48 तास, राष्ट्रपती राजवट, हॉटेल पॉलिटिक्स, महाराष्ट्रात काय-काय घडणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होत असून, ४८ तासांत सरकार स्थापना होणे आवश्यक आहे. एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडी आणि महायुतीत सत्ता स्थापनेसाठी तीव्र स्पर्धा असण्याची शक्यता आहे. अशावेळी अपक्षांची भूमिका निर्णायक ठरू शकते. तसेच राजकीय पक्षांसमोर आमदारांना एकत्र ठेवण्याचे आणि संख्याबळ जुळवून सरकार स्थापनेचे आव्हान आहे. अन्यथा राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू होण्याचीही शक्यता आहे.

48 तास, राष्ट्रपती राजवट, हॉटेल पॉलिटिक्स, महाराष्ट्रात काय-काय घडणार?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
Follow us
| Updated on: Nov 22, 2024 | 4:32 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. पण निकालाच्या आधीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांना धडकी भरली आहे. त्यामागे कारण देखील तसंच आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांना केवळ 48 तासांचा कालावधी असणार आहे. या काळात सत्ता स्थापन करण्यात यश आलं नाही तर राज्यात गेल्या निवडणुकीसारखं राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या निकालानंतर केवळ 48 तास असल्याने प्रत्येक पक्षासाठी ते 48 तास जास्त आव्हानाचे असणार आहेत. विशेष म्हणजे मतदानानंतर विविध संस्थांचे सर्व्हेचे आकडे जाहीर करण्यात आले आहेत.

एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, राज्यात सत्ता स्थापनेत महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरस असणार आहे. या निवडणुकीत अपक्षांची भूमिका ही जास्त महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपक्षांची बार्गेनिंग पावर वाढणार आहे. अशा परिस्थितीत अपक्षांची मनधरणी करणं, संख्यांची जुळवाजुळव करण्याचं आव्हान राजकीय पक्षांना असणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व केवळ 48 तासांतच करावं लागणार आहे.

हॉटेल पॉलिटिक्स होणार?

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही शक्यता खरी ठरल्यास सत्ता स्थापनेचा कालावधी वाढू शकतो. अशावेळी आपल्या आमदारांना सांभाळून ठेवणं, एकत्र ठेवणं, आमदार फुटू न देणं, याचंदेखील आव्हान राजकीय पक्षांना असणार आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी आणि महायुतीचे घटक पक्ष दुसऱ्या राज्यातील पंचतारांकीत हॉटेलमध्ये आपापल्या आमदारांना ठेवण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

कोणता पक्ष कुठे आमदार ठेवू शकतो?

महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटक राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे काँग्रेस आपल्या आमदारांना आणि इतर मविआच्या आमदारांनादेखील कर्नाटकातील पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवण्याची शक्यता आहे. तर भाजप महायुतीच्या आमदारांना शेजारच्या गुजरात राज्यात घेऊन शकते. कारण गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे.

राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरणार

दरम्यान, युती-आघाडीऐवजी सर्वात मोठा पक्ष म्हणून सरकार स्थापनेचं निमंत्रण देण्याचा सर्वस्वी अधिकार राज्यपालांना आहे. निकालाचा कौल अस्पष्ट आल्यास राज्यपाल पहिल्यांदा सत्ता स्थापनेचं आमंत्रण कुणाला देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राज्यातील सध्याच्या विधानसभेची मुदत ही येत्या 26 नोव्हेंबरला रात्री 12 वाजता संपणार आहे. त्यामुळे 26 तारखेला 12 वाजेपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास रात्री 12 वाजेपासून पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. निकालानंतर बहुमतासाठी आधी कोण दावा करतं, राज्यपाल कुणाला बोलवतात, हे दोन मुद्दे जास्त कळीचे ठरणार आहेत.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.