Video : मनसे कार्यकर्त्यांच्या बायकांनी गाठले कुरार पोलीस ठाणे! रात्री अपरात्री पोलीस घरात घुसत असल्याची तक्रार; पोलिसांकडून त्रास न देण्याचं आश्वासन

पोलीस आम्हाला पुन्हा पुन्हा त्रास देत असल्याचा आरोप मनसे नेत्यांच्या बायकांकडून करण्यात येत आहे. फक्त आरोपच नाही तर काही मनसे नेत्यांच्या बायका याविरोधात थेट पोलीस स्टेशनलाही पोहचल्याचे दिसून आले. तर काल बोलताना मनसे नेते संदीप देशपांनी यांनीही पोलिसांना त्यांच्या घरच्यांना त्रास देऊ नये अशी विनंती केली होती.

Video : मनसे कार्यकर्त्यांच्या बायकांनी गाठले कुरार पोलीस ठाणे! रात्री अपरात्री पोलीस घरात घुसत असल्याची तक्रार; पोलिसांकडून त्रास न देण्याचं आश्वासन
मनसे कार्यकर्त्यांच्या बायकांनी गाठले कुरार पोलीस ठाणे!Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 7:37 PM

मुंबई : राज्यात सध्या हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) विरुद्ध मशीदीवरील भोंग्यांचा संघर्ष पेटला असल्याने पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून मनसे (MNS) कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. काही मनसे नेते नोटीसा मिळताच गायब झाले आहेत. तर काही मनसे नेत्याना ताब्यातही घेण्यात (Mumbai Police) आलंय. तर काहींना ताब्यात घेऊन समज देत सोडून देण्यात आलं आहे. तर मनसे नेत्यांच्या घरावरही पोलिसांचं लक्ष आहे. मात्र त्यामुळे आता मनसे नेत्यांच्या बायका आता आक्रमक झाल्या आहेत. पोलीस आम्हाला पुन्हा पुन्हा त्रास देत असल्याचा आरोप मनसे नेत्यांच्या बायकांकडून करण्यात येत आहे. फक्त आरोपच नाही तर काही मनसे नेत्यांच्या बायका याविरोधात थेट पोलीस स्टेशनलाही पोहचल्याचे दिसून आले. तर काल बोलताना मनसे नेते संदीप देशपांनी यांनीही पोलिसांना त्यांच्या घरच्यांना त्रास देऊ नये अशी विनंती केली होती.

पोलिसांविरोधात महिला आक्रमक

मालाड पूर्व कुरार पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांच्या पत्नींनी आज पोलिसांविरोधात तक्रार करण्यासाठी कुरार पोलिस ठाणे गाठले. मनसे कार्यकर्त्यांच्या पत्नींनी सांगितले काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या घरी पोलिस रात्री अपरात्री घरी जाऊन विचारणा करत होते की, पक्षाचे कार्यकर्ते कुठे आहेत? तसेच, घरी आल्यानंतर फोटो काढण्याचा देखील त्यांचा आग्रह असायचा. या सगळ्या गोष्टी पाहता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिंडोशी विधानसभेतल्या सर्व कार्यकर्त्यांच्या पत्नी आणि महिला पदाधिकारी यांनी कूरार पोलिस ठाण्याचे सिनियर यांची भेट घेतली. आणि त्यांना पोलिसांनी वारंवार घरी न येण्याची विनंती केली असता पोलिस प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत फक्त संपर्क झाल्यास आम्हाला कळवा, आणि पुन्हा तुम्हाला त्रास होणार नसल्याचे आश्वासन पोलिसांनी दिले.

राज्यातला वाद संपेना

गुढी पाडव्याला राज ठाकरे यांनी पुन्हा मशीदीवरील भोंग्याविरोधात जोरादार रणशिंग फुकलं आणि पुन्हा मनसे कार्यकर्ते कामाला लागले. ज्या मशीदीवर अजानचे लाऊडस्पीकर सुरू होतील, त्या मशीदीसमोर मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावण्यात सुरूवात केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी औरंगाबादेतल्या सभेतून हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला. तशी लेखी भूमिकी स्पष्ट केली. त्यानंतर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा बजावल्या मात्र काही मनसे कार्यकर्ते अजूनही गनिमी काव्याने हनुमान चालीसा लावत आहे. त्यामुळे आता ते पोलिसांच्या रडारावर आले आहेत.

हे सुद्धा वाचा

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.