Maharashtra Political News LIVE : वसंत मोरे यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
Maharashtra Political News LIVE in Marathi: आज 5 एप्रिल 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
उन्हाची तीव्रता वाढत असताना प्रचारालाही जोर आला आहे. देशभरात 2024 लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु झाला आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भात मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यातील नेत्यांकडून विदर्भात जोरात प्रचार सुरु आहे. काल नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुद्धा देशभरात झंझावती प्रचार दौरे सुरु झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा विदर्भात होणार आहे. दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची बैठक 3 एप्रिल ते 5 एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. आर्थिक वर्ष 2024-2025 साठी ही पहिली बैठक आहे. तुमच्या लोनचा EMI स्वस्त होणार की, महागाई आणखी वाढणार याचा निर्णय आज सकाळी 10 वाजता होईल. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
शरद पवार गटाची तिसरी यादी येत्या रविवारी जाहीर होणार
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तिसरी यादी येत्या रविवारी जाहीर होणार आहे. सांगली, माढा आणि रावेरच्या मतदारसंघाचे उमेदवार या तिसऱ्या यादीत जाहीर होणार आहेत.
-
संजय निरुपम सोमवारी राजकीय निर्णय घेणार
काँग्रेसमधून निलंबित झालेले नेते संजय निरुपम यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होणारी भेट रद्द झाली आहे. त्यांची भेट आता सोमवारी होणार आहे. त्यामुळे संजय निरुपम सोमवारी राजकीय निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
-
वसंत मोरे यांचा वंचितमध्ये पक्षप्रवेश
वंसत मोरे यांना पुण्यात वंचित बहुजन आघाडीकडून तिकीट देण्यात आलं आहे. यानंतर वसंत मोरे यांनी आज वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश केला. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वसंत मोरे यांचं स्वागत केलं आहे.
-
मोदीसोबत बारामतीचा खासदार पाहायचा आहे : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरमधील झालेल्या जाहीर सभेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. चीन-पाकिस्तानला वाकडी नजर करून पाहता येणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावलं आहे.
फडणवीस काय म्हणाले?
हा मोदींचा सम्मान नाही हा भारताचा सम्मान आहे.
आपल्याला मोठ्या ध्येयासाठी काम करायचं आहे.
झालं ते विसरून महायुतीसाठी काम करायचं आहे.
मोदीसोबत बारामतीचा खासदार पाहायचा आहे.
तुमचं म्हणणं समजून घेतल्या आहेत, आणि कृतीतून करून दाखवणार हा विश्वास देण्यासाठी आज आलो आहे.
-
मुख्यमंत्री आमदार मंजुळा गावित यांच्या मुलाच्या विवाहला उपस्थिती लावणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी 6 वाजता धुळ्यात येणार आहेत. साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित यांच्या मुलाच्या विवाहला मुख्यमंत्री उपस्थिती लावणार आहेत. मुख्यमंत्र्यांसह मंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत,मंत्री गिरीश महाजन उपस्थित असणार आहेत.
-
-
संजय राऊत अजितराव घोरपडे यांच्या भेटीला
शिवसेना व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या भेटीसाठी संजय राऊत कवठेमंकाळमध्ये दाखल. अजित घोरपडे यांच्याशी संजय राऊत चर्चा करणार आहेत. शिवसेना उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी देखील उपस्थित आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील अजित घोरपडे यांची आहे मोठी ताकद.
-
काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम थोड्याच वेळात दिल्लीसाठी रवाना होणार
काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम थोड्या वेळात दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. पुण्यावरून ते दिल्लीला बैठकीसाठी जात आहेत.
-
पुण्यात पोलीस चौकीतच पोलीस कर्मचाऱ्याने स्वतः वर गोळ्या झाडून केली आत्महत्या
पुण्यात पोलीस चौकीतच पोलीस कर्मचाऱ्याने स्वतः वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. खडक पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या नगर पोलीस चौकीतील घटना. भारत आस्मर असं पोलीस कर्मचाऱ्याचे नाव. पोलीस कर्मचाऱ्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ.
-
लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर प्रशासनाची जय्यत तयारी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग. धुळे ग्रामीण मतदार संघातील मतदान केंद्रासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण.
-
छत्रपती संभाजी नगर शहरात महायुतीच्या उमेदवारांची मोठी बैठक
छत्रपती संभाजी नगर शहरात महायुतीच्या उमेदवारांची पार पडली मोठी बैठक. उमेदवार निश्चित होण्याच्या आधीच कामाला लागण्याचा निर्णय. उमेदवार कोणीही देवो निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा बैठकीत निर्णय
-
देवरी शहरातील एकाच वेळी पाच दुकानांमध्ये चोरी
किती रुपयांचे साहित्य चोरीला गेले याचा तपास सुरू. कुलूप तोडून दुकानात चोरी करतानाचा सीसीटीव्ही पुढे
-
यवतमाळमध्ये वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द. अर्जात त्रुटी असल्याने उमेदवारी अर्ज करण्यात आला आहे रद्द
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले अलिबागला रवाना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले ठाण्यातील निवासस्थानाहून अलिबागमधील रेवदंड्याला रवाना झाले आहेत. ठाण्यातील रेमंड मैदानातून हेलिकॉप्टरने प्रवास करत ते अलिबागला जाणार आहेत.
-
अहमदनगरमधील अकोले शहरात महायुतीचा मेळावा
अहमदनगरमधील अकोले शहरात महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे, पालकमंत्री विखे पाटील या मेळाव्याला उपस्थित आहेत. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ हा मेळावा आहे. कट्टर विरोधक आमदार डॉ.किरण लहामटे आणि माजी आमदार वैभव पिचड प्रथमच एका मंचावर आले आहेत.
-
विश्वजीत कदम, विशाल पाटील यांची नाराजी लवकरच दूर होईल- संजय राऊत
“विश्वजीत कदम आणि विशाल पाटील आमचेच आहेत. त्यांची नाराजी लवकरच दूर होईल. सांगलीची जागा शिवसेनाच लढणार आहे. विशाल पाटील आणि पतंगराव कदम यांच्याविषयी आम्हाला आस्था आणि प्रेम आहे. विशाल पाटील संसदेत कसे जातील याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेणार आहे,” असं संजय राऊत म्हणाले.
-
दोन महिन्यानंतर सत्ता आल्यावर नारायण राणे तिहार जेलमध्ये असतील- संजय राऊत
“दोन महिन्यानंतर सत्ता आल्यावर नारायण राणे तिहार जेलमध्ये असतील. नारायण राणे यांच्या ईडी/सीबीआयच्या बंद फाईल्स आमची सत्ता आल्यावर उघडणार,” असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.
-
चायनीज व्हिसा घोटाळ्याप्रकरणी कार्ती चिदंबरम वगळून इतर आरोपींना जामीन मंजूर
नवी दिल्ली- चायनीज व्हिसा घोटाळ्याप्रकरणी कार्ती चिदंबरम वगळून इतर आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. कार्ती चिदंबरम यांना यापूर्वी उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले होते. नियमित जामीन अर्जांवर ED ला त्यांचं म्हणणं सादर करायला सांगितलं आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 2 मे रोजी होणार आहे.
-
खैरे यांना शुभेच्छा
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे एकमेव आमदार उदयसिंग राजपुत यांनी आज शिवसेना नेते आणि उमेदवार चंद्रकांत खैरे यांची भेट घेतली आणि निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
-
उष्माघातापासून वाचविण्यासाठी कक्ष
मराठवाड्यामध्ये यावर्षी उन्हाचा तडाखा तेजीने वाढत असून यामुळे उष्माघाताचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जिल्ह्यातील 51 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्ष सुरू केला आहे आणि या कक्षामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असून उष्माघात झाल्यानंतर तात्काळ उपचार न मिळाल्यास मृत्यू होण्याची शक्यता असते त्यामुळे ही खबरदारी घेतली जात आहे
-
जायकवाडीची पाणी पातळी घटली, मराठवाड्यावर जलसंकट
मराठवाड्यामध्ये यावर्षी पाणी संकट वाढले आहे, मागील वर्षी अतिशय कमी पाऊस पडल्याने सध्या स्थितीला जायकवाडी धरण्यात फक्त 19 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असून मराठवाड्यावर पाणी संकटाचे ढग कायम आहेत.
-
मोदी आणि शहांनी अघोरी जादू केली
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर मोठा गंभीर आरोप केला. मोदी आणि शहा यांनी अघोरी जादू केल्याचे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
-
बाळा मामा पवारांच्या भेटीला
भिवंडीचे उमेदवार बाळा मामा शरद पवारांची भेट घेणार आहेत. आज दोघांमध्ये बैठक होणार आहे.कालच बाळा मामा यांना शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.
-
रेशनचे तांदूळ खरेदी करणारी टोळी सक्रिय
लाभार्थ्यांकडून रेशनचे तांदूळ खरेदी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. रेशन कार्ड धारकांकडून पंधरा रुपये किलोने तांदळाची खरेदी केली जाते. रेशन दुकानातून तांदूळ आणून या टोळीला विक्री तांदळाची विक्री केली जाते. छत्रपती संभाजी नगर मध्ये पहिल्यांदाच रेशन लाभार्थ्यांकडून रेशन खरेदी करतानाचे टोळीचे व्हिडिओ व्हायरल झाले
-
कर्जदार, ग्राहकांची निराशा, रेपो दर जैसे थे
आरबीआयने रेपो दर न वाढविण्याची सप्तपदी पूर्ण केली. ग्राहकांना, कर्जदारांना कोणताही दिलासा मिळला नाही. केंद्रीय बँकेने रेपो दर पुन्हा जैसे थे ठेवण्याचा क्रम नवीन आर्थिक वर्षात पण कायम ठेवला. त्यामुळे ग्राहकांची घोर निराशा झाला. त्यांच्या पदरात काहीच पडले नाही. सध्या रेपो दर 6.50 टक्के असा आहे.
-
मला पंकजा मुंडे यांचे कोणतेही आव्हान वाटत नाही – बजरंग सोनावणे
मला पंकजा मुंडे यांचे कोणतेही आव्हान वाटत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून बीडमधून उमेदवारी मिळाल्यानंतर बजरंग सोनावणे यांची पहिली प्रतिक्रिया. प्रीतम मुंडे यांच्या दहा वर्षाच्या कामांमुळे कोणीही समाधानी नाही. मला खासदार करायचं हे बीड जिल्ह्यातील जनतेने ठरवलं आहे.
मी बीड जिल्ह्याच्या जनतेशी एक निष्ठा आहे आणि बीड जिल्ह्याची जनता माझ्यासोबत आहे, असा विश्वास सोनावणे यांनी व्यक्त केला.
-
शरद पवारांच्या भेटीसाठी रोहित पवार मोदीबागेत दाखल
शरद पवारांच्या भेटीसाठी रोहित पवार मोदीबागेत दाखल झाले आहेत. रोहित पवार आणि शरद पवार यांच्याच बारामती लोकसभेबाबत बैठक.
रोहित पवार यांच्यावर बारामती लोकसभा प्रचाराची आहे जबाबदारी. या पूर्वी केलेल्या दौऱ्याचा तपशील रोहित पवार हे शरद पवार यांना देणार आहेत.
-
नवी दिल्ली – थोड्याच वेळात काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार
थोड्याच वेळात काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार. काँग्रेसच्या जाहीरनाम्याकडे सत्ताधारी भाजपसह देशाचे लक्ष लागले आहे.
-
मुंबईत संजय निरुपम यांच्या विरोधात बॅनर लावले आहेत
मुंबईत संजय निरुपम यांच्या विरोधात युवक काँग्रेसने बॅनर लावले आहेत. काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर मुंबई काँग्रेस युवकांनी अंधेरी परिसरात बॅनर लावले. हे बॅनर संजय निरुपम यांच्या इमारतीबाहेरही लावण्यात आले आहेत.
-
४८ भरारी पथकांची नियुक्ती
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी ४८ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलीय. आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी जिल्हा निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी हि नियुक्ती केलीय.
-
क्रिकेट सट्यावर छापा
भंडारा जिल्ह्यातील तुमसर इथं एका घरात आयपीएल क्रिकेटच्या सुरू असलेल्या सट्टा अड्ड्यावर तुमसर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत मोबाईल फोन्स, चार्जिंग डिवाईस, लॅपटॉप, रेकॉर्डर, लाईन होल्डींग मशिन असा एकूण 1 लाख 82 हजार 30 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
-
जळगावातील वरणगावमध्ये पाणी टंचाई
जळगावच्या वरणगावात पाण्याची भीषण टंचाई नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयात पाण्यासाठी आंदोलन शहरासह परिसरात बारा दिवस होऊनही पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. हातनुर धरण जवळ असतानाही पाण्याची टंचाई भासत असल्यामुळे नागरिकांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायत कार्यालयातच आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
-
Maharashtra News : छगन भुजबळ यांची उमेदवारी आज जाहीर होणार
छगन भुजबळ यांची उमेदवारी आज जाहीर होणार. पत्रकार परिषद घेऊन आज जाहीर केली जाणार उमेदवारी. नाशिकच्या जागेचा तिढा आज अखेर सुटण्याची शक्यता. विश्वसनीय सूत्रांची TV 9 ला माहिती. गेल्या 15 दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून सुरू आहे गोंधळ. भुजबळांची उमेदवारी जाहीर झाल्यास गोडसे यांच्या भूमिकेकडे असणार लक्ष.
-
Maharashtra News : भुजबळ कुटुंबियांकडून नाशिक जिल्हा बँकेचे कर्ज भरण्यास सुरुवात
भुजबळ कुटुंबियांकडून नाशिक जिल्हा बँकेचे कर्ज भरण्यास सुरुवात. 2011 साली आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर ( कारखाना) साठी नाशिक जिल्हा बँकेतून कर्ज घेण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात भुजबळ कुटुंबियांकडून साडेसहा कोटी रुपये भरण्यात आले. वन टाइम सेटलमेंट योजनेत थकीत कर्ज भरण्यात येत असल्याची माहिती. 28 कोटी रुपयापैकी पाहिल्या टप्प्यात भुजबळ कुटुंबीयांकडून साडेसहा कोटी रुपये भरण्यात आले. उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने भरणार असल्याचे बँकेला सांगितले. छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. बँकेच्या थकीत कर्ज प्रकरणी कोणी तक्रार घेऊ नये यासाठी थकीत कर्ज भरण्यास सुरवात केल्याची देखील चर्चा.
-
Maharashtra News : लोकसभेची निवडणूक का नाही लढवली? प्रफुल पटेल म्हणाले…
अमित शहा यांची गोंदिया येथे विराट सभा होईल असं प्रफुल पटेल म्हणाले. नवनीत राणा यांना आमच्या शुभेच्छा आहेत असं त्यांनी सांगितलं. कोर्टाने आपल्या बाजूने निकाल दिला, तर चांगलं आपल्या विरोधात दिला तर वाईट अशी काँग्रेस आणि विरोधी पक्षाची भूमिका आहे असं प्रफुल पटेल म्हणाले. मी राज्यसभेच्या खासदार झाल्याने गोंदिया भंडारा लोकसभेची निवडणूक लढविली नाही असं प्रफुल पटेल म्हणाले.
Published On - Apr 05,2024 8:08 AM