गोंधळ दूर, कोकणातील प्रवाशांसाठी चांगली बातमी, या रेल्वेचे आरक्षण अखेर खुले

Konkan Railway : पावसाळी वेळापत्रकात कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेस धावणार आहे. मध्य आणि कोकण रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. यामुळे आयआरसीटीसीच्या संकेत स्थळावर १० जून नंतरच्या या दोन रेल्वे गाड्यांचे आरक्षण सुरु करण्यात आले आहे.

गोंधळ दूर, कोकणातील प्रवाशांसाठी चांगली बातमी, या रेल्वेचे आरक्षण अखेर खुले
वंदे भारत
Follow us
| Updated on: May 02, 2024 | 10:09 AM

कोकणातील अनेक लोक मुंबईत स्थायिक झाले आहेत. कोकणातील लोक उन्हाळी सुट्ट्यांपासून गणपतीपर्यंत म्हणजे सप्टेंबरपर्यंत गावी जात असतात. या काळात कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असते. यामुळे कोकणातील लोकांना सहज आरक्षण मिळत नाहीत. पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावार दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडत असतात. यामुळे या मार्गावर अनेक गाड्या रद्द केल्या जातात. येत्या 10 जूननंतरची कोकणात जाणारी वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर देण्यात आली होती. यामुळे कोकण अन् गोवामध्ये जाणारे लोक संभ्रात पडले होते. आता या गाड्यांचे आरक्षण खुले झाले असल्याने दिलासा मिळाला आहे.

तेजस, वंदे भारत एक्स्प्रेसचे रेल्वे आरक्षण खुले

कोकण रेल्वे पावसाळ्यात दरडीचा धोका लक्षात घेऊन 10 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत नवीन वेळापत्रक लागू करते. तसेच रेल्वेचे आरक्षण प्रवासाच्या 120 दिवस आधी सुरू होते असते. कोकणाकडे जाणाऱ्या तेजस आणि वंदे भारत एक्स्प्रेसचे रेल्वे आरक्षण अखेर खुले झाले नव्हते. आता हे आरक्षण शुक्रवारपासून सुरु झाले आहे. यामुळे तेजस आणि वंदे भारत एक्स्प्रेस पावसाळ्यात सुरु राहणार आहे. यामुळे यासंदर्भात निर्माण झालेला गोंधळ दूर झाला आहे.

पावसाळी वेळापत्रकात कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेस धावणार आहे. मध्य आणि कोकण रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. यामुळे आयआरसीटीसीच्या संकेत स्थळावर १० जून नंतरच्या या दोन रेल्वे गाड्यांचे आरक्षण सुरु करण्यात आले आहे. शुक्रवारपासून हे आरक्षण सुरु झाले आहे. यामुळे गणेश उत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.

हे सुद्धा वाचा

विशेष रेल्वे सुरु

कोकण आणि मध्य रेल्वेने कोकण मार्गावर उन्हाळी सुट्यांमध्ये 36 विशेष वातानुकूलित रेल्वे सुरु केल्या आहेत. ही रेल्वे 26 एप्रिल ते 2 जूनपर्यंत आहे. यामुळे कोकणवासीयांना वातानुकूलित रेल्वेतून प्रवाशाचा आनंद मिळणार आहे. या विशेष रेल्वेमध्ये 15 तृतीय वातानुकूलित कोच आहे. तसेच मुंबई आणि दानापूर दरम्यान दोन विशेष रेल्वे चालवली जाणार आहे. ट्रेन संख्या 01017 एसी स्पेशल ट्रेन 26 एप्रिल ते 2 जूनपर्यंत प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, रविवार असणार आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन रात्री 10.15 वाजता ही गाडी सुटणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.