AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डी. वाय. पाटील…. बस्स, नामही काफी है!

मुंबई : बिहार, त्रिपुराचे माजी राज्यपाल आणि काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणासह राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राजकारणासह शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीने राष्ट्रावादीची वाट धरल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. देश-विदेशात शिक्षण आणि वैद्यकीय संस्था, तसेच नवी मुंबईतील खेळाचे भव्य मैदान […]

डी. वाय. पाटील.... बस्स, नामही काफी है!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM
Share

मुंबई : बिहार, त्रिपुराचे माजी राज्यपाल आणि काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणासह राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राजकारणासह शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीने राष्ट्रावादीची वाट धरल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. देश-विदेशात शिक्षण आणि वैद्यकीय संस्था, तसेच नवी मुंबईतील खेळाचे भव्य मैदान असो, ज्या क्षेत्रात पाऊल ठेवलं, तिथे ठोस कामगिरी करत आपल्या नावाचं ब्रँड तयार केलं. ‘डॉ. डी. वाय. पाटील’ बस्स नाम काफी है, अशी कारकीर्द डी. वाय. पाटील यांची आहे.

डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थात तुम्हा-आम्हाला परिचित असलेले नाव म्हणजे ‘डॉ. डी. वाय. पाटील’. 22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापुरात जन्मलेल्या डॉ. डी. वाय. पाटील हे आता 83 वर्षांचे आहेत. भारत सरकारने डॉ. डी. वाय. पाटील यांना ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही गौरवले आहे.

डी. वाय. पाटील यांच्या घरात काँग्रेसची विचारधारा होती. त्यामुळे अर्थात त्यांची राजकीय कारकीर्द काँग्रेसमधून सुरु होणं सहाजिक होतं आणि झालंही तसेच. कोल्हापुरातून डी. वाय. पाटील यांनी राजकारणात प्रवेश केला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून सुरु केलेली राजकीय कारकीर्द पुढे अनेक मोठमोठ्या पदांपर्यंत घेऊन गेली. कार्यकर्ता, महापौर ते अगदी राज्याचे राज्यपाल, असा विस्मयचकित करणारा प्रवास डॉ. डी. वाय पाटील यांचा आहे.

1957 ते 1962 या काळात डॉ. डी. वाय. पाटील हे काँग्रेसकडून कोल्हापूरचे महापौर होते. 1967 आणि 1972 साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत आमदार म्हणूनही निवडून गेले होते.

राज्यपाल म्हणून कारकीर्द

डॉ. डी. वाय. पाटील हे 2009 ते 2013 या काळात त्रिपुरा, तर 2013 ते 2014 या काळात बिहराचे राज्यपाल होते. शिवाय, त्यांच्याकडे पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचाही काही काळ कार्यभार होता. भाजपप्रणित एनडीए सरकार केंद्रात सत्तेत आल्यानंतर अनेक राज्यातील राज्यपालांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या ठिकाणी नवे राज्यपाल नियुक्त करण्यात आले. मात्र, राजकारणाच्या पलिकडचे व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांचे राज्यपालपद कायम ठेवण्यात आले होते. तेव्हा डॉ. डी. वाय. पाटील हे बिहारचे राज्यपाल होते.

  • त्रिपुराचे राज्यपाल – 27 नोव्हेंबर 2009 ते 21 मार्च 2013
  • बिहारचे राज्यपाल – 22 मार्च 2013 ते 26 नोव्हेंबर 2014

डी. वाय पाटील यांच्या शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातील संस्था (सौजन्य – विकिपीडिया) :

  • डी वाय पाटील विद्यानगरी
  • डॉ डी वाय पाटील एज्युकेशनल एंटरप्रायजेस चॅरिटेबल ट्रस्ट
  • डॉ डी वाय पाटील ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स (इंटिग्रेटेड कँपस), चरोली बु. व्हाया लोहगाव-पुणे
  • डॉक्टर डी वाय पाटील नॉलेज सिटी, चरोली बु. व्हाया लोहगाव-पुणे

शाळा

  • डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, वरळी, मुंबई
  • डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, नागपूर
  • डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, नेरूळ, नवी मुंबई
  • डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, पुणे
  • डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, अँटवर्प, बेल्जियम

महाविद्यालये

  • डॉ डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, चरोली बु० व्हाया लोहगाव-पुणे .
  • डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील आयुर्वे्द महाविद्यालय, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील एज्युकेशनल सोसायटीचे महिला मेडिकल कॉलेज, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील होमिओपॅथिक कॉलेज, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, नेरुळ, नवी मुंबई
  • डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, नवी मुंबई
  • डी. वाय. पाटील कॉलेज दंत महाविद्यालय, नेरूळ-नवी मुंबई
  • डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, नेरूळ-नवी मुंबई
  • डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, कोल्हापूर
  • डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, कोल्हापूर
  • डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, कसबा बावडा-कोल्हापूर

विद्यापीठे

  • पद्मश्री डी.वाय. पाटील विद्यापीठ, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई
  • डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, पुणे
  • डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूर

हॉस्पिटल

  • डी.वाय. पाटील हॉस्पिटल, नवी मुंबई
  • डी.वाय. पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे
  • डी.वाय. पाटील हॉस्पिटल, कोल्हापूर

क्रीडा संस्था

  • डी.वाय. पाटील स्टेडियम, नेरूळ-नवी मुंबई
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.