Weather Forecast : कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, IMD कडून यलो ॲलर्ट जारी
राज्यात येत्या 2 तारखेपर्यंत विविध ठिकाणी पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे.कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा इशारा वेधशाळेनं दिला आहे.

मुंबई: भारतीय हवामान विभागानं (IMD) दिलेल्या इशाऱ्यानुसार 30 नोव्हेंबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत 1 डिसेंबरलाला पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे, त्याचा प्रभावी राज्यात काही ठिकाणी होण्याची शक्यता असल्यानं 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत मेघगर्जनेसह,जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तर, काही ठिकाणी हलका पाऊस ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस
राज्यात येत्या 2 तारखेपर्यंत विविध ठिकाणी पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे.कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा इशारा वेधशाळेनं दिला आहे.
के. एस. होसाळीकर यांचं ट्विट
29/11;महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत 1 Dec ला पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता. हि सिस्टिम येणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्सशी मिळून,त्याचा प्रभावी राज्यात काहि ठिकाणी 30 Nov-2 Dec मेघगर्जनेसह,जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता.काही ठिकाणी हलका पाऊस. -IMD pic.twitter.com/XFcrDQGH13
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 29, 2021
विविध जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी
हवामान विभागानं 30 नोव्हेंबरसाठी ठाणे, मुंबई, रायगड, पालघर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, नाशिक आणि अहमदगर, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, उस्मानाबद, लातूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी केला आहे. यलो अॅलर्ट देण्यात आला नसला तरी पुणे, सोलापूर, जळगाव जिल्ह्यात देखील पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
1 डिसेंबर: रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, अहमदनगर, नाशिक, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
2 डिसेंबर: रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, पालघर, अहमदनगर, नाशिक, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, नंदुरबार, धुळे, जालना या जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये
वाऱ्याचा वेग ताशी 65 किलोमीटरवर पोहोचण्याची शक्यता असल्यानं 1 आणि 2 डिसेंबरला दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीजवळच्या तर 2 आणि 3 डिसेंबरला उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीजवळच्या समुद्रात मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये,असा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईतही पाऊस
भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या माहितीनुसार 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला मुंबईत पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.
इतर बातम्या:
Weather Forecast imd rains predicted unseasonal rain on 30 November to 2 December at kokan and central Maharashtra and Marathwada