Weather Update: राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा नवा अंदाज
भारतीय हवामान विभागाच्या मुंबई व नागपूर येथील कार्यालयांद्वारे जारी केलेल्या हवामानाच्या इशाऱ्या नुसार राज्यात पुढचे 3 दिवस मुसळधार पाऊस होऊ शकतो. खास करून मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात जोर जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.
मुंबई : बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात विदर्भासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई व नागपूर येथील कार्यालयांद्वारे जारी केलेल्या हवामानाच्या इशाऱ्या नुसार राज्यात पुढचे 3 दिवस मुसळधार पाऊस होऊ शकतो. खास करून मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात जोर जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
भारतीय हवामान विभागानं शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. हवामान विभागानं मराठवाडा विभागात मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्याप्रमाणं पावसाच्या सरी कोसळल्यास शेतकऱ्यांची पिक वाचतील, असं हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी सांगितलं आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत असल्यानं त्याच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन ते चार दिवसात असल्याचं सांगण्यात आलं आहे. याशिवाय कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
IMD Mumbai has issued heavy rainfall warnings for Maharashtra for coming 3 days, especially for Marathwada region and it will be good for farmers in that region and around, who are waiting for good spell of rains for their crops.@RMC_Mumbai https://t.co/FzesWQ8KBb
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 16, 2021
राज्यातील आजचा पावसाचा अंदाज
पालघर, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, सातारा नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड,परभणी, बीड, हिंगोली, जालना, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आलाय. वरील सर्व जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आलाय.
17 ऑगस्टला राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांना यलो अॅलर्ट
हवामान विभागानं 17 ऑगस्टला राज्याच्या विविध भागात पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
18 ऑगस्टला कोकण ते विदर्भात पाऊस
कोल्हापूर सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आलाय. तर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, सांगली, बीड, उस्मानाबाद, चंद्रपूर, वर्धा, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याला यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
इतर बातम्या:
पाऊस लांबल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली, पिकं वाचवण्यासाठी धडपड सुरु, आर्थिक फटका बसण्याची भीती
Weather Update: मान्सून सक्रिय होतोय; IMD कडून ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज
Weather Update IMD predicted heavy rainfall in Kokan, Marathawada, Vidarbha and Madhya Maharashtra