Maharashtra Breaking News LIVE 8 September 2024 : कुस्तीपटू बजरंग पुनियाला जीवे मारण्याची धमकी

| Updated on: Sep 08, 2024 | 10:11 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 9 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 8 September 2024 : कुस्तीपटू बजरंग पुनियाला जीवे मारण्याची धमकी

Breaking News LIVE : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस मुंबई दौऱ्यावर असणार आहे. ते उद्या लालबागचा राजाचे दर्शन घेणार आहेत. तसेच आज विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेते मंडळींच्या बैठका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी महायुतीच्या जागावाटपांबद्दल निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे राज्यात मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. आज दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन केले जाणार आहे. तसेच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Sep 2024 06:52 PM (IST)

    उदयपूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू

    राजस्थानमधील उदयपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिला झाडोल येथील डोंगराळ भागाजवळ लाकूड गोळा करण्यासाठी गेल्या होत्या, तेथे बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.

  • 08 Sep 2024 06:46 PM (IST)

    कुस्तीपटू बजरंग पुनियाला जीवे मारण्याची धमकी

    देशातील स्टार कुस्तीपटू आणि आता किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष बजरंग पुनिया यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. परदेशी क्रमांकावरून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर बजरंगला एका परदेशी क्रमांकावरून व्हॉट्सॲपवर धमकीचा मेसेज आला आहे.

  • 08 Sep 2024 06:22 PM (IST)

    विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांना रेल्वेने कारणे दाखवा नोटीस बजावली

    विनेश फोगट आणि बजरंग पुनिया या कुस्तीपटूंचे राजीनामे रेल्वेने अद्याप स्वीकारलेले नाहीत. दोन्ही कुस्तीपटूंनी राजीनामा दिल्यानंतर उत्तर रेल्वेने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

  • 08 Sep 2024 06:05 PM (IST)

    ट्रान्सपोर्ट नगर इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्यांची मुख्यमंत्री योगींनी घेतली भेट

    लखनौच्या ट्रान्सपोर्ट नगरमधील इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्यांची भेट यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  घेतली.  रुग्णालयात जाऊन त्यांची प्रकृतीची चौकशी केली. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत.

  • 08 Sep 2024 05:50 PM (IST)

    ॲल्युमिना रिफायनरीत कोळशाने भरलेले हॉपर पडल्याने तीन कामगारांचा मृत्यू

    छत्तीसगडमध्ये कोळशाने भरलेले हॉपर ॲल्युमिनियम रिफायनरीवर पडल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

  • 08 Sep 2024 05:35 PM (IST)

    ढोलपूर येथे पार्वती नदीत स्नान करताना चार मुलींचा बुडून मृत्यू

    राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यातील मानिया पोलीस स्टेशन परिसरात ऋषीपंचमी उत्सवानिमित्त रविवारी सकाळी पार्वती नदीत स्नान करताना चार मुली जोरदार प्रवाहात वाहून गेल्या. मुलींचा शोध सुरू आहे.

  • 08 Sep 2024 05:19 PM (IST)

    गुजरातमधील कच्छमध्ये अज्ञात तापामुळे 12 जणांचा मृत्यू

    गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील लखपत तालुक्यात 12 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 12 वर्षांखालील चार मुलांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की मृत्यूचे कारण प्रामुख्याने न्यूमोनिटिस असल्याचे दिसून आले.

  • 08 Sep 2024 04:43 PM (IST)

    जितेंद्र आव्हाड यांची टीका

    ते बारामती लढणार लोकांची मानसिकता साम्रावस्थेत नेहणे ही एक कला आहे आणि त्या कलेचा ते वापर करत आहे. त्यामुळे लोकांची सहानभूती कशी निर्माण होईल यासाठी सर्व प्रयत्न आहे. त्यांची तुलना होऊच शकत नाही असे जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका करत म्हटले.

  • 08 Sep 2024 04:35 PM (IST)

    वेल्डिंगचे काम करताना चौघांना विजेचा शॉक लागला

    एक ठार तीन गंभीर जखमी. जखमी वरती हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. औंढा नागनाथ शहरातील बस स्थानक परिसरातील घटना..

  • 08 Sep 2024 04:20 PM (IST)

    गोपाल अग्रवाल यांनी ठोकला भाजपाला रामराम

    गेल्या पाच वर्षात गोंदिया जिल्ह्यातील महायुतीने विकास केला नसल्याचा केला आरोप. येणाऱ्या 13 ऑगस्टला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार गोपाल अग्रवाल.

  • 08 Sep 2024 04:00 PM (IST)

    मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

    कोल्हापूर, सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर या पाच जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवाचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस दलातर्फे सार्वजाविक उपक्रम करणाऱ्या गणेश मंडळांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह दिले जाणार आहे.

  • 08 Sep 2024 03:58 PM (IST)

    गोपाल अग्रवाल यांनी भाजप सोडली

    गोंदिया येथील भाजप नेते गोपाल अग्रवाल यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. गेल्या पाच वर्षांत गोंदिया जिल्ह्यात महायुतीने विकास केला नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. आता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे.

  • 08 Sep 2024 03:41 PM (IST)

    सांगलीत दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन

    सांगलीच्या तासगाव ऐतिहासिक रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे.त्या निमित्ताने तासगाव संस्थांच्या दीड दिवसाच्या बाप्पांना जल्लोषपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.

  • 08 Sep 2024 03:25 PM (IST)

    धनगर समाजाला आरक्षणासाठी उपोषण

    एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उद्यापासून पंढरपुरात धनगर समाजातील शंभर कार्यकर्ते बसणार आमरण उपोषणाला सुरु केले आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार अशी भूमिका धनगर समाजाने घेतले आहे.

  • 08 Sep 2024 03:10 PM (IST)

    नवी मुंबईत 136 कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती

    नवी मुंबई महानगरपालिकेने दीड दिवसाच्या श्रीगणेशमूर्ती विसर्जनापासूनच सर्व विसर्जनस्थळी सुयोग्य व्यवस्था केली असून नैसर्गिक 22 विसर्जन स्थळांव्यतिरिक्त विविध विभागांमध्ये 136 कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात आलेली आहे.

  • 08 Sep 2024 02:43 PM (IST)

    माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांची भाजपाला सोडचिट्टी

    माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपचे अध्यक्ष जे. पी .नड्डा यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. येत्या 13 सप्टेंबरला काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला आणि प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

  • 08 Sep 2024 02:19 PM (IST)

    रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात परिवर्तन व्हावं – भाजपा नेते सुरेंद्र माने यांचे गणरायाला साकडे

    गणरायांच्या चरणी आम्ही रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून परिवर्तन व्हावं अशी मागणी केली आहे असे भाजपाचे माजी आमदार बाळ ऊर्फ सुरेंद्र माने यांनी केली आहे.

  • 08 Sep 2024 01:55 PM (IST)

    Maharashtra News: जळगावात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप

    जळगावात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला आहे… जळगाव शहरातील मेहरुन तलावावरील गणेश घाट येथे दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. घरगुती गणपती, आणि छोट्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले… गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत भाविकांच्या वतीने आपल्या लाडक्या बापाला भावपूर्ण निरोप देण्यात आला…

  • 08 Sep 2024 01:35 PM (IST)

    Maharashtra News: मुलुंड येथील सोसायटीमध्ये आढळली 9 फुटाची मगर

    मुलुंड येथील निर्मल लाईफस्टाईल येथील जवळील असलेल्या सोसायटीमध्ये आढळली 9 फुटाची मगर… मुलुंड मधील रॉ या संस्थे कडून पकडण्यात आली मगर… निर्मल लाईफस्टाईल येथील रहिवासी विभागात मगर आढळल्याने भीतीचे वातावरण… मगरीवर औषधोपचार करून तिला पुन्हा जंगलात पाण्याच्या ठिकाणी सोडण्यात आले…

  • 08 Sep 2024 01:15 PM (IST)

    Maharashtra News: वर्धा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 20 सप्टेंबर रोजी संभाव्य दौरा

    वर्धा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 20 सप्टेंबर रोजी संभाव्य दौरा… पी एम विश्वकर्मा योजनेला वर्षपूर्ती होत असल्याने आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता… कार्यक्रमाची प्रशासनाकडून जय्यत तयारी… वर्ध्यातील मैदानावर होणार सभा, कार्यक्रमाचे आयोजन…

  • 08 Sep 2024 12:00 PM (IST)

    लालबागचा राजा गुजरातला पळवतील

    लालबागच्या राजाच्या दर्शनाला ते येत आहेत येऊद्यात पण मला सारखी भीती वाटते की ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग, अनेक संस्था त्यांनी गुजरातला पळवल्या त्याप्रमाणे ते एक दिवस लालबागचा राजा गुजरातला नेणार नाहीत ना, असा चिमटा संजय राऊत यांनी अमित शाह यांना काढला. हेही होऊ शकतं हे काहीही करू शकतात. लालबागचा राजा प्रसिद्ध आहे, देशभरातून लोक दर्शनासाठी येत असतात म्हणून घेऊन जाऊ शकतात गुजरातला, असे ते म्हणाले.

  • 08 Sep 2024 11:57 AM (IST)

    जयंत पाटलांकडून आगामी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी

    राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. उद्या पुण्यातील गणपती मंडळाचं दर्शन घेणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या गणपती मंडळांच्या भेटीगाठी घेणार आहेत. जयंत पाटलांकडून आगामी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

  • 08 Sep 2024 11:48 AM (IST)

    मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जागवल्या आठवणी

    मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पुण्यातल्या मिरवणुकीत ध्वज नाचवला. मंडळाचा कार्यकर्ता म्हणून काल मुरलीधर मोहोळ यांनी सहभाग घेतला. ढोल ताशा वाजवत ध्वज नाचवत कार्यकर्त्यांच्या आठवणी जागवल्या. मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा ध्वज नाचवतानाचा व्हिडिओचं सध्या कौतुक केलं जात आहे.

  • 08 Sep 2024 11:37 AM (IST)

    अजितदादांचा आज बारामतीत जनता दरबार

    अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आले आहेत. या ठिकाणी ते जनता दरबार घेत आहेत. यावेळी त्यांनी शेतकरी आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

  • 08 Sep 2024 11:26 AM (IST)

    मी मराठ्यांचा, मनोज जरांगे यांचा विरोधकांवर हल्लाबोल

    मी कोणाचाच होऊ शकत नाही कोणत्या महाविकास आघाडीचा कोणत्या महायुतीचा ही नाही,मी फक्त मराठ्यांचा असल्याचे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केली. धनंजय मुंडे सोबत चर्चा झाली, विशेष नव्हती त्यात शेतकऱ्यांचा मुद्दा होता. ज्यावेळेस आमचे आरक्षण बाबत चर्चा झाली त्यावेळेस ही व्यासपीठावर धनंजय मुंडे होते.मी माझ्या मुद्द्यावरती ठाम आहे माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं ते फक्त ओबीसीतून या मुद्दावर ठाम असल्याचे ते म्हणाले.

  • 08 Sep 2024 11:09 AM (IST)

    लालबागच्या चरणी झालेल्या दानाची मोजदाद

    लालबागच्या चरणी भाविकांनी काल मोठ्या प्रमाणात दान केले. भक्तांनी भरभरुन दान केले आहे. बाप्पाच्या चरणी झालेल्या दानाची पेटी उघडण्यात आली आहे. त्याची मोजदाद सुरु झाली आहे.

  • 08 Sep 2024 11:00 AM (IST)

    रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन तूर्त स्थगित

    शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे सुरु असलेले अन्नत्याग आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे. राज्य सरकारने तुपकरांना बैठकीचे निमंत्रण दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत ११ सप्टेंबरला बैठक होत आहे. पालकमंत्री दिलीप वळसे पाटील आणि कृषि धनंजय मुंडे यांची मध्यस्थी केली आहे. ११ सप्टेंबरच्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास १२ सप्टेंबर पासून आक्रमकपणे रस्त्यावर उतरण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.

  • 08 Sep 2024 10:57 AM (IST)

    महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी

    भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलीस कंट्रोल रूमला फोन करत मला महेश लांडगे यांची सुपारी मिळाल्याचं सांगत लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मोशी मधील तरुणाला या संदर्भात ताब्यात घेतलं आहे. उदय कुमार राय असं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. भोसरी एमआयडीसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.

  • 08 Sep 2024 10:45 AM (IST)

    एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातून पुण्याच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. ठाण्यातील रेमंड मैदानावरून हेलिकॉप्टरचा प्रवास करत पुण्याचे दिशेने होणार आहे. थोड्याच वेळात तुलसीदास पुरस्कार प्रदान, अभिष्टचिंतन आणि वारकरी संतपूजन सोहळा कार्यक्रमात मुख्यमंत्री राहणार आहेत.

  • 08 Sep 2024 10:30 AM (IST)

    परळीत जरांगेंची घोंगडी बैठक

    मनोज जरांगे पाटील यांची मुंडे यांच्या परळीत घोंगडी बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी अंतरवाली सराटी येथून जरांगे पाटील परळीच्या दिशेने रवाना झाले आहेत. दुपारी दोन वाजता परळीत हलगे गार्डन या ठिकाणी कोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

  • 08 Sep 2024 10:15 AM (IST)

    आज आणि उद्या नाशिकला येलो अलर्ट

    गोदा घाट परिसरात प्रवासी आणि पर्यटकांची धोकादायक वाहतूक सुरु आहे. गोदा घाट परिसरात पाण्यातून गाड्या चालवण्याचा प्रताप समोर आलाय. गाडगे महाराज पुलाखालून रात्रीच्या सुमारास कार वाहून गेली होती. अग्निशामन दलाना रेस्क्यू ऑपरेशन करून कार बाहेर काढली आहे. पाणी वाढलेला असताना देखील पाण्यातूनच गाड्या चालवण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे. गंगापूर धरणातून सध्या 3362 क्युसेसने विसर्ग सुरू आहे. पाऊस वाढल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. गोदा घाट परिसरात गाड्या पार्क न करण्याच्या सूचना देण्यात आल्यात.  पाणी वाढल्यास गाड्या वाहून जाण्याचा धोका आहे. तर आज आणि उद्या नाशिकला येलो अलर्ट देण्यात आला आहे.

  • 08 Sep 2024 10:03 AM (IST)

    Maharashtra News Live : पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई, ४० लाखांचं ड्रग्ज जप्त

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई

    ४० लाखांचं मॅफेड्रोन आणि पिस्तुल केलं जप्त

    कोंढवा परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे

    कोंढव्यात गस्त घालत असताना अमली पदार्थ विरोधी पथकाने केली कारवाई

  • 08 Sep 2024 10:01 AM (IST)

    Maharashtra News Live : बदलापूर घटनेनंतर सात सदस्यीय समिती स्थापन

    बदलापूर घटनेनंतर शालेय मुलांच्या सुरक्षेसाठी सात सदस्यीय समिती स्थापन

    २९ ऑक्टोबरपर्यंत शालेय सुरक्षा उपायांची शिफारस करणारा अहवाल करणार न्यायालयात सादर

  • 08 Sep 2024 09:54 AM (IST)

    Maharashtra News Live : नागपूर महापालिकेकडून पीओपीची मूर्ती विकणाऱ्या 91 विक्रेत्यांवर कारवाई

    – नागपूर महापालिकेच्या पथकाने मागील 12 दिवसात पीओपी मूर्ती विकणाऱ्या 91 विक्रेत्यांवर केली कारवाई

    – पीओपी गणेश मूर्ती विक्रीवर बंदी असताना मोठया प्रमाणात विक्री होत असताना मनपाचा पथकाने शहरातील विविध भागात पाहणी केली.

    – यात जवळपास 830 दुकानाची तपासणी करत 91 विक्रेत्याकडून 9 लाख10 हजाराचा दंड वसूल, 798 मूर्ती केल्या जप्त

  • 08 Sep 2024 09:53 AM (IST)

    Maharashtra News Live : दीड दिवसांच्या गणरायाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज

    दीड दिवसांच्या गणरायाच्या विसर्जनासाठी दादरच्या चौपाटीवर मुंबई महापालिका सज्ज

    पर्यावरण संवर्धन राखण्यासाठी चौपाटीवर कृत्रिम तलाव बनविण्यात आले आहेत

    पीओपीच्या छोट्या छोट्या बाप्पाच्या मूर्ती चे या कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात येणार असून, पालिकेचे कर्मचारीही तैनात

  • 08 Sep 2024 09:51 AM (IST)

    Maharashtra News Live : धनंजय मुंडेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट

    धनंजय मुंडे यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट

    मध्यरात्री अंतरवली सराटी गावात जाऊन घेतली भेट

    मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे यांच्यात प्रदीर्घ चर्चा

  • 08 Sep 2024 09:50 AM (IST)

    Maharashtra News Live : कल्याणमध्ये उभारणार सुपर स्पेशालिटी रुग्णालय, विश्वनाथ भोईर यांच्याकडून जागेची पाहणी

    कल्याणमध्ये उभारणार 100 बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार

    कल्याण गौरीपाडा परिसरातील 16,000 स्क्वेअर फुटांच्या आरक्षित भूखंडावर PPP तत्वावर तीन मजली हॉस्पिटल

    या रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना (आयुष्मान भारत) योजना अंतर्गत मोफत उपचार होणार

    आमदार विश्वनाथ भोईर आणि पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड आणि इतर अधिकाऱ्यांनी केली जागेची पाहाणी

  • 08 Sep 2024 09:48 AM (IST)

    Maharashtra News Live : पूजा खेडकर प्रकरणानंतर UPSC कडे एकूण ३० तक्रारी

    नवी दिल्ली : पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीकडे एकूण ३० तक्रारी

    ३० वेगवेगळया अधिकाऱ्यांवर आरोप करणाऱ्या जवळपास ३० तक्रारी यूपीएससीकडे

    यूपीएससीकडून संबंधित अधिकाऱ्यांची प्रकरणे कार्मिक विभागाकडे वर्ग

    यूपीएससीकडे देशभरातून विविध ठिकाणांहून ३० तक्रारी आल्याचे समजते

    केंद्र सरकारच्या प्रशिक्षण आणि कार्मिक विभागाकडे या तक्रारी यूपीएससीने पाठवल्या

Published On - Sep 08,2024 9:43 AM

Follow us
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.