Weather Forecast : राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्र ते मराठवाड्यात पावसाचा ॲलर्ट
आयएमडीनं 8 आणि 9 जानेवारीला विदर्भातील काही जिल्ह्यांन यलो ॲलर्ट केला आहे. महाराष्ट्रासह नवी दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि मध्य भारतात पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई : भारतीय हवामान विभागाच्यावतीनं पुढील चार दिवसात विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर भारतावरील ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव पडण्याची दाट शक्यता असल्यानं महाराष्ट्रात 6 ते 9 जानेवारी दरम्यान हलका ते मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. आयएमडीनं 8 आणि 9 जानेवारीला विदर्भातील काही जिल्ह्यांन यलो ॲलर्ट केला आहे. महाराष्ट्रासह नवी दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि मध्य भारतात पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तरेकडील वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम;राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता & काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस: 6 – 9 जानेवारी 6 धुळे,नंदुरबार 7 धुळे,नंदुरबार,जळगाव,नाशिक,अहमदनगर 8 ठाणे पालघर व उत्तर महाराष्ट्र,विदर्भातील काही भाग 9 मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग – IMD pic.twitter.com/RS8FiSaxAC
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 5, 2022
राज्यात हलक्या पावसाची शक्यता
उत्तरेकडील वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर जाणवणार आहे. येत्या चार दिवसात राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 6 जानेवारी : धुळे,नंदुरबार 7 जानेवारी : धुळे,नंदुरबार,जळगाव,नाशिक,अहमदनगर 8 जानेवारी : ठाणे पालघर व उत्तर महाराष्ट्र,विदर्भातील काही भाग 9 जानेवारी : मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग
पुढील चार दिवसात अवकाळी पावसाची शक्यता
हवामान विभागाकडून विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात आगामी 4 दिवसात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 6 ते 9 जानेवारी दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदूरबार आणि जळगाव या जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर नाशिक,अहमदनगर ठाणे आणि पालघर मध्येही पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्येही पाऊस हजेरी लावू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आयएमडीकडून अॅलर्ट जारी
भारतीय हवामान विभागानं पुढील चार दिवसांसाठी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स मुळं बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यांना 8 जानेवारीला यलो अॅलर्ट देण्यात आलाय. तर, 9 जानेवारीला अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्याला यलो अॅलर्ट देण्यात आलाय.
अवकाळीचा शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसणार?
आगामी चार दिवसांमध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. कोरोना आणि आर्थिक संकटातून सावरणाऱ्या शेतकऱ्यांचं अवकाळी पावसानं आणखी एकदा नुकसान होण्याची भीती आहे.
कोल्हापूरमध्ये धुक्याची चादर
वाढलेल्या थंडीमुळे कोल्हापूर शहर आणि परिसरात धुक्याची चादर पसरली आहे.बोचरी थंडी आणि धुक्याची चादर असं हे वातावरण गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात अनुभवायला मिळतंय. विशेषतः नदीकाठच्या भागात या थंडीचा जोर अधिक दिसून येतोय. धुक्याची चादर पसरल्यानं वाहनधारकांना सकाळी देखील गाडीची लाईट सुरु करून प्रवास करावा लागतो तर थंडी पासून बचाव करण्यासाठी गरम कपडे घालूनच नागरिकांना बाहेर पडावे लागतंय. कोल्हापूर जिल्ह्याचा पारा 15 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. पुढच्या काही दिवसात हा आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापेक्षाही बोचर्या थंडीचा सामना कोल्हापूरकरांना करावा लागणार आहे.
इतर बातम्या:
Cotton Rate : उत्पादन घटल्यानेच कापसाला विक्रमी दर, हंगामात अतिवृष्टीचा अडसर कायम राहिला
अंबा साखर कारखाना पवारांच्या घशात घालण्याचा डाव, माजी आमदार माणिक जाधव यांचा आरोप
Weather Forecast imd predicted unseasonal rain due to western disturbance Marathwada and Vidarbha North Maharashtra in next four days issue yellow alert