पाकव्याप्त Kashmir भारताला कधी जोडणार?; संजय राऊतांचा भाजपला सवाल

'द काश्मीर फाईल्स' या सिनेमाचा ज्वर ओसरत आहे. काश्मीर हा देशासाठी आणि देशातील जनतेसाठी अत्यंत संवेदनशील विषय आहे. आजपासून नाही, फाळणीपासूनच हा संवेदनशील विषय आहे. अनेक वर्षापासून काश्मीरवरून राजकारण सुरू आहे. आम्हाला वाटलं होतं मोदी सरकार आल्यावर राजकारण थांबेल.

पाकव्याप्त Kashmir भारताला कधी जोडणार?; संजय राऊतांचा भाजपला सवाल
पाकव्याप्त Kashmir भारताला कधी जोडणार?; संजय राऊतांचा भाजपला सवाल Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 10:53 AM

मुंबई: ‘द काश्मीर फाईल्स’ (the kashmir files) या सिनेमाचा ज्वर ओसरत आहे. काश्मीर हा देशासाठी आणि देशातील जनतेसाठी अत्यंत संवेदनशील विषय आहे. आजपासून नाही, फाळणीपासूनच हा संवेदनशील विषय आहे. अनेक वर्षापासून काश्मीरवरून राजकारण सुरू आहे. आम्हाला वाटलं होतं मोदी सरकार (modi government) आल्यावर राजकारण थांबेल. पण ते वाढतच चाललं आहे. या चित्रपटात ज्या गोष्टी दाखवल्या त्यावर मी काही बोलणार नाही. पण या सिनेमात ज्या गोष्टी दाखवल्या आहेत, त्या असत्य आहेत. त्या सत्याला धरून नाहीत असं अनेक लोक म्हणत आहेत. पण तो सिनेमा आहे. ज्याला तो पाहायचा ते पाहतील आणि स्वागत करतील. ज्यांनी पाहिलाय आणि ज्यांना त्यातील ज्या गोष्टी खटकतात त्यावर ते बोलतील. एवढं स्वातंत्र्य या देशात आपल्याला आहे, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमध्ये बेरोजगारी हटवण्यासाठी सर्वात मोठी गुंतवणूक करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याचं काय झालं? पाकव्याप्त काश्मीर हिंदुस्थानात आणून अखंड हिंदुस्थानचं स्वप्न पूर्ण करू अशी घोषणा केली होती. तो पाकव्याप्त काश्मीर कधी जोडताय?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला केला आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपला धारेवर धरलं. सिनेमात किती वास्वत असतं आणि किती काल्पनिक असतं हे लोक पाहतात आणि विसरतात. सिनेमा आवडला तर लोक पाहतील. नाही आवडला तरीही पाहतील आणि आपली भूमिका तयार करतील. काश्मीर हा मनाला भिडणारा विषय आहे. आम्ही काश्मीरमध्ये अनेक वर्षापासून काय झालं हे जवळून पाहिलं. कुणी सिनेमा बनवला ठिक आहे. त्याचा राजकीय फायदा कुणाला होणार नाही. काही लोक त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न होईल. पण त्यांना राजकीय फायदा होणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

चित्रपट बनवणाऱ्यांना पद्मश्रीही मिळेल

या सिनेमातून सत्य लपवलं आहे. अनेक सत्य आहे ते यात यायला हवं होतं. अनेक खोट्या कथा त्यात दाखवल्या आहेत. जे झालं नाही ते दाखवलं आहे असं लोक म्हणत आहेत. मी त्यांना म्हटलं हा एक सिनेमा आहे. ती सत्य घटनेवर आधारीत आहे नाही हे मला माहीत नाही. पण काश्मीरच्या विषयावर सिनेमा आला आहे. भाजप त्याचा प्रचार करत आहे. पंतप्रधान प्रचार करत आहेत. त्यामुळे भाजपचे समर्थक तो पाहणारच. निवडणुकांपर्यंत हा सिनेमा राहणार नाही. या सिनेमाला नॅशनल अॅवार्ड दिलं जाईल. ज्यांनी सिनेमा बनवला त्यांना पद्मश्री, पद्मभूषण दिलं जाईल. वाय प्लस सेक्युरिटी दिली आहेच. ज्या प्रकारे आपल्या देशाचं राजकारण चाललं आहे त्यात हे सर्व होईल हे समजून घेतलं पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

हिंदू-मुस्लिम अजेंडा आणून कधीपर्यंत निवडणुका जिंकणार?

काश्मीरमध्ये हिंदू पंडितांना अत्याचार सहन करावा लागला. हिंदू पंडित आपल्याच देशात निर्वासित झाले. आतापर्यंत त्यांची घरवापसी झाली नाही ही आमची वेदना आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी काश्मीर पंडितांसाठी जे केलं ते काश्मीरी पंडितांच्या हृदयात आहे. पण काश्मीरी पंडितांच्या घर वापसीचं आश्वासन तर भाजप आणि मोदींनी दिलं होतं. आता पर्यंत ते पूर्ण का झालं नाही? काश्मीरच्या विकासाचं आश्वासन दिलं होतं. काश्मीरचा अजून विकास का झाला नाही? काश्मीरमधून बेरोजगारी हटवण्याचं आश्वासन दिलं होतं. ती का हटली नाही? फक्त हिंदू-मुस्लिम अजेंडा आणून कधीपर्यंत तुम्ही निवडणुका जिंकणार आहात? जोपर्यंत चालतंय तोपर्यंत चालणार आहे. परंतु एक दिवस \लोक तुम्हाला प्रश्न विचारतील. काश्मीरच्या मुद्द्यावर राजकारण करणं योग्य नाही. हा संवेदनशील विषय आहे. आता राम मंदिर बनले आहे. काश्मीरमधून 370 कलम हटले आहे. आता पाक व्याप्त काश्मीर आणण्याचं तुम्ही आश्वासन दिलं होतं. ते आता पूर्ण करा, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

Maharashtra News Live Update : भाजप पाकव्यात काश्मीर भारताला कधी जोडणार ते पाहावं लागेल – संजय राऊत

370 कलम काढल्यावरही काश्मिरी पंडितांची घरवापसी नाही, Sanjay Raut यांनी डिवचले; राजकीय आक्रोश करणाऱ्यांना 9 सवाल

शिवसेनेची मोर्चेबांधणी, CM Uddhav Thackeray खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी आज संवाद साधणार

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....