तुपकरांच्या आंदोलनाला हिंसक वळण; वाशिममध्ये वीज उपकेंद्र पेटविण्याचा प्रयत्न

रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागत असल्याचे पहायला मिळत आहे. तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाशिम जिल्हातील कामरगाव येथील वीज उपकेंद्र पेटविण्याचा प्रयत्न केला आहे.

तुपकरांच्या आंदोलनाला हिंसक वळण; वाशिममध्ये वीज उपकेंद्र पेटविण्याचा प्रयत्न
ravikant tupkar
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 7:14 AM

वाशिम – सोयाबी आणि कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सोयाबीनला 8 हजार तर कापसाला 12 हजार रुपये भाव मिळावा अशी मागणी तुपकर यांनी केली आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान आता या आंदोलनाला हिंसक वळण लागत असल्याचे पहायला मिळत आहे. तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाशिम जिल्हातील कामरगाव येथील वीज उपकेंद्र पेटविण्याचा प्रयत्न केला आहे.

आंदोलक पोलीस आमने-सामने 

दरम्या दुसरीकडे शुक्रवारी रात्री देखील आंदोलस्थळी पोलीस आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्यचे पहायला मिळाले. पोलीस आणि कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारानंतर आंदोलनस्थळावरील पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे.

काय आहेत मागण्या ?

कापसाला 12 हजार रुपये आणि सोयाबीनला 8 हजार रुपये भाव मिळावा, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. सरकारने सोयापेंड आयात केल्यामुळं सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत. पाऊस आणि अतिवृष्टीनं उत्पादनही प्रभावित झाले आहे. त्यामुळे सोयाबीन आणि कापसाचे भाव वाढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई न देणाऱ्या पीकविमा कंपन्यांवर कारवाई करावी, वीजबिल थकलेल्या शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापू  नये, अशा विविध मागण्यांसाठी तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.

संबंधित बातम्या 

कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार; चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली खंत

‘निवडणुकीत हरवा, भाजपची जिरवा’, काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांची मोदींच्या घोषणेवर बोचरी टीका

Kisan Andolan News: हुकूमशहा राज्यकर्त्यांचं गर्वहरण झालं, सोनिया गांधींची मोदींवर सडकून टीका

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.