महाराष्ट्राला मिळाली आणखी एक वंदे भारत, पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन

Vande Bharat Express | वंदे भारत एक्स्प्रेस देशात चांगलीच लोकप्रिय झाली आहे. विविध राज्यातून ही एक्स्प्रेस सोडण्याची मागणी वाढत आहे. महाराष्ट्रातून आतापर्यंत पाच वंदे भारत एक्स्प्रेस धावत होत्या. आता सहावी ट्रेन मिळाली आहे. येत्या ३० तारखेपासून ही गाडी सुरु होणार आहे.

महाराष्ट्राला मिळाली आणखी एक वंदे भारत, पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन
Follow us
| Updated on: Dec 22, 2023 | 2:10 PM

मुंबई, दि.22 डिसेंबर | देशभरात आकर्षक लूक आणि आपल्या वेगामुळे लोकप्रिय झालेली वंदे भारत रेल्वे महाराष्ट्रातून पाच ठिकाणी धावत आहे. आता महाराष्ट्राला सहावी रेल्वे मिळाली आहे. वंदे भारत लवकरच मराठवाड्यातून धावणार आहे. मध्य रेल्वेला वंदे भारतचे रॅक मिळाले असून मुंबई ते जालना दरम्यान ही रेल्वे धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या रेल्वेला ३० डिसेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवणार आहे. वंदे भारत रेल्वे अयोध्या-आनंद विहार, नवी दिल्ली-वैष्णवो देवी, अमृतसर-नवी दिल्ली, जालना-मुंबई आणि  कोइंबतूर-बंगळूरु येत्या ३० तारखेपासून धावणार आहे. तसेच पूल-पूश तंत्रज्ञान असलेली अमृत भारत नावाच्या दोन रेल्वे देशात प्रथमच धावणार आहेत.

महाराष्ट्राला मिळाली सहावी रेल्वे

महाराष्ट्रात पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते गांधीनगर सुरु झाली होती. सहा दिवस धावणारी या रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मुंबई ते सोलापूर, मुंबई ते साईनगर शिर्डी, मुंबई ते गोवा आणि नागपूर ते बिलासपूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्या. आता ३० डिसेंबरपासून मुंबई ते जालना ही रेल्वे सुरु होणार आहे. प्रवासाचा कमी वेळ, चांगल्या सुविधा आणि वाजवी भाडे यामुळे विमान प्रवासापेक्षा अनेक जण वंदे भारत एक्स्प्रेसला प्राधान्य देत आहेत.

हे सुद्धा वाचा

अमृत भारत रेल्वे प्रथमच दाखवणार

अमृत भारत रेल्वे नवी दिल्ली ते दरभंगा दरम्यान धावणार आहे. तसेत दुसरी गाडी मालदा-बंगळूरु दरम्यान चालवण्यात येणार आहे. श्रमिक कामगारांना लक्षात ठेऊन ही गाडी सुरु केली आहे. या रेल्वे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र या राज्यातून सुरु करण्यात येणार आहे. तसेच अमृत भारत रेल्वे एसी-1,2,3 कोच असलेलीही धावणार आहे. राजधानी-शताब्दी एक्स्प्रेसप्रमाणे या गाडीचा वेग जास्तीत जास्त 130 किमी असणार आहे. पूल-पूश तंत्रज्ञान असल्यामुळे राजधानी-शताब्दीपेक्षा अधिक वेग या गाडीचा असणार आहे. अमृत भारत ट्रेनचा तिकीट दर सामान्य रेल्वे पेक्षा 10-15 टक्के अधिक असणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.