आदिवासी पारधी महासंघ काँग्रेस पक्षात विलीन, नाना पटोले म्हणतात आम्ही विकासासाठी कटिबद्ध !

टिळक भवन येथे आज (5 ऑक्टोबर) आदिवासी पारधी महासंघाचे काँग्रेस पक्षात विलिनीकरण करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच अन्य नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आदिवासी पारधी महासंघ काँग्रेस पक्षात विलीन, नाना पटोले म्हणतात आम्ही विकासासाठी कटिबद्ध !
CONGRESS PARADHI
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 8:37 PM

मुंबई : टिळक भवन येथे आज (5 ऑक्टोबर) आदिवासी पारधी महासंघाचे काँग्रेस पक्षात विलिनीकरण करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच अन्य नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी काँग्रेस पक्ष पारधी समाजच्या उत्थानासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

काँग्रेस शोषित समाज घटकांना न्याय देणारा पक्ष 

“पारधी समाजाकडे पाहण्याचा पूर्वापार दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. या समाजावर गुन्हेगारी समाज असा शिक्का मारला गेला आहे. ती ओळख बदलून त्यांना माणूस म्हणून जगता आले पाहिजे. काँग्रेस पक्ष हा वंचित, शोषित समाज घटकांना न्याय देणारा पक्ष आहे. राज्यातील आदिवासी पारधी समाजाच्या शिक्षण, रोजगार, राहण्याची सोय अशा सर्वांगिण विकासासाठी कट्टीबद्ध आहे,” असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करु

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, इंग्रजांच्या काळापासून पारधी समाजाकडे एक गुन्हेगारी समाज म्हणून बघितले जात असे. स्वातंत्र्यानंतर त्यात बदल होत आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु, डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह काँग्रेस सरकारने या समाजाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करुन घेण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. शासनाच्या योजनांमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आजही या समाजाचे काही प्रश्न, समस्या आहेत त्या मार्गी लावणे गरजेचे आहे. त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर एक बैठक आयोजित करुन शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करु.”

यावेळी आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब साळुंके, प्रदेश उपाध्यक्ष मुकेश साळुंके, समाधान साळुंके, रा. ना. सोनावणे, बन्सीलाल पवार, अनिल चव्हाण, संतोष पवार, बसोराम चव्हाण, सुरेश सोनावणे, सचिन साळुंके, सुकदेव डाबेराव, अशोक चव्हाण, अनिल माळे, सुधाकर पारधी हे पदाधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

पारधी समाजाच्या प्रतिनिधीला विधान परिषदेवर सदस्यत्व मिळावे

स्वतंत्र आदिवासी पारधी विकास मंडळाची स्थापना करणे, विधान परिषदेवर सदस्यत्व मिळावे, भूमिहिन बेघर आदिवासी पारधी समाजास शेत जमीन व घरकुल देऊन पुनर्वसन करावे. मुंबई, ठाण्यात फुटपाथ, सिग्नलवर, उड्डान पुलाखाली राहणाऱ्या आदिवासी पारधी समाजाचे ठाणे जिल्ह्यात राखीव क्षेत्रावर पुनर्वसन करावे. पारधी विकास आराखड्यासाठी पुरेसा निधी द्यावा, या मागण्यांचे निवेदन आप्पासाहेब साळुंके यांनी यावेळी नाना पटोले यांना दिले. या कार्यक्रमाला किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम पांडे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे नियोजन शारदा जगताप यांनी केले.

इतर बातम्या :

लखीमपूर हिंचाराचाला विरोधकांकडून ‘जालियनवाला बाग हत्यांकांडा’ची उपमा, आता भाजपकडून मावळ गोळीबाराची आठवण

‘पादचारी दिन’ साजरा करणारं पुणे देशातील पहिलं शहर ठरणार! महापौरांची घोषणा

खरंच की काय? त्या ड्रग्ज पार्टीत अक्षय कुमारचा मुलगाही होता? ट्विंकल खन्नाच्याच ‘त्या’ फोटोची चर्चा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.