AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Forecast : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 48 तासात मेघगर्जनेसह पाऊस, IMD कडून यलो अलर्ट जारी

पुढच्या 2 दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आयएमडीनं वर्तवली आहे. मच्छिमारांनी अरबी समुद्रात 21 आणि 22 नोव्हेंबरला जाऊ नये, असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.

Weather Forecast : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 48 तासात मेघगर्जनेसह पाऊस, IMD कडून यलो अलर्ट जारी
संग्रहित छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 21, 2021 | 3:12 PM
Share

मुंबई: भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. पूर्व मध्य व पश्चिम मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावर जाणवणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. परिणामी पुढच्या 2 दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आयएमडीनं वर्तवली आहे. मच्छिमारांनी अरबी समुद्रात 21 आणि 22 नोव्हेंबरला जाऊ नये, असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पुढच्या 48 तासांमध्ये पावसाची शक्यता

अरबी समुद्रातील हवेची स्थिती पाहता प्रादेशिक हवामान विभागाकडून अंदाज जारी करण्यात आले आहेत. तर,हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सागंली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना 21 नोव्हेंबरसाठी यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, 22 नोव्हेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.

दक्षिण भारतात पुन्हा मुसळधार

दक्षिण भारतातील आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. हवामान विभागानं पुढच्या 48 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तामिळनाडू, कर्नाटक, केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. आंध्रप्रदेश आणि इतर राज्यात दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. गोवा आणि तळकोकणातही पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

दक्षिण भारतात सुरु असलेल्या पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वेगाड्या , एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. हावड़ा- यशवंतपुर दूरंतो एक्सप्रेस, संतरागाछी- तिरुपति एक्सप्रेस, हावड़ा- चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस, हावड़ा- तिरुचिरापल्ली एक्सप्रेस आणि हटिया- यशवंतपुर एक्सप्रेस रद्द करण्यात आलीय.

इतर बातम्या:

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपची मोठी खेळी, विनोद तावडेंवर नवीन जबाबदारी, जे. पी. नड्डांकडून नियुक्ती

उल्हासनगरात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, कलानी परिवाराच्या हाती सत्तेचा रिमोट कंट्रोल

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.