Varun Sardesai | पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉनची लागण, आता रोहित पवार यांच्यानंतर युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई कोरोनाबाधित

युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे आढल्यानंतर त्यांनी चाचणी करुन घेतली होती. त्यानंतर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवलं आहे.

Varun Sardesai | पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉनची लागण, आता रोहित पवार यांच्यानंतर युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई कोरोनाबाधित
varun sardesai and rohit pawar and pankaja munde
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 7:41 AM

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या रोजच वाढत आहे. एकीकडे संसर्ग वाढत असताना कोरोनाचे नवे रुप ओमिक्रॉनचादेखील धोका वाढला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा ढग गडद होत असताना आता कायम जनतेमध्ये असणारे नेतेमंडळींनाही कोरोनाची लागण होताना दिसत आहे. सुप्रिया सुळे, बाळासाहेब थोरात अशा बड्या नेत्याना कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉन विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता आता युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. फेसबुकद्वार त्यांनी ही माहिती दिली आहे.

युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना कोरोनाची लागण

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर दुसरीकडे राज्यातील बडे नेते कोरोनाबाधित होत आहेत. सध्या युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे आढल्यानंतर त्यांनी चाचणी करुन घेतली होती. त्यानंतर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवलं आहे. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान याआधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता युवासेनेने आपला झंझावात हा मेळावा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

बड्या नेत्यांना कोरोनाची लागण 

याआधी राज्यातील अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे, काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख, भाजप नेते सुजय विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे तसेच त्यांचे कुटुंबीय अशी अनेक नेतेमंडळी कोरोनाच्या विळख्यात अडकली आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

रोहित पवार यांच्यावरही उपचार सरु

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील उपचारासाठी ते पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे रोहित पवार 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉनची लागण 

पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. चाचणी केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ओमिक्रॉनची लागण झाल्यामुळे त्यांनी खबरदारी म्हणून उपचार सुरु केले आहेत. दरम्यान, आता नेतेमंडळींनाही कोरोनाची लागण होत असल्यामुळे सामान्य नागरिकांनीही काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.

इतर बातम्या :

Mumbai Corona Update : मुंबईतील रहिवासी इमारतींसाठी नवी नियमावली जाहीर, काय आहेत नवे नियम?

Maharashtra News Live Update : अहमदनगर शहरातील पीरशहा खुंट येथे दोन गटात भांडण

‘O’ रक्तगट एवढा कॉमन का आहे? काय आहे त्यामागचं शास्त्र?

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.