आश्चर्यच, ज्या आरोपीला पोलीस शोधताय, त्या आरोपीचा मंदिराच्या शासकीय समितीत समावेश

tuljabhavani mandir | तुळजाभवानी मंदिरातील पुरातन दागिने, सोने चांदी अलंकार चोरी प्रकरणी नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर चिलोजी बुवा फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. परंतु आता त्यांना शासकीय समितीत घेतले आहे.

आश्चर्यच,  ज्या आरोपीला पोलीस शोधताय, त्या आरोपीचा मंदिराच्या शासकीय समितीत समावेश
Follow us
| Updated on: Dec 23, 2023 | 8:08 AM

संतोष जाधव, धारशिव, दि.23 डिसेंबर | तुळजाभवानी देवीचे प्राचीन मौल्यवान दागिने चोरी प्रकरणात पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये महंत चिलोजीबुवा यांचाही समावेश आहे. या दागिने चोरी प्रकरणातील आरोपी चिलोजीबुवा फरार आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. परंतु त्यांचा शासकीय समितीत समावेश करण्यात आला आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून हा अजब निर्णय घेतल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. फरार महंत चिलोजीबुवा यांचा शासकीय समितीत समावेश कसा केला? हा प्रश्न सर्व सुज्ञ नागरिकांना पडला आहे. तुळजाभवनी मंदिरातील काही अलंकार नवे ठेवले आणि शेकडो वर्षे जुना असलेला दागिना गायब करण्यात आले आहे.

कोणत्या समितीत नियुक्ती

तुळजाभवानी देवी मंदिरात पुजारी यांच्या प्रवेशासाठी बायोमेट्रिक प्रणाली तयारी करण्यासाठी नियमावली बनवण्यात येणार आहे. ही नियमावली बनवण्यासाठी 11 जणांची शासकीय समिती करण्यात आली. या अकरा जणांच्या शासकीय समितीत एक सदस्य फरार आरोपी चिलोजी बुवा आहेत. चिलोजी बुवा यांच्यावर तुळजाभवानी मंदिरातील पुरातन दागिने, सोने चांदी अलंकार चोरी प्रकरणी नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर चिलोजी बुवा फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. परंतु आता त्यांना शासकीय समितीत घेतले आहे. या समितीत इतर मठाचे महंत यांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

कोणावर झाला होता गुन्हा दाखल

तुळजाभवनी मंदिरातील दागिने चोरी प्रकरणात महंत हमरोजीबुवा, गुरु चिलोजी बुवा, महंत चिलोजी बुवा गुरु हमरोजी बुवा, महंत वाकोजीबुवा गुरु तुकोजी बुवा व महंत बजाजी बुवा गुरु वाकोजी बुवा यांच्यासह सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अंबादास भोसले, सेवेदार पलंगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी यासंदर्भात आदेश दिले होते. या प्रकरणी कलम 420, 406, 409, 381 व 34 आयपीसीनुसार तुळजापूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी SIT ची निर्मिती करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी उपअधीक्षक दर्जाचा अधिकाऱ्याची एसआयटी तयार केली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.