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आहे. आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. दर ठरवण्याची मोनोपली मोडून काढणे, शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे. कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या मुळावर असणारे आहेत. शेतकऱ्यांच्या हमीभाव आंदोलनाला यश मिळेल. लखीमपूर हिंसाचारात भाजप मंत्रिपुत्र असल्याने या आंदोलनाला भाजपचा विरोध असणाराच. यावर पंतप्रधान एक शब्दही बोलायला तयार नाहीत. मात्र, या संपामुळे शेतकऱ्यांची एकजूट होईल, असा दावा त्यांनी केला.

उद्योग आघाडीचा विरोध

महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला भाजपच्या उद्योग आघाडीने विरोध केला आहे. उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकर यांनी व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभागी होऊ नये असे आवाहन केले आहे. दुकान बंद करण्यास बळजबरी झाली तर त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग काढून गुन्हे दाखल करू, असा इशारा पेशकर यांनी दिला आहे. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने जरूर आंदोलन करावे. मात्र, आधीच कोरोनाने व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. त्यात सध्या सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे उद्योजक आणि व्यापाऱ्यांना दबावाखाली न ठेवता व्यापार सुरू ठेवावा, असे आवाहन पेशकार यांनी केले आहे.

शेतकरी संघटनाही दूर

लखीमपूर हिंसाचाराविरोधात पुकारलेल्या बंदला नाशिक जिल्ह्यात शेतकरी संघटनेनेही विरोध दर्शवला आहे. गेल्या सत्तर वर्षांपासून शेतकऱ्यांचा राजकीय सोयीसाठी वापर केला जात आहे. हे भांडण सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आहे. यात शेतकऱ्यांना सुळावर दिले जात आहे, असा आरोप शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष शंकरराव ढिकले यांनी केला आहे.

लखीमपूरमध्ये मंत्रिपुत्राने शेतकऱ्यांना चिरडून मारले. त्या घटनेचा निषेध म्हणून आणि आरोपीला शिक्षा व्हावी म्हणून या बंदचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, काही व्यापारी आम्हाला मानणारे आहेत. काही व्यापारी भाजपला मानणारे आहेत. त्यामुळे भाजपला मानणाऱ्या व्यापाऱ्यांचा महाराष्ट्र बंदला विरोध असणारच. हे प्रमाण तुरळक आहे. त्याचा बंदवर काहीही परिणाम झाला नाही. – छगन भुजबळ, मंत्री

इतर बातम्याः

नवरात्रोत्सवः नाशिक ते कोटमगाव जगदंबा माता मंदिरापर्यंत सायकल रॅली, 9 वर्षांपासून पर्यावरण संवर्धनाचे अथक प्रयत्न

नाशिकमध्ये अजूनही म्युकरमायकोसिसचे 23 रुग्ण; कोरोनाच्या 783 रुग्णांवर उपचार सुरू

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.