AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनुष्यबाणाची महासुनावणी, केंद्रीय निवडणूक आयोगात काय-काय सुरुय? पाहा सुनावणीचे Live Updates

जोपर्यंत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरुय तोपर्यंत निवडणूक आयोगात सुनावणी नको, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केलीय.

धनुष्यबाणाची महासुनावणी, केंद्रीय निवडणूक आयोगात काय-काय सुरुय? पाहा सुनावणीचे Live Updates
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे
| Updated on: Jan 10, 2023 | 6:02 PM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) धनुष्यबाणावर सुनावणीला सुरुवात झालीय. जोपर्यंत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी सुरुय तोपर्यंत निवडणूक आयोगात सुनावणी नको, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी केलीय. ठाकरे गटाकडून संजय राऊत (Sanjay Raut), अनिल देसाई (Anil Desai) आणि अनिल परब (Anil Parab) हे निवडणूक आयोगात उपस्थित आहेत. तर शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे पुतणे वकील निहार ठाकरे (Nihar Thackeray) हे उपस्थित आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरु झाल्यानंतर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. सुप्रीम कोर्टात जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये, असं सिब्बल यांनी म्हटलं. निवडणूक आयोगाकडून युक्तीवाद केला जाणार असेल तर तो युक्तीवाद हा प्राथमिक आहे की अंतिम आहे ते स्पष्ट करण्यात यावं, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली.

कपिल सिब्बल आपली भूमिका मांडत असताना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तीवाद करण्यास सुरुवात केला. आज कुणीही अपत्रा ठरवण्यात आलेलं नाही. त्यामुळे शिवसेना, धनुष्यबाण कुणाचं हे ठरवायला कोणताही अडथला नाही, असा युक्तीवाद शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी केला.

जेठमलानी यांनी कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केला. कारण शिवसेनेतील 40 आमदार आणि 13 खासदार जरी शिंदे गटात गेले असले तरी त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं नाही, असं जेठमलामी यांचं म्हणणं आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी जेठमलानी यांनी केलीय.

आमचा जर प्राथमिक युक्तीवाद फेटाळला तर आम्हाला तशी ऑर्डर आयोगाने करावी म्हणजे आम्हाला अपील करता येईल, असं म्हणत कपिल सिब्बल आणि जेठमलानी यांच्यातच झुंपलेली बघायला मिळाली.

आम्ही एकत्र ऑर्डर करु, असं निवडणूक आयोगाने त्यावर स्पष्ट केलं.

शिंदे गटाकडे आमदार आणि खासदारांचं बहुमत आहे, असा युक्तीवाद वकील महेश जेठमलानी यांनी केला. कायद्याच्या निकषानुसार शिंदे गट योग्य असल्याचा युक्तीवाद वकील जेठमलानी यांनी केला.

केंद्रीय निवडणूक आयोगात शाखाप्रमुखांपासून, संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुखांची प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहेत. पण शिंदे गटाकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांवर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला. शिंदे गटाकडून सादर करण्यात आलेले कागदपत्रे बनावट असल्याचा दावा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला.

‘उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुखपद बेकायदेशीर’, शिंदे गटाच्या वकिलांचा मोठा युक्तीवाद

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी शिवसेनेच्या घटनेबद्दल माहिती दिली.यावेळी त्यांनी पक्षाची रचना काय हे वाचून दाखवली.

शिवसेनेची जुनी घटना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे केंद्रीत होती. पण नंतर ती न बदलता उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख असे नाव स्वतःसाठी घेतले. पण त्यामुळे ते शिवसेनेचे प्रमुख होत नाहीत, असं जेठमलानी आपल्या युक्तीवादात म्हणाले.

बाळासाहेबांचे निधन झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे सगळे अधिकार घेणारे बदल शिवसेनेच्या घटनेत करणे हा बोगसपणा आहे. त्यामुळे ते बेकायदेशीर आहे, असा युक्तीवाद महेश जेठमलानी यांनी केला.

हे सांगताना जेठमलानी यांनी सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणचा दाखलाही दिला. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता म्हणून निवड करण्यात आली होती, असा युक्तीवाद जेठमलानी यांनी केला.

शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांच्यानंतर शिंदे गटाचे दुसरे वकील मणिंदर सिंग यांनी युक्तीवाद सुरु केला. सिंग यांनीसुद्धा राष्ट्रीय कार्यकारिणीचा दाखला दिला जातोय.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.