जेव्हा अब्दुल सत्तार ‘ऐ मेरे वतन के लोगो’ गातात! निमित्त असतं लतादीदींच्या शोकसभेचं, पाहा Video
देशभरातून त्यांना अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली वाहिली असल्याचं आपणं पाहिलं. काल औरंगाबाद त्यांच्या श्रध्दांजली शोक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.
औरंगाबाद – लता मंगेशकर (lata mangeshkar) यांनी रविवारी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी मुंबईतल्या ब्रीच कॅन्डी रूग्णालयात (breach candy hospital) अखेरचा श्वास घेतला. ज्यावेळी लता मंगेशकर यांचा मृत्यू झाल्याची बातमी संपुर्ण देशभर परसली त्यावेळी देशातील चाहत्यांनी त्यांना अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली वाहिली असल्याचे आपण पाहिले. तसेच त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक सिनेसृष्टीतील दिग्गज, राजकीय मंडळी आणि त्यांच्याशी जिव्हाळा असणारी अनेक लोकांनी त्यांचं शिवाजी पार्क (shivaji park) परिसरात अंतिम दर्शन घेतलं. देशभरातून त्यांना अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली वाहिली असल्याचं आपणं पाहिलं. काल औरंगाबादमध्ये श्रध्दांजली शोक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी तिथं राज्य मंत्री अब्दुल सत्तार हेही उपस्थित होते. त्यांनी सुध्दा तिथं अनोख्या पध्दतीनं श्रध्दांजली वाहिली.
30 हजारांच्या आसपास गाणी गायली आहेत
देशात अनेक ठिकाणी त्यांना श्रध्दांजली वाहण्याचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये काल शोक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी अनेक मान्यवरांनी तिथं लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच लता दीदींनी आतापर्यंत 30 हजारांच्या आसपास गाणी गायली आहेत. त्याचबरोबर विविध भाषेत त्यांनी गाणी गायली आहेत. त्यामुळे भारतातल्या अनेक ठिकाणी त्यांना श्रध्दांजली वाहिण्याचे कार्यक्रम होतील. औरंगाबादच्या कार्यक्रमात राज्य मंत्री अब्दुल सत्तार लता दीदींचं ये मेरे वतन के लोगो…या गाण्यातील दोन ओळी म्हणाल्या आणि लता दीदींना श्रध्दांजली वाहिली. औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या वतीने श्रध्दांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथं अनेक शिवसैनिक कार्यक्रमाला उपस्थित होते. तिथं अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
आठवणींना उजाळा
लता दीदी लहान असताना त्यांना संगीताची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांंच्या वडिलांनी त्यांना संगीताविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. तसेच त्या लहान असताना त्यांनी अनेक संगीत घरण्यांकडे संगीत शिकण्यासाठी जावं लागलं. त्यांनी मराठीतील एक गाण म्हणून त्यांच्या करिअरला सुरूवात झाली. त्यांना आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्यांनी आत्तापर्यंत अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी आई आणि मुलींसाठी सुध्दा गाणी गायली आहेत अशा अनेक आठवणींना तिथं कार्यक्रमात उजाळा देण्यात आला. लता दीदींनी मुंबईतल्या रूग्णालयात अखेरचा श्वास घेतल्यानंतर देशातील अनेक सेलिब्रिटींनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रध्दांजली वाहिली. प्रत्येक सेलिब्रिटीकडून त्यांना अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली वाहिली.