Weather Alert : कोकणसह राज्यात ‘या’ ठिकाणी आजही पाऊस, हवामान विभागाकडून इशारा
मुंबई, पुणे, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यांमध्ये दाट धुक्याची शक्यता असून वाहनचालकांसाठी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई : गेल्या 3-4 दिवसांपासून राज्यातील हवामानात (Weather) बदल झाले. ऐन थंडीमध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण आहे तर अनेक ठीकाणी पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार अजुनही कायम असल्यामुळे राज्यात आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यांमध्ये दाट धुक्याची शक्यता असून वाहनचालकांसाठी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. (Weather update mumbai rain prediction maharashtra today weather news today)
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आजही संपूर्ण ढगाळ वातावरण असणार आहे. थंडगार वारे आणि मधूनच पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. यामुळे हवेतील गारवा आणखी वाढेन. खरंतर, अरबी समुद्राच्या पश्चिम भाग, महाराष्ट्राची किनारपट्टी आणि मध्यप्रदेश या भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहेच. पण यातच या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आता कमी होऊन कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश या दिशेने बाष्प पुढे सरकले आहे. इतकंच नाही तर बंगालच्या उपसागरात पुन्हा चक्रिवादळासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दहा ते पंधरा दिवस थंडीत चढउतार राहणार असून किमान तापमान कमीअधिक स्वरूपात राहणार आहे.
आज ‘या’ जिल्हयात होऊ शकतो पाऊस
हवामानातील सततच्या बदलांमुळे आज राज्यभर पावसाची शक्यता आणि घनदाट धुकं पसरण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. यामुळे ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ अशा भागांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांना धोका असणार आहे.
Pune and Ahmednagar and parts of Satara districts now partly cloudy sky with light to mod rains, as seen from DWR Mumbai Mumbai reduction in rainfall activity in last one hour. pic.twitter.com/CsCTlTup7W
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 14, 2020
दरम्यान, अनेक दिवस ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी. गहू, हरभरा पिकांना जपावं असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे. त्याचा परिणाम कोकणात पहायला मिळतो आहे. रत्नागिरीत आज पहाटेपासून ढगाळ वातावरण आहे. सकाळच्या सुमारास आज तुरळक पावसाच्या सरी रत्नागिरीत पहायला मिळाल्या. यामुळे सगळ्यात मोठा फटका पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता आहे.
ढगाळ हवामानाचा रब्बी पिकं आणि फळबागांना फटका
खरंतर, अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. कोकणासह नागपूर-विदर्भातही ढगाळ हवामान आहे. यामुळे रब्बी पिकं आणि फळबागांना फटका बसला आहे. विदर्भात चणा, गहू, तूर, भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. इतकंच नाही तर रब्बी पिकांवरही कीड- रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.
सध्या ढगाळ वातावरणामुळे मराठवाड्यातही अनेक पिकांचं नुकसान झालं आहे. हरभरा, तूर, गहू, जोंधळा, करडी, सूर्यफूल या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे कोरोनासारख्या जीवघेण्या संसर्गाच्या झळा बसल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पुन्हा पाणी आलं आहे. (Weather update mumbai rain prediction maharashtra today weather news today)
इतर बातम्या –
महाराष्ट्रात आता पुन्हा-पुन्हा वादळं, पाऊस येणार? संशोधनात धक्कादायक खुलासा
अवकाळी पावसानं महाराष्ट्र का धास्तावला? ढगाळ वातावरणामुळे होणार भयंकर परिणाम
(Weather update mumbai rain prediction maharashtra today weather news today)