VIDEO | सावधान, हे पुण्यात झालं, ‘ड्रायव्हरने मला किडनॅप केलं’, त्याच्या जागेवर ती राहिली असती तर…

ही घटना आहे पुण्याची. पुणे परिवहनच्या बसमध्ये हा प्रसंग घडला. चिंचवडहून बालेवाडीला ही बस चालली होती. बसमध्ये बऱ्यापैकी प्रवासी होते. एका प्रवाशाला बसमधून उतरायचे होते.

VIDEO | सावधान, हे पुण्यात झालं, 'ड्रायव्हरने  मला किडनॅप केलं', त्याच्या जागेवर ती राहिली असती तर...
सावधान, हे पुण्यात झालं, 'ड्रायव्हरने मला किडनॅप केलं', त्याच्या जागेवर ती राहिली असती तर...Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 16, 2022 | 10:54 AM

पुणे: काही घटना या खूप छोट्या वाटतात. त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्याने काय होतंय? असा आपला त्यावेळी भाव असतो. पण याच घटना नंतर मोठ्या होतात आणि मग समस्या बनून आ वासून उभ्या राहतात. अशावेळी काळ सोकावतो हेच खरं. आता कालचीच घटना पाहा ना… एका प्रवाशाला स्टॉपच्या (bus stop) आधी उतरायचं होतं. पण ड्रायव्हरने (driver) काही ऐकलं नाही. तेव्हा प्रवाशाने बसमध्येच बोंब ठोकली. किडनॅप (kidnap) केल्याचा बनाव केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. प्रवाशाने बसमध्ये ओरडाओरड करणं हे जसं चूक आहे. तसंच सौजन्य दाखवणं हे सुद्धा ड्रायव्हरचं कर्तव्य होतं. पण नाही दाखवलं. त्या ठिकाणी एखादी मुलगी असती तर ड्रायव्हर असा वागला असता का? असा प्रश्न नेटकरी विचारतात. त्यावेळी काहीच उत्तर नसतं.

ही घटना आहे पुण्याची. पुणे परिवहनच्या बसमध्ये हा प्रसंग घडला. चिंचवडहून बालेवाडीला ही बस चालली होती. बसमध्ये बऱ्यापैकी प्रवासी होते. एका प्रवाशाला बसमधून उतरायचे होते. त्याला स्टॉपच्या पूर्वीच उतरायचं होतं.

हे सुद्धा वाचा

पण ड्रायव्हरने मध्येच बस थांबवण्यास नकार दिला. ठरलेल्या स्टॉपला उतरा आणि हवे त्या ठिकाणी जा, असं ड्रायव्हरचं म्हणणं पडलं. पण मध्येच बस न थांबल्याने प्रवाशाने ड्रायव्हरच्या केबिनचे बटन दाबायला सुरुवात केली. त्याने ड्रायव्हर बधला नाही. त्यामुळे त्याने बोंबाबोंब मारायला सुरुवात केली.

वाचवा ओ वाचवा… ड्रायव्हरने मला किडनॅप केलं, असं तो जिवाच्या आकांताने म्हणू लागला. त्यामुळे बसबाहेरच्या प्रवाशांनी गाड्या थांबवल्या. बसमध्ये नेमकं काय चाललं हे पाहण्यास सुरूवात केली. दुसरीकडे प्रवाशाची बोंब सुरूच होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. काही प्रमाणात प्रवाशाला सिम्पथी मिळाली. ड्रायव्हर असेच असतात अशी नाके मुरडली गेली. तर काहींनी ड्रायव्हर योग्य असल्याचं म्हटलं. प्रवाशाने अतिरेक केल्याचं काहींचं म्हणणं पडलं.

खरे तर या प्रवाशाने अतिरेक करायला नको होता. त्याने बस चालकाच्या विरोधात रितसर तक्रार करायला हवी होती. तक्रार करण्याची सुविधा आहे. परिवहनकडून अशा तक्रारीची दखलही घेतली जाते. पण तरुणाने तसं काही केलं नाही. त्यामुळे त्याला खरोखरच या समस्येतून सुटका हवी होती की केवळ स्टंट करायचा होता, हा प्रश्न अनिर्णित राहतो.

आपण जरा दुसऱ्या बाजूनेही विचार करू. ड्रायव्हर का ऐकत नव्हता, ठिक आहे हा मुलगा आहे. पण मुलगी राहिली असती तर…? एखादी महिला प्रवासी, तरुणी किंवा ज्येष्ठ नागरिक असतात तर ड्रायव्हरने बस थांबवली नसती का? एका प्रवाशासाठी बस थांबवली असती तर बिघडले कुठे असते? किंवा बसचा स्पीड कमी करूनही प्रवाशाला उतरू दिलं असतं की? एवढं सौजन्य तर ड्रायव्हर दाखवू शकला असता. एरव्ही पोलिसांसाठी मध्येच बस थांबवली जाते ना. बस चालक किंवा वाहकांचे नातेवाईक, मित्र असतील तर त्यांच्यासाठीही नियम वाकवला जातोच ना?

एखादा प्रवाशी राहिला तर त्याला जवळ उतरवण्याचंही सौजन्य या बस ड्रायव्हरमध्ये नव्हतं का? बस आहे ती हे रेल्वे समजता का? यावर पुणेकर काय जगभरात पोट धरुन हसतायत, पण पुणेकरांनो तुम्हाला याच बसने प्रवास करायचा आहे. प्रसंग तुमच्यावरही येऊ शकतो, कदाचित कारण वेगळं असेल, मग तुमच्यासोबत बस चालकाने सौजन्याने वागायला नको का…

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.