ठाण्यातील शाळा कधीपासून सुरु होणार? महापालिका प्रशासनाकडून परिपत्रक जारी करत माहिती
ठाणे महापालिकेने परिपत्रक जारी करत पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंदच राहतील, असं परिपत्रकात म्हटलं आहे (Thane School Reopen).
मुंबई : राज्यातील इयत्ता 5 वी ते 8 वी पर्यंतच्या शाळा येत्या 27 जानेवारीपासून सुरु होतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यातील शाळा अद्याप सुरु होणार नाहीत, असे संकेत दिसत आहेत. ठाणे महापालिकेने परिपत्रक जारी करत पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंदच राहतील, असं परिपत्रकात म्हटलं आहे (Thane School Reopen).
मागील आदेशात 16 जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने आज पुन्हा आदेश काढत पुढील सूचना मिळेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. हा आदेश सर्व माध्यमांच्या सर्व शाळा आणि विद्यालयाना लागू असेल (Thane School Reopen).
मुंबईतही शाळा पुढील आदेशापर्यंत बंदच
याआधी मुंबई महापालिकेने परिपत्रक जारी करत पुढील आदेशापर्यंत शाळा बंद राहतील, असं म्हटलं होतं. मुंबईतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या होत्या. “मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरीही अन्य देशांमध्ये कोरोनाची असलेली दुसरी लाट आणि अन्य राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता मुंबई महापालिकेतील सर्व खासगी आणि सरकारी शाळा 16 जानेवारी 2021 पर्यंत पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येतील”, असं मुंबई महापालिकेने जाहीर केलं होतं. त्यानंतर ठाणे महापालिकेनेदेखील पुढील आदेशा येईपर्यंत शाळा बंदच राहतील, असं सांगितलं आहे.
दिवसभराची बित्तंबात, पाहा आजची बात, #TV9Marathi वर दररोज रात्री 10 वा
दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात
दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा कधी घेणार, याबाबत माहिती दिली आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या मधल्या किंवा शेवटच्या काळात घेण्याचा विचार आहे. आगामी काळात याबाबत ठोस निर्णय होईल, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा :