युगेंद्र पवारांनी विधानसभेची उमेदवारी मिळताच अजितदादांविरोधात दंड थोपाटले, पहिली प्रतिक्रिया समोर

राष्ट्रवादी शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. युगेंद्र पवार यांना बारामतीमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

युगेंद्र पवारांनी विधानसभेची उमेदवारी मिळताच अजितदादांविरोधात दंड थोपाटले, पहिली प्रतिक्रिया समोर
Follow us
| Updated on: Oct 24, 2024 | 7:38 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये 45 उमेदवारांचा समावेश आहे. सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघाकडे बारामती विधानसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच शरद पवार गटाकडून उमेदवार म्हणून युगेंद्र पवार यांचं नाव चर्चेत होतं. अखेर बारामतीमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे आता बारामतीमध्ये अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार असा सामना रंगणार आहे.  उमेदवारी मिळताच युगेंद्र पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले युगेंद्र पवार?

सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्यावर तुम्ही विश्वास दाखवला. मी संधीचं सोन करेल. पवारसाहेबांना अभिमान वाटेल अशी कामगिरी मी करणार आहे. संपूर्ण तालुका तीनवेळा पिंजून काढला आहे. अजूनही संपूर्ण तालुक्यात फिरणार आहे, असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.   

बारामतीमध्ये हायहोल्टेज लढत 

बारामतीमधून अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आज अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये युगेंद्र पवार यांचं नाव आहे. ते बारामतीमधून अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघात काका विरोधात पुतण्या असा हायहोल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. यापूर्वी लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार या रिंगणात होत्या. आता विधानसभेला अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार हे निवडणूक लढवणार आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली यादी  

इस्लामपूर- जयंत पाटील, काटोल- अनिल देशमुख, घनसावंगी – राजेश टोपे, कराड उत्तर – बाळासाहेब पाटील, मुंबा कळवा – जितेंद्र आव्हाड, कोरेगाव – शशिकांत शिंदे, वसमत – जयप्रकाश दांडेगावकर, जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर, इंदापूर – हर्षवर्धन पाटील, राहूरी – प्राजक्त तनपुरे, शिरुर- अशोक पवार, शिराळा – मानसिंगराव नाईक, विक्रमगड – सुनील भुसारा, कर्जत-जामखेड – रोहित पवार, अहमदपूर – विनायकराव पाटील, सिंदखेड राजा – राजेंद्र शिंगणे, उदगीर – सुधाकर भालेराव, भोकरदन – चंद्रकांत दानवे, तुमसर – चरण वाघमारे, किनवट – प्रदीप नाईक, जिंतूर – विजय भांबळे, केज – पृथ्वीराज साठे, बेलापूर – संदीप नाईक, वडगाव शेरी -बापूसाहेब पठारे, जामनेर – दिलिप खोडपे, मुक्ताईनगर – रोहिणी खडसे, मुर्तीजापूर -सम्राट डोंगरदिवे, नागपूर पुर्व – दिनेश्वर पेठे, तिरोडा – रविकांत बोपचे, अहेरी – भाग्यश्री आत्राम, बदनापूर – रुपकुमार चव्हाण, मुरबाड – सुभाष पवार, घाटकोपर (पुर्व) – राखी जाधव, आंबेगाव – देवदत्त निकम, बारामती – युगेंद्र पवार, कोपरगाव – संदीप वर्पे, शेवगाव – प्रताप ढाकणे, पारनेर – राणी लंके, आष्टी- मेहबूब शेख, करमाळा – नारायण पाटील, सोलापूर शहर उत्तर – महेश कोठे, चिपळून- प्रशांत यादव, कागल – समरजीत घाटगे, तासगाव -कवठेमहंकाळ – रोहीत पाटील, हडपसर – प्रशांत जगताप

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.