Maharashtra Breaking News LIVE 10 October 2024 : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, सर्व शासकीय कार्यक्रम रद्द

| Updated on: Oct 10, 2024 | 9:42 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 10 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 10 October 2024 : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, सर्व शासकीय कार्यक्रम रद्द
उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

LIVE NEWS & UPDATES

  • 10 Oct 2024 09:42 AM (IST)

    रतन टाटा यांच्या कुलाब्यातील घराबाहेर पोलीस बंदोबस्त

    रतन टाटा यांचं निधन झालं. त्यानंतर आता त्यांच्या कुलाब्यातील घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी काहीच वेळात सुरुवात होईल.

  • 10 Oct 2024 09:30 AM (IST)

    शांतनू नायडू याची रतन टाटांसाठी भावनिक पोस्ट

    रतन टाटा यांचा तरूण जिवलग मित्र शांतनू नायडू याने खास पोस्ट लिहिली आहे. माझं लाईटहाऊस मला सोडून गेलं, अशा शब्दात शांतनू नायडूने त्याच्या भावना व्यक्त केल्यात.

  • 10 Oct 2024 09:20 AM (IST)

    राज ठाकरेंकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली

    रतन टाटा यांचं निधन झालं. जवळपास १५६ वर्षांची परंपरा असलेल्या एका उद्योग समूहाला ज्यांनी खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकांत आणलं आणि ‘टाटा’ ही नाममुद्रा ज्यांनी जगभर नेली ती रतन टाटांनी. बरं, हे सगळं करताना एखाद्या योगी माणसाची स्थितप्रज्ञताच ठेवायची ही टाटा समूहाची शिकवण पूर्णपणे अंगीकारायची हे खरंतर कठीण, पण ते रतन टाटांना जमलं. रतन टाटांना माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली, अशी पोस्ट राज ठाकरे यांनी लिहिली आहे.
  • 10 Oct 2024 09:10 AM (IST)

    बच्चू कडू यांची रतन टाटांना श्रद्धांजली

    रतन टाटा असे एक उद्योगपती होते ज्यांनी आपल्या कमाईचा 25 टक्के हिस्सा हा भारताच्या विकासासाठी दिला.सामाजीक क्षेत्रासाठी दिला. टाटा हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली.रतन टाटा यांनी जेव्हा टाटा समूहाचा कारभार हाती घेतला तेव्हा त्यांनी उद्योग क्षेत्राला वेगळी कलाटणी देण्याचं काम केलं. मी प्रहार आणि माझ्या शेतकरी बांधवाकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असं बच्चू कडू म्हणाले.

  • 10 Oct 2024 08:11 AM (IST)

    Ratan Tata Passed Away Live Update : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वाहिली श्रद्धांजली

    Ratan Tata Passed Away Live Update : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘भारताचे सुपुत्र, पद्म विभूषण रतन टाटा यांच्या निधनाने एक महान उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील आदर्श नेतृत्वाने आज जगाचा निरोप घेतला आहे. आपल्या योगदानाने उद्योग, समाजसेवा आणि मानवतेसाठी नवीन आदर्श रतन टाटा यांनी लोकांपुढे ठेवला. देश संकटात असताना अनेक प्रसंगावर त्यांनी देशासाठी दिलेल्या निस्वार्थ योगदानाची परतफेड कधीच होऊ शकणार नाही, असे ते म्हणाले.

  • 10 Oct 2024 08:06 AM (IST)

    Ratan Tata Passed Away Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

    Ratan Tata Passed Away Live Update : रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी X (ट्विटर) वरून त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘श्री रतन टाटा हे एक दूरदर्शी बिझनेस लीडर, दयाळू आणि विलक्षण माणूस होते. भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना त्यांनी स्थिर नेतृत्व दिले. नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजाला अधिक चांगले बनवण्याच्या अतूट बांधिलकीमुळे ते लोकप्रिय ठरले, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला.

  • 10 Oct 2024 07:47 AM (IST)

    Ratan Tata Passed Away Live Update : रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

    Ratan Tata Passed Away Live Update : रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतील. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

  • 10 Oct 2024 07:44 AM (IST)

    Ratan Tata Passed Away Live Update : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

    Ratan Tata Passed Away Live Update : प्रसिद्ध उद्योपती रतन टाटा यांचे काल निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा हे 86 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी रात्री उशिरा मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी टाटा यांनी ट्विट करत आपल्या प्रकृतीची माहिती दिली होती. “माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरली आहे. पण माझे वय लक्षात घेता आणि सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे काळजी करण्यासारखं कोणतेही कारण नाही”, असं रतन टाटा म्हणाले होते.

    मात्र बुधवारी संध्याकाळी रतन टाटा यांची प्रकृती जास्त खालावली. प्रकृती खालावल्यामुळे रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

Ratan Tata Passed Away Live Update : टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने केवळ उद्योगजगतावर नव्हे तर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांना प्रकृती खालावल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्या निधनानंतर कोट्यवधी भारतीयांच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळत आहे. तसेच रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरातून मान्यवरांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. तसेच सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

Published On - Oct 10,2024 7:36 AM

Follow us
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो...
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो....
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक.
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'.
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण.
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?.
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते...
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते....
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण.
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?.
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल.
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्..
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्...