Sanjay Raut: कुठे आहेत दोन ठग?, सोमय्या देशाबाहेर पळून जाऊ शकतात; राऊतांना शंका

Sanjay Raut: शिवसेना नेते संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र आणि देशाची फसवणूक करणारे दोन ठग कुठे आहेत? हा मोठा सवाल आहे.

Sanjay Raut: कुठे आहेत दोन ठग?, सोमय्या देशाबाहेर पळून जाऊ शकतात; राऊतांना शंका
कुठे आहेत दोन ठग?, सोमय्यांचा देशाबाहेर पळून जाऊ शकतात; राऊतांना शंकाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 11:15 AM

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत  (sanjay raut) यांनी आयएनएस विक्रांत (vikrant) प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र आणि देशाची फसवणूक करणारे दोन ठग कुठे आहेत? हा मोठा सवाल आहे. भाजपकडून या दोघांची माहिती का दिली जात नाही? त्यांना कुठे लपवले आहे? हे दोघेही बापबेटे महाराष्ट्राच्या बाहेर असल्याची मला पक्की शंका आहे. त्यांना कोणत्या राज्यात लपवलं आहे. हे दोघेही केंद्रातून अंतरिम बेलची सेटिंग करत असल्याची मला भीती आहे. पण त्यांची सेटिंग होणार नाही. गुन्हा दाखल झाल्यापासून सोमय्या आणि त्यांचा मुलगा गायब आहे. त्यामुळे त्यांच्यावर लुक आऊट नोटीस जारी केली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे.

मेहुल चोकसी आणि किरीट सोमय्यांचं जुनं नातं आहे. त्यामुळे सोमय्या मेहुल चोक्सीकडे अँटिगुवामध्ये तर पळून गेले नाही? अंतरीम बेलसाठी सोमय्या यांची केंद्रातून सेटिंग सुरू आहे. पण त्यात ते यशस्वी होणार नाही, असं सांगतानाच माझ्या मते पोलीस चौकशी करत आहेत. सत्याचा विजय होईल. दोन लफंगे कुठे आहेत. ते देशाबाहेर पळून जाण्याची भीती वाटते, असं राऊत म्हणाले.

सोमय्यांची माफिया टोळी कार्यरत

मी जे बोलतो तो व्यक्तीगत आरोप नसून लोक भावना आहे. देशभावना आहे. त्यामुळे माझा आत्मा तिळ तिळ तुटतोय. पवारांच्या घरी ते स्वत होते त्यांची पत्नी आणि नातवंडं होते. अशावेळी त्यांच्या घरावर हल्ल्याचं षडयंत्र दुर्भाग्यपूर्ण आहे. पोलीस त्याची चौकशी करतील. सेव्ह विक्रांतच्या प्रचंड पैसा जमा करण्यात आला आहे. तो काही छोटा घोटाळा नाहीये. त्याची व्याप्ती मोठी आहे. पूर्ण महाराष्ट्रातून पैसा गोळा करण्यात आला. बापबेट्यांनी ही वसुली केली. त्यांची माफिया टोळी आहे. बिल्डरांकडूनही ते पैसे जमा करतात. इतर राज्यातूनही पैसा गोळा केला. या पैशाचा दुरुपयोग झाला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

खरा सूत्रधार शोधला पाहिजे

यावेळी संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावरही भाष्य केलं. पवारांच्या घरावर हल्ला झाला हे चुकीचं आहे. या हल्ल्यामागचा खरा सूत्रधार शोधला पाहिजे. हल्लेखोरांना माफी देऊ नये, असंही राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या:

Sanjay Raut: सोमय्यांच्या देशविरोधी कृत्यात सामिल होऊ नका अन्यथा राजभवनाची इभ्रतही जाईल; राऊतांचा राज्यपालांना इशारा

भोंग्यावरून मनसेमधली खदखद तीव्र; आता धुळ्याच्या उपमहानगर प्रमुखांचा राजीनामा

Maharashtra News Live Update : कोकणात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता, हवामान खात्याने व्यक्त केला आहे अंदाज

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.