Omicron जनजागृती; ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या उपाध्यक्षांची चक्क नाशिक ते शिर्डी 90 किमीची धाव, 6 वर्षांपासून उपक्रम

जांगडा यांनी बेटी बचाव, बेटी पढाओ, स्त्री भृण हत्या, स्वच्छ भारत अभियान, पाणी बचाव मोहीम याबाबत जनजागृती केली आहे.

Omicron जनजागृती; ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या उपाध्यक्षांची चक्क नाशिक ते शिर्डी 90 किमीची धाव, 6 वर्षांपासून उपक्रम
शिर्डी येथे पोहचल्यानंतर याठिकाणी सुभाष जांगडा यांचा सत्कार करण्यात आला.
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 5:44 PM

नाशिकः कोरोनाने सगळ्यांनाच जेरीस आणले आहे. मात्र, तरीही लोक दुर्लक्ष करतात. साधा मास्क वापरत नाहीत. इतर नियमांचे तर बोलूच नका. हेच पाहून कोरोनाबाबतची जनजागृती करण्यासाठी आणि ओमिक्रॉनचे संकट दूर व्हावे म्हणून नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुभाष जांगडा यांनी नाशिक ते शिर्डी हे 90 किलोमीटर अंतर धावत पूर्ण केले आणि साईबाबांचे दर्शन घेत त्यांना संकटनिवारणाचे साकडे घातले.

कोण आहेत जांगडा?

सुभाष जांगड़ा हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असून, ते कोलकत्ता रोडवेजचे भागीदार आहेत. तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनमध्ये महत्वाच्या पदावर काम पाहत आहेत. नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो. ते स्वत: देखील सामाजिक बांधीलकीतून नेहमी समाजउपयोगी वेगळे कार्यक्रम राबवित असतात. ते गोल्फ क्लब नाशिकचेही सदस्य आहेत.

नाशिक ते शिर्डी अंतर जांगडा यांनी धावून पूर्ण केले.

6 वर्षांपासून जनजागृती

गेल्या सहावर्षांपासून जांगडा हे नाशिक ते शिर्डी विविध सामाजिक संदेश देण्यासाठी धावत असतात. जांगडा यांचे यंदाचे सातवे वर्ष असून त्यांनी नाशिक ते शिर्डी हे अंतर धावून पूर्ण करत कोरोनाविषयक ऑमिक्रॉन या व्हेरीयंटबाबत जनजागृती केली. या अगोदर जांगडा यांनी बेटी बचाव, बेटी पढाओ, स्त्री भृण हत्या, स्वच्छ भारत अभियान, पाणी बचाव मोहीम याबाबत जनजागृती केली आहे. यंदाच्या वर्षी त्यांनी कोरोना विषयक जनजागृती करत कोरोनासह ऑमिक्रॉन या व्हेरीयंटचे संकट दूर करण्यासाठी साईचरणी साकडे घातले. तसेच कोरोना विषयक दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले.

गावोगावी स्वागत

सुभाष जांगडा यांचे नाशिकरोड, सिन्नर, पांगरी, वावी यासह गावागावात जंगी स्वागत करण्यात आले. जांगडा यांच्यासोबत असलेले सहकारी देखील यावेळी धावले. शिर्डी येथे पोहचल्यानंतर याठिकाणी सुभाष जांगडा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ सल्लागार जयपाल शर्मा, राजेश इसर्वाल, राजवीर जांगडा, मोहित जांगडा, राहुल जांगडा, योगिता निकम, रुपाली मुंढे, दिनेश जांगडा, नवीन वर्मा आदी सहभागी झाले होते.

इतर बातम्याः

Hindu Vs Hindutv| निवडणुकीच्या मैदानात कोण चालणार, काँग्रेस टक्कर देणार की भाजपच्या जाळ्यात अडकणार…?

Kashi Vishwanath Corridor: हम आप सब काशीवासी लोगोनसे प्रणाम करत है; ज्या भाषेतून मोदी बोलले ती बोली माहीत आहे का?

Kashi Vishwanath Corridor| पंतप्रधान मोदींचे काशी विश्वनाथाच्या साक्षीने तीन संकल्प; देशासाठी जनता जनार्दनाला साकडे!

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.