Maharashtra Breaking News LIVE 15 March 2025 : 15 दिवसांपासून वीज नसल्याने शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयात ठिय्या
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 15 मार्च 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES
-
तलावात बुडून पाच जणांचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील घोडाझरी तलावात बुडून पाच युवकांचा मृत झाला. मृतांची नावे जनक गावंडे , यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे, तेजस ठाकरे अशी आहेत.
-
रस्त्यांची कामे रात्री करणार
मुंबईतील वाढत्या तापमानामुळे आता रात्री रस्त्यांची कामे रात्री करण्यात येणार आहे. शहर, उपनगरांतील रस्ते काँक्रिटीकरणाची कामे येत्या तीन महिन्यांत अधिक गतीने राबविली जाणार आहे. सध्या दिवसापेक्षा रात्रीचे तापमान कमी असल्याने त्यावेळी ही कामे केली जात आहेत.
-
-
काँग्रेसचा औरंगजेबची कबर हटवण्यास विरोध
काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कबर हटवण्यास विरोध केला आहे. ते म्हणाले, औरंगजेबाची कबर म्हणजे विरत्वाची कबर नाही तर ती कबर क्रूर पणाची आहे. त्यामुळे ती कबर शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देखील आहे.
-
वीज नसल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन
घनसावंगी तालुक्यातील वडीगोद्री आणि आसपासच्या परिसरातील गावांमध्ये मागील 15 दिवसापासून वीज नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.डाव्या कालव्याला पाणी असतानाही वीज नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. परिणामी ऊस,टरबूज आणि फळबागा पाणी न दिल्यामुळे सुकू लागल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.
-
औरंगजेबच्या कबरीवरुन राज्यात वातावरण तापले
औरंगजेबच्या कबरीवरुन राज्यात वातावरण तापले आहे. आक्रमक पवित्रा पाहता सरकारने सुरक्षा वाढवली आहे. SRPF ची तुकडी कबरीचे संरक्षण करणार आहे.
-
-
बलुचिस्तानमध्ये 24 तासांत पाकिस्तानी सैन्याचा दुसऱ्यांदा हल्ला, अनेक सैनिक जखमी
बलुचिस्तानमध्ये 24 तासांत पाकिस्तानी सैन्यावर दुसऱ्यांदा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात अनेक सैनिक जखमी झाले आहेत. पाकिस्तानी सैन्यावर हा हल्ला केच जिल्ह्यात झाला.
-
कर्नाटकात काँग्रेस मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे – भाजप
कर्नाटकात काँग्रेस मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचे भाजपने म्हटले आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने निविदांमध्ये मुस्लिम कंत्राटदारांना 4 टक्के कोटा देण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे. जेव्हा जेव्हा काँग्रेसला संधी मिळते तेव्हा ते धर्म, भाषा आणि जातीच्या आधारावर लोकांना विभाजित करण्याचे घृणास्पद राजकारण करण्याचा घृणास्पद प्रयत्न करते.
-
-
पंजाबमधील फिरोजपूर येथील मध्यवर्ती कारागृहात शोध मोहीम
फिरोजपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शोध मोहीम राबविण्यात येत आहे. ड्रग्जविरुद्धच्या मोहिमेचा एक भाग म्हणून शोध मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती एसएसपी भूपिंदर सिंग यांनी दिली.
-
आसाम: अमित शाह यांच्या हस्ते बर्फुकन पोलिस अकादमीचे उद्घाटन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसाममधील बर्फुकन पोलिस अकादमीचे उद्घाटन केले.
-
पश्चिम रेल्वेच्या काही स्टेशनवर छत नाही, ऐन उन्हाळ्यात प्रवाशांचे हाल
पश्चिम रेल्वेच्या अनेक रेल्वे स्टेशनवरची कामे संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात प्लॅटफॉर्मवर छत नसल्याचे दिसत आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. छत बसवण्याच्या या कामांमुळे अनेक ठिकाणी गाडी पकडण्यासाठी प्रवाशांना अतिशय अरुंद जागेतून धावपळ करावी लागत आहे. पश्चिम रेल्वेच्या दहिसर, कांदिवली, माहीम, दादर, मुंबई सेंट्रल, लोअर परळ, ग्रँट रोड या स्थानकांवर गेले कित्येक महिने ही कामे सुरू आहेत
-
माथेरान येथील रेल्वे अधिकारी विश्राम गृहात हत्या
माथेरान येथे धक्कादायक घटना घडली आहे. नगरपालिका हद्दीमधील रेल्वे अधिकारी विश्राम गृहातील आऊट हाऊसमध्ये एका व्यक्तीची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. मोबाईलवरुन हाणामारी झाल्यानंतर ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
-
21 मार्चला होणार 72 बस गाड्यांचा लिलाव; एसटी महामंडळाचे सुरक्षिततेबाबत महत्त्वाचे पाऊल
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील धक्कादायक घटनेनंतर एसटी महामंडळाने सुरक्षिततेबाबत महत्त्वाचे पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत, दीर्घकाळापासून अडगळीत पडलेल्या आणि नादुरुस्त झालेल्या 72 बस गाड्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नादुरुस्त बसेसचा लिलाव 21 मार्च रोजी होणार असून, यामधून सुमारे 2.50 ते 3 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. महामंडळाच्या म्हणण्यानुसार, या लिलावातून मिळणाऱ्या निधीचा वापर इतर सुविधा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी केला जाणार आहे. 25 फेब्रुवारी रोजी स्वारगेट बस डेपोमध्ये एका तरुणीवर बसमध्ये बलात्कार झाल्याने राज्यभर खळबळ उडाली होती. या घटनेनंतर एसटी महामंडळाने बसस्थानकांवरील सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
आशिष विशाळ माझा कार्यकर्ता, पण पैसे घेतले असतील तर त्याच्या विरोधात कारवाई करा: सुरेश धस
देशमुख यांच्या नावाने खंडणी मागतो म्हणून मराठा तरुणांनी मारहाण केलेला आशिष विशाळ सहकारी असल्याचं आमदा सुरेश धस यांनी अखेर कबूल केलं आहे.तसेच आशिष विशाळ हा माझा कार्यकर्ता असला तरी मी ते पत्र दिले नाही. माझी सही करायला सोपी आहे म्हणून ती कोणीही करतं. पण ते पत्र मी दिले नाही.त्यामुळे त्याने जर खरंच पैसे घेतले असतील तर त्याच्यावर कारवाई करा” असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबासाठी मदत गोळा करण्याच्या नावाखाली काही दिवसांपूर्वी सुरेश धस यांचा पीए असल्याचे सांगून आशिष विशाळ नावाच्या व्यक्तीने धाराशिव शहरात खंडणी उकळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये मराठा तरुणांनी त्याला भर रस्त्यात चोप दिला होता. त
-
“परिस्थिती चिंताजनक….” शेतकरी आत्महत्येवर शरद पवार यांचे भाष्य
शेतकरी आत्महत्येवर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी शेतकरी आत्महत्येची गंभीरता लक्षात घेत म्हटलं आहे, “मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्हे, बीड, अमरावती बाबतची जी माहिती मिळते ती चिंताजनक आहे. आम्ही थोडी फार माहिती काढली. ठिकठिकाणची माहिती एकत्र करत आहोत. केंद्र सरकारने त्याबाबत धोरण आखावं. त्यांनी मदत करण्यासाठी नीती ठरवावी हा आग्रह धरणार आहोत. या कामात लक्ष घातलं जाईल” असं म्हणत शेतकरी आत्महत्येबाबत कठोर पाऊल उचलले जातील असा विश्वास त्यांनी शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
-
किल्ले शिवनेरीवर दीपोत्सव, हजारो दिव्यांनी उजळले शिवजन्मस्थळ
तिथी नुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेच्या वतीने शिव जन्मस्थळ असणाऱ्या किल्ले शिवनेरीवर दीपोत्सव साजरा करण्यात आला. दीपोत्सव साजरा करण्याचे संस्थेचे हे 23 वे वर्ष असून फाल्गुनी पौर्णिमेच्या रात्री साजरा करण्यात आलेल्या या दीपोत्सवातील हजारो पणत्यांनी शिव जन्मस्थळ किल्ले शिवनेरी उजळून निघाला.
-
नरभक्षक वाघाची दहशत
गडचिरोली जिल्ह्यात नरभक्षक वाघाची दहशत कायम आहे. दोन म्हशीवर हल्ला करून वाघाने त्यांना गंभीर जखमी केले आहे. सुरेश जकुलवार यांच्या मालकीचे म्हशी चरण्यासाठी जंगलात गेल्यावर वाघाने त्यावर हल्ला केला, म्हशींनी प्रतिकार केल्याने ते बचावले.
-
542 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द
जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील 542 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांनी ही कारवाई केली.
-
नाशिकमध्ये रिक्षा चालकांची गुंडगिरी
नाशिकमध्ये रिक्षा चालकांची गुंडगिरी दिसून आली आहे. अनधिकृत रिक्षा चालकांकडून सर्वसामान्यांवर सर्रास दादागिरी दिसून आली. शालिमार चौकात रिक्षा चालकांची झुंडशाही मोबाईल कॅमेरात कैद झाली आहे. गाडीचा कट लागण्याच निमित्त करून परिवारासह चाललेल्या इसमाला मारहाण करण्यात आली.
-
बँक कर्मचाऱ्यांची संपाची हाक
बँक कर्मचारी संघटनांनी 24 आणि 25 मार्च रोजी संपाची हाक दिली आहे. या काळात बँका चार दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.
-
एमआयएम नगरसेवकाचा कर्मचाऱ्यावर हल्ला
मालेगाव येथे एमआयएम नगरसेवकाने पालिका कर्मचाऱ्यावर हल्ला चढवला. याप्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
-
सतीश उर्फ खोक्या भोसलेचे वनविभागाच्या जागेवरील घर पडल्यानंतर वनविभाग ॲक्शन मोडवर
सतीश उर्फ खोक्या भोसलेने वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करून घर बांधले होते. पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी वनविभाग ॲक्शन मोडवर. वनविभागाच्या जागेवर चोहू बाजूने जेसीबीच्या साह्याने चर खोदून पुन्हा होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी प्रयत्न. सतीश उर्फ खोक्या भोसलेच घर असलेल्या परिसरात वनविभागाच्या वतीने मोहीम हाती घेण्यात आली आहे.
-
तालकटोरा स्टेडियममध्ये पुतळे बसवा
तालकटोरा स्टेडियममधे बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांचे अर्धाकृती पुतळे बसवण्याचा प्रस्ताव सरहद संस्थेने मांडला आहे. पण अनेक साहित्यिकांची मागणी आहे की पूर्ण आकाराचे घोडेस्वारी पुतळे उभारले जावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
-
निकामी झालेल्या एकूण 72 ‘शिवशाही’ आणि ‘शिवनेरी’ बस मोडीत काढणार
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणानंतर पुणे विभागीय एसटी महामंडळाला जाग आली आहे. जुन्या, मुदत संपलेल्या संपलेल्या आणि नादुरूस्त अशा 72 बसेस पुणे एसटी महामंडळ भंगारात विकणार आहेत. निकामी झालेल्या एकूण 72 ‘शिवशाही’ आणि ‘शिवनेरी’ बस मोडीत काढण्याचा पुणे एसटी विभागाचा निर्णय आहे.
-
बुलढाण्यातील राड्याप्रकरणी 36 जणांविरोधात गुन्हे दाखल, 22 जणांना अटक
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या आवार गावात होळीच्या दिवशी डीजे वर गाणे वाजवण्यावरून वाद होऊन दोन गटात तुफान हाणामारी आणि दगडफेक झाली होती होती. या प्रकरणी आता पोलिसांनी दोन्ही गटातील तब्बल 36 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. 22 जणांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे.
-
मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील जुना उर्से टोल नाक्यावर कारचा अपघात, 3 जखमी
मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील जुना उर्से टोल नाक्यावर मुंबईवरून पुण्याकडे येत असताना सकाळी सातच्या सुमारास खासगी कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने, कार जुन्या टोल नाक्याच्या दुभागाजकावर चढली. यात तीन जण जखमी झालेत. या कार मध्ये युगांडा देशातील परदेशी महिला नागरिक असून दोघी गंभीर जखमी झाल्या असून, चालक ही जखमी आहे.
-
मालेगावमध्ये MIMच्या माजी नगरसेवकाचा मनपा कर्मचाऱ्यावर हल्ला
मालेगावमध्ये MIMच्या माजी नगरसेवकाने मनपा कर्मचाऱ्यावर हल्ला केला. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोपीवर कठोर कारवाी करा अशी मागणी सकल हिंदू समाजाने केली आहे.
-
करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंविरोधात केलेल्या तक्रारीसंदर्भात आज परळी न्यायालयात सुनावणी
करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंविरोधात केलेल्या तक्रारीसंदर्भात आज परळी न्यायालयात सुनावणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान शपथपत्रामध्ये धनंजय मुंडे यांनी खोटी माहिती दिली असा आरोप करूणा शर्मा यांचा आरोप आहे.
-
चंद्रपूर :- उभ्या ट्रकला बसची धडक, एक ठार
नागपूरकडून चंद्रपूरकडे भरधाव वेगाने येत असलेल्या महामंडळाच्या बसने उभ्या ट्रकला दिलेल्या धडकेत एक ठार तर 13 प्रवासी जखमी झाले. त्यापैकी दोन जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात रात्री एकच्या सुमारास घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व जखमी प्रवाशांना रुग्णालयात हलवण्यात आले. या बसचा वाहक संदीप वनकर मृत झाला.
-
पुणे जिल्ह्यातील उष्णतेचा पारा चाळीशीपार
पुणे जिल्ह्यातील उष्णतेचा पारा चाळीशीपार, यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमान पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर मध्ये आहे.
राजगुरुनमध्ये 40°c तापमानाची नोंद झाली तर तर शहरातील कोरेगाव पार्क परिसरात देखील 40°c तापमान नोंदवण्यात आलं. पुणेकरांनो काळजी घ्या, असे आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबईमधील किमान तापमानात वाढ झाली असली तरी गेल्या एक – दोन दिवसांपासून कमाल तापमान स्थिर आहे. दरम्यान, मुंबईत पुढील काही दिवस उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज कायम आहे. पुणे जिल्ह्यातील उष्णतेचा पारा चाळीशीपार पोचला आहे. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमान पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर मध्ये असून राजगुरुनमध्ये 40°c तापमानाची नोंद करण्यात आली आहे. होळी आणि धुळीवंदनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी 776 वाहनांवर कारवाई केली. यामध्ये 274 ट्रिपल सीट, 413 हेल्मेट नसणे, तर 89 जनावर ड्रंक अँड ड्राईव्ह ची कारवाई झाली. संत तुकाराम बीज उत्सवाच्या निमित्ताने श्री क्षेत्र देहूगावात पुण्यासह राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. ही बाब लक्षात घेऊन पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील भाविकांच्या सोयीसाठी पीएमपीएमएलच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या काळात देहूगावासाठी जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. यासह देश-विदेश, राज्यातील, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील सर्व महत्वाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - Mar 15,2025 8:53 AM





