आम्ही काही युतीचा प्रस्ताव दिला नाही, राऊत काय म्हणतात त्याला महत्त्व नाही; chandrakant patil यांचे रोखठोक विधान
आम्ही काही शिवसेनेला युतीचा(shivsena-bjp) प्रस्ताव दिला नाही. संजय राऊतांनी (sanjay raut) कधीही निवडणूक लढवली नाही. त्यामुळे राऊत काय म्हणाले याला महत्त्व नाही. ते जे म्हणाले त्याचे परिणाम त्यांना निवडणुकीत दिसेल.
मुंबई: आम्ही काही शिवसेनेला युतीचा(shivsena-bjp) प्रस्ताव दिला नाही. संजय राऊतांनी (sanjay raut) कधीही निवडणूक लढवली नाही. त्यामुळे राऊत काय म्हणाले याला महत्त्व नाही. ते जे म्हणाले त्याचे परिणाम त्यांना निवडणुकीत दिसेल, अशी रोखठोक प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भविष्यात भाजपसोबत युती होणार नाही. आम्ही आमच्या निर्णयावरून मागे जाणार नाही, असं विधान केलं होतं. त्यावरून भाजपमधून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनीही प्रतिक्रिया व्यक्त करत राऊतांवर टीका केली. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. संपावर सरकारने तोडगा काढलाच पाहिजे, असं ते म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला नाही तर एक लाख कुटुंब उद्ध्वस्त होतील. सातवा वेतन आयोग देण्याबाबत काही उपया निघाला पाहिजे. ग्रामीण भागात लोकांचे हाल होत आहेत. चार महिने संप सुरू आहे. यावर सकारात्मक मार्ग काढला पाहिजे. विलीनिकरण म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा असतात. चांगल्या पगारवाढीचा प्रस्ताव कर्मचाऱ्यांकडे नेला तर कर्मचारी नक्की एक पाऊल मागे जातील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
शिवसेनेकडे फक्त मुख्यमंत्रीपद राहील
शिवसेनाला सर्व सोडायला लागणार केवळ मुख्यमंत्री पद त्यांच्याकडे राहील. कोल्हापूरमध्ये सात पैकी 5 वेळा शिवसेनाला आमदार झाला. ती जागा काँग्रेसला सोडावी लागली. सतेज पाटील यांच्या कामाची पद्धत सर्व घ्यायची अशी आहे. त्यामुळे कोल्हापूर काय, मावळ काय, शिवसेनेला सर्व द्यावे लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
राऊत काय म्हणाले?
भविष्यात शिवसेना-भाजप एकत्र येणार नाही. एखादी भूमिका घेतली की त्यावरून शिवसेना मागे येणार नाही. ज्या पद्धतीनं 25 वर्ष एकत्र काम केलं. ते विसरुन भाजप सूडानं वागतंय. त्यामुळे एकत्र येणं शक्य नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी नागपुरात मीडियाशी संवाद साधताना स्पष्ट केलं. त्यामुळे आगामी काळात शिवसेना-भाजप युती होणार नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं असून युतीच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे. तसेच शिवसेनेची आगामी वाटचाल काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच होणार असल्याचेही संकेत मिळत आहेत.
संबंधित बातम्या:
Video – केंद्रीय तपास यंत्रणा खुळखुळा झालाय, Sanjay Raut यांचा भाजपवर निशाणा
MIMला विरोध, पण शिवसेनेची मुस्लिम लीगसह सेक्युलर पक्षांशीही अनेकदा युती, इतिहास काय सांगतो?
ठाकरे सरकारचा गृहनिर्माण संस्थासाठी मोठा निर्णय, शासकीय निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्तीमधून सूट