Maharashtra Breaking News LIVE 1 January 2025 : मुख्यमंत्र्यांसमोर 11 नक्षलींचं आत्मसमर्पण, गडचिरोलीत भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन

| Updated on: Jan 01, 2025 | 5:55 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 1 जानेवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 1 January 2025 : मुख्यमंत्र्यांसमोर 11 नक्षलींचं आत्मसमर्पण, गडचिरोलीत भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन
महत्वाची बातमीImage Credit source: tv9

LIVE NEWS & UPDATES

  • 01 Jan 2025 05:55 PM (IST)

    कोथरूडमध्ये तीन मंत्रिपदे असून सुद्धा गुन्हेगारी थांबेना

    कोथरूड भागातील सुतारदरा, जिजाऊनगर भागात 31 डिसेंबरच्या रात्री टोळक्याकडून हातात तलवारी घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. टोळक्याने चारचाकी, दुचाकी वाहन्नाची तोडफोड केली. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरलं आहे. पोलिसांचं रात्रीच्या घटनेकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप होत आहे. तसेच पोलिसांची गस्त फक्त नावाला असते असा आरोप नागरिकांनी केला आहे.

    ..

  • 01 Jan 2025 05:34 PM (IST)

    तहव्वूर रणा प्रत्यार्पण मंजुरीवर उज्ज्व निकम यांची प्रतिक्रिया, म्हणाले..

    तहव्वूर राणा यांची याचिका निकाली काढली आहे हे मी भारत सरकारच्या कूटनितिचे यश मानतो.  राणा याने 26/11 च्या हल्ल्यावेळी डेव्हिड हेली याला इमिग्रेशन सेंटर ओपन करण्यासाठी मदत केली होती.  राणाची याचिका फेटाळण्यात आल्यामुळे आता लवकरच भारतात पाठवण्यात येईल.  26/11 च्या आल्याच्या वेळी त्यांनी जे इतर कट केले होते त्या संदर्भात खटला हा भारतात चालवला जाईल. एवढा मोठा दहशतवादी अमेरिकेने भारताच्या हाती देणं, हे आपलं यश आहे हे मी मानतो.

  • 01 Jan 2025 05:21 PM (IST)

    भागवतांच्या वक्तव्याने प्रयाग राज येथील कुंभमेळ्यात साधू महंतांचे दोन गट

    मोहन भागवतांच्या वक्तव्याने प्रयागराज येथील कुंभमेळ्यात साधू महंतांचे दोन गट पडले आहेत.  प्रयागराज येथील कुंभमेळ्यात मोहन भागवतांच्या वक्तव्यावर चर्चा होणार आहे. प्रयागराज येथील कुंभमेळ्याचा धर्म संसद घेऊन मुद्दा मांडण्यात येणार आहे. महंत अनिकेत शास्त्री यांनी सांगितलं की, सरसंघचालकांना विरोध नाही , भारतात अशांतता निर्माण होऊ नये यामुळे हे वक्तव्य केलं असावं.

  • 01 Jan 2025 05:13 PM (IST)

    एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी आज वेस्टर्न एअर कमांडची कमान हाती घेतली

    एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी आज भारतीय हवाई दलाच्या वेस्टर्न एअर कमांडची सूत्रे हाती घेतली. एअर मार्शल मिश्रा, जे डिसेंबर 1986 मध्ये भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून दाखल झाले होते. ते राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे, एअर फोर्स टेस्ट पायलट स्कूल, बंगलोर, एअर कमांड अँड स्टाफ कॉलेज, यूएसए आणि रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीजचे माजी विद्यार्थी आहेत. एअर मार्शल मिश्रा यांना 3000 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. भारतीय हवाई दलाने ही माहिती दिली.

  • 01 Jan 2025 05:02 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांसमोर 11 नक्षलींचं आत्मसमर्पण, गडचिरोलीत भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन

    गडचिरोलीतून मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 11 नक्षलींनी आत्मसमर्पण केलं आहे. गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • 01 Jan 2025 04:43 PM (IST)

    ठाकरे गटाच्या स्थगित उर्वरित बैठका 7 जानेवारीपासून होणार

    विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर आता ठाकरे गट एकटीव्ह झाला आहे. ठाकरे गटाच्या स्थगित झालेल्या उर्वरित बैठका 7 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. 7, 8 आणि 9 जानेवारी रोजी उर्वरित बैठका पार पडणार आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेत आहेत.

    मुंबईतील निरीक्षकांची 21 डिसेंबर रोजी बैठक पार पडली होती. त्यानंतर आता पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येत आहे. विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर मुंबईत विधानसभा निहाय निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी वार्डनिहाय शाखाप्रमुख ते विभागप्रमुखांशी बातचीत केली होती. त्यानंतर या निरीक्षकांनी अहवाल उद्धव ठाकरे यांच्याकडे 21 तारखेच्या बैठकीत सादर केला होता. आगामी मुंबई महानगर पालिका ठाकरे गटाने स्वबळा लढावी असं पदाधिकाऱ्यांच म्हणणं आहे यासाठी उद्धव ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बातचीत करणार आहेत.

    या बैठकीसाठी विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश मातोश्रीवरुन देण्यात आले आहेत. या बैठकीत महानगरपालिकेच्या तयारीचा आढावा तसेच जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या शाखा भेटीचे आयोजन करण्यासंदर्भात देखील चर्चा करण्यात येणार आहे.

    मातोश्रीवर पदाधिकारी आढावा बैठक पार पडलेल्या विधानसभा

    26 डिसेंबर – बोरिवली विधानसभा , दहिसर विधानसभा , मागाठाणे विधानसभा, दिंडोशी, चारकोप, कांदिवली आणि मालाड विधानसभा

    27 डिसेंबर -अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, चांदिवली

    नवीन वर्षात मातोश्रीवर होणाऱ्या बैठका

    7 जानेवारी

    घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, शिवाजीनगर मानखुर्द आणि कलिना

    अनुशक्तीनगर, चेंबूर आणि सायन कोळीवाडा

    8 जानेवारी

    मुलुंड, विक्रोळी, भांडुप, कुर्ला, धारावी, वडाळा आणि माहीम.

    9 जानेवारी

    वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी आणि कुलाबा.

  • 01 Jan 2025 04:28 PM (IST)

    जळगावच्या पाळधीमध्ये तासाभरासाठी संचारबंदी शिथील

    जळगावमधून मोठी बातमी समोर आली आहे. पाळधीमध्ये तासाभरासाठी संचारबंदी शिथील करण्यात आली आहे. पाळधीमध्ये 4 ते 5 या एका तासासाठी ही संचारबंदी शिथील करण्यात आली आहे. मंगळवारी 2 गटात वाद झाला होता. त्यामुळे पाळधी गावात संचारबंदी करण्यात आली होती.

  • 01 Jan 2025 04:12 PM (IST)

    31st च्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई, बनावट दारूच्या बाटल्यांसह 2 आरोपी ताब्यात

    नवी मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. 31st च्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी बनावट दारूच्या बाटल्यांसह दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी ब्रँडेड बॉटलमध्ये बनावट दारू कमी किंमतीमध्ये विक्री करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी 7 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंबई येथून अनेक ठिकाणी बनावट दारूची तस्करी करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहेत.

  • 01 Jan 2025 03:57 PM (IST)

    विनोद कांबळी यांना डिस्चार्ज

    माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे यांना रुग्णालयातील उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आले. भिवंडीतील आकृती हॉस्पिटल या ठिकाणी मागील दहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

  • 01 Jan 2025 03:49 PM (IST)

    पुण्यातून ठाकरे गटला धक्का

    पुण्यात ठाकरे गटाला नवीन वर्षात धक्क्यांची मालिका सुरु आहे. माजी नगरसेवक विशाल धनवडे यांच्यानंतर माजी नगरसेवक बाळा ओसवाल यांनी देखील ठाकरे गटाला रामराम केला आहे. शिवसेनेतील कार्यपद्धतीवर नाराज होत ओसवाल यांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे.

  • 01 Jan 2025 03:34 PM (IST)

    रेडा शाळेत घुसला, विद्यार्थ्यांना धडक, १५ जण जखमी

    छत्रपती संभाजीनगर शहरातील भडकल गेट येथे असलेल्या मॉर्डन स्कूलमध्ये बेधुंद झालेला रेड्याने एका खाजगी शाळेत घुसला. यावेळी शाळेच्या मैदानात खेळत असलेल्या विद्यार्थ्यांना रेड्याने धडक दिली. यात तब्बल 15 विद्यार्थी जखमी झाले आहेत.

  • 01 Jan 2025 03:17 PM (IST)

    मंत्रालयात जाणाऱ्यांची नोंद स्कॅनरने

    राज्याचा कारभार जिथून चालतो त्या मंत्रालयात सुरक्षा अधिक कठोर करण्यात आली आहे. मंत्रालयात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पावले उचलण्यात आलेली आहेत. मंत्रालयाच्या मुख्य प्रवेश द्वारावर स्कॅनर लावण्यात आले आहे. प्रत्येक व्यक्तीची नोंद स्कॅनरमध्ये होणार आहे.

  • 01 Jan 2025 03:03 PM (IST)

    मुख्यमंत्री गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदशील केंद्रावर

    गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदशील नक्षलग्रस्त भाग असलेल्या पेनगुंडा पोलीस मदत केंद्रावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. या ठिकाणी नवीन तयार केलेल्या पोलीस मदत केंद्राची पाहणी त्यांनी केली.

  • 01 Jan 2025 02:59 PM (IST)

    पीडित मुलीच्या वडीलांचे मोठे आवाहन

    कल्याण येथील अल्पवयीन मुलीवरील लैगिंक अत्याचार हत्या प्रकरणात राजकारण आणि जाती धर्म आणण्याचा प्रयत्न करु नका असे आवाहन पीडित मुलीच्या वडीलांनी राजकीय नेते आणि नागरीकांना केले आहे.

  • 01 Jan 2025 02:50 PM (IST)

    ५० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी एपीआयवर गुन्हा

    ५० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी एपीआयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार अर्जावरून गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात दोन एजंटकडून 50 हजारांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांच्या विरोधात लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

  • 01 Jan 2025 02:40 PM (IST)

    खासगी शाळेत रेडा घुसला, विद्यार्थी जखमी

    छत्रपती संभाजीनगर येथील एका शाळेत रेडा घुसला. त्यामुळे काही विद्यार्थी जमखी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आला. हा रेडा शाळेत कसा घुसला ते समोर आले नाही.

  • 01 Jan 2025 02:30 PM (IST)

    आमदार प्रकाश सुर्वे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

    शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले आहेत. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रकाश सुर्वे ठाण्यात आले आहेत. शिवसेनेकडून पहिले आमदार उपमुख्यमंत्री शिंदे यांना नव वर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी ठाण्यात दाखल झाले आहेत.

  • 01 Jan 2025 02:20 PM (IST)

    वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली

    मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आणि खंडणीप्रकरणात स्वतःहून शरण आलेल्या वाल्मिक कराडची तब्येत अचानक बिघडली. सकाळी उठल्यावर त्याला अस्वस्थ वाटले. शुगर वाढल्याने कराडला रात्री काही वेळ ऑक्सिजन देण्यात आलं.

  • 01 Jan 2025 02:08 PM (IST)

    उद्या १२ वाजता राज्य कॅबिनेटची बैठक

    उद्या १२ वाजता राज्य कॅबिनेटची बैठक होत आहे. सर्व मंत्र्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. अद्यापही सगळ्या मंत्र्यांनी पदभार घेतला नाहीये. अजित पवार हे राज्याबाहेर असल्याची माहिती समोर येत आहे. आंदोलन, हत्याकांड, जाळपोळ आणि कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्र्यांशी थेट संवाद साधणार आहेत.

  • 01 Jan 2025 02:02 PM (IST)

    वाल्मिक कराडवर 302 चे कलम का नाही?

    मस्साजोग ग्रामस्थांचा आज संताप दिसून आला. वाल्मिक कराडवर 302 चे कलम का लावण्यात आले नाही असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केला. तर इतर तीन आरोपींना त्वरीत अटक करण्याची मागणी त्यांनी केली.

  • 01 Jan 2025 01:46 PM (IST)

    भिमा-कोरेगावला भव्य स्मारक व्हावे – रामदास आठवले

    भीमा कोरेगावच्या शौर्या गथेला 207 वर्ष पूर्ण झाली. या ठिकाणी दरवर्षी लाखो अनुयायी अभिवादनासाठी येतात, परंतू आराखड्याची अंबलबजावणी अद्याप झालेली नाही असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. आंबेडकर चळवळीचं हे तीर्थ क्षेत्र आहे, याठिकाणी भव्य स्मारक व्हावे ही आमची मागणी आहे असेही आठवले म्हणाले.

  • 01 Jan 2025 01:32 PM (IST)

    सोलापूरात ट्रकला स्कॉर्पिओ धडकल्याने दोन जणांचा मृत्यू

    सोलापूर- धुळे मार्गावर महाकाळा येथे उभ्या ट्रकला स्कॉर्पिओ  धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोन जणांचा मृत्यू तर ८ गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

  • 01 Jan 2025 01:20 PM (IST)

    भिमा-कोरेगाव विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी चंद्रशेखर आझाद दाखल

    भिमा-कोरेगाव विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद दाखल झाले आहेत.

  • 01 Jan 2025 12:58 PM (IST)

    अवकाळी पाऊस आणि थंडीमुळे द्राक्ष निर्यातीवर परिणाम

    निफाड (नाशिक)- अवकाळी पाऊस आणि थंडीमुळे द्राक्ष निर्यातीवर परिणाम होऊ लागला. युरोप देश वगळता गेल्या द्राक्ष हंगामाच्या तुलनेत यंदा 138 कंटेनर द्राक्षांची कमी निर्यात झाली. गेल्या हंगामात सर्वाधिक 450 कंटेनरमधून द्राक्षांची निर्यात झाली होती.

  • 01 Jan 2025 12:48 PM (IST)

    नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी

    नाशिक- नवीन वर्षांची सुरुवात देव दर्शनाने करण्यासाठी नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचं ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. देशभरातून भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले आहेत.

  • 01 Jan 2025 12:37 PM (IST)

    पुजारी ग्रंथी आणि इमामांना दरमहा मानधन देण्याच्या अरविंद केजरीवाल यांच्या घोषणेवर विश्व हिंदू परिषदेची टीका

    नवी दिल्ली- पुजारी ग्रंथी आणि इमामांना दरमहा मानधन देण्याच्या अरविंद केजरीवाल यांच्या घोषणेवर विश्व हिंदू परिषदेनं टीका केली आहे. “काही राजकीय पक्ष घोषणांचे राजकारण करतात. लोकांची हक्काची कमाई काहींना फुकट वाटत आहेत. पुजारी, ग्रंथी आणि पंडितांसाठी आता नवी घोषणा केलीय. मुस्लिमांमध्ये त्यांची जादू चालली नाही म्हणून आता हिंदूंना फसवण्याचा प्रयत्न केजरीवालांनी सुरू केलीय. आणखी चर्चचे पादरी बाकी आहेत, येत्या काळात त्यांच्यासाठीही योजना काढतील,” असं विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल म्हणाले.

  • 01 Jan 2025 12:27 PM (IST)

    बीड – मस्साजोगमधील गावकऱ्यांकडून जलसमाधी आंदोलन मागे

    बीड – मस्साजोगमधील गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन मागे घेतलंय. पोलीस अधिक्षक नवनीत कावत यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय. फरार आरोपींना तातडीने अटक करण्याचं आश्वासन गावकऱ्यांना देण्यात आलं. त्यानंतर आंदोलनकर्ते तलावातून बाहेर आले. पोलीस अधिक्षक आणि गावकरी यांच्यात सध्या चर्चा सुरू आहे.

  • 01 Jan 2025 12:16 PM (IST)

    मस्साजोगमध्ये जलसमाधी आंदोलन करणाऱ्या दोन महिलांची प्रकृती खालावली

    बीड- मस्साजोगमध्ये आज सामूहिक जलसमधी आंदोलन करण्यात येत असून त्यात दोन महिलांची प्रकृती खालावली आहे. आंदोलन मागे घेण्याचं आवाहन पोलीस प्रशासन करत आहेत.

  • 01 Jan 2025 12:10 PM (IST)

    बीड प्रकरणातला एकही आरोपी सुटणार नाही- बावनकुळे

    “तपास यंत्रणेवर कोणतंही दडपण येणार नाही. बीड प्रकरणातला एकही आरोपी सुटणार नाही. मस्साजोग गावकऱ्यांनी सरकारवर विश्वास ठेवावा. आमदारांनी सरकार काय कारवाई करतंय हे आधी तपासून घ्यावं. माध्यमांसमोर बोलण्यापूर्वी सरकारशी चर्चा करावी,” अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस यांच्या प्रश्नावर दिली.

  • 01 Jan 2025 12:00 PM (IST)

    अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त जोरदार शक्तीप्रदर्शन, बॅनरवर वरिष्ठ नेत्यांचा फोटो नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा

    माजी मंत्री आणि सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांचा आज वाढदिवस असल्याने छत्रपती संभाजी नगरमध्ये नागरी सत्कार सोहळा पार पडणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर त्यांचा नागरी सत्कार सोहळा पार पडणार आहे. त्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाचे बॅनर शहरात मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी लागले आहेत. परंतु या बॅनरवर एकाही वरिष्ठ नेत्याचा फोटो नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागलीय. दरम्यान मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आगामी महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाचे नेतृत्व आपल्याला मिळावे यासाठी वाढदिवसाचं निमित्त साधून सत्तार जोरदार शक्तीप्रदर्शन करताना दिसणार आहेत.

  • 01 Jan 2025 11:43 AM (IST)

    नववर्षाच्या निमित्ताने राज्यातील तीर्थक्षेत्र भाविकांनी गजबजले, पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा

    सरत्या वर्षाला निरोप देताना 2025 या नववर्षांच स्वागत मंगलमय स्वरुपात व्हावे, यानिमित्ताने राज्यातील सर्वच प्रमुख तीर्थक्षेत्र भाविकांनी गजबले आहेत. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर, शिर्डी साईबाबा संस्थान, कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, श्री सिद्धीविनायक मंदीर, गणपतीपुळे मंदीर या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

  • 01 Jan 2025 11:23 AM (IST)

    ठाण्यात चिनी मांजावर बंदी, महापालिकेची मोठी कारवाई

    पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा प्लास्टिक किंवा सिंथेटिक पदार्थापासून तयार केलेला चिनी मांजा, चिनी दोरा किंवा नायलॉन किंवा प्लास्टिक कृत्रिम मांजा हा माणसांसाठी तसेच पक्ष्यांना घातक ठरतो. त्यामुळे या मांजांच्या वापरावर ठाणे महापालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात त्याअनुषंगाने करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत सर्व प्रभाग समिती क्षेत्रात एकूण २५५ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे चिनी मांजा आढळला नाही. मात्र, या तपासणीत एकल वापराचे सुमारे २१४ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच, ८९ हजार रुपयांचा दंड करण्यात आला.

  • 01 Jan 2025 11:05 AM (IST)

    पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करा, राज ठाकरेंचे आदेश

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नववर्षाच्या निमित्ताने मनसैनिकांना महत्त्वपूर्ण सुचना केल्या आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज ठाकरेंनी एक पोस्ट शेअर करत मनसैनिकांना पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करा, असे आदेश दिले आहेत.

  • 01 Jan 2025 10:40 AM (IST)

    पाळधी गावात नवीन वर्षाच्या स्वागतालाच गालबोट, दोन गटांत धुमश्चक्री

    जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात नवीन वर्षाच्या स्वागतालाच गालबोट लागले. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाहनाचा धक्का लागल्याचे निमित्त आणि दोन गट समोरासमोर आले. या वाहनात मंत्री नव्हते. तर त्यांची पत्नी असल्याची माहिती समोर येत आहे. पाळधी मध्ये दोन गटात वाद झाल्यानंतर समाज कंटकानी रात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास गॅरेज समोर उभी तीन ते चार चारचाकी वाहने पेटवून दिली.

  • 01 Jan 2025 10:20 AM (IST)

    कोरेगाव भीमा विजयस्तंभाला आकर्षक सजावट, लाखो अनुयायी अभिवादनासाठी दाखल

    पुण्यातील कोरेगाव भीमा येथे आज 207 वा शौर्यदिन साजरा केला जात आहे. कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दाखल झाले आहेत. या ऐतिहासिक विजय स्तंभाला आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली आहे. पुण्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी शौर्य दिनानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे.

सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. आज १ जानेवारी २०२५ म्हणजेच नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. यानिमित्ताने राज्यातील सर्वच प्रमुख तीर्थक्षेत्र भाविकांनी गजबली आहेत. तर दुसरीकडे पुण्यातील कोरेगाव भीमा येथे आज 207 वा शौर्यदिन साजरा केला जात आहे. कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायींनी गर्दी केली आहे. त्यासोबतच बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी राजकारण चांगलेच तापले आहे. सरत्या वर्षाच्या अखेरीस वाल्मिक कराडने स्वतः पुण्यातील पाषाण रोडवरील गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) कचेरीत आत्मसमर्पण केले. त्याला अटक केल्यानंतर रात्री उशीरा केज न्यायालयासमोर हजर केले. त्याला १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यांसह राज्यातील विविध राजकीय, सामाजिक आणि इतर क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा.

Published On - Jan 01,2025 10:15 AM

Follow us
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.