AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयसीआयसीआय बँकेकडून क्रेडिट कार्डशी संबंधित सर्व शुल्कांमध्ये वाढ, नवे दर दहा फेब्रुवारीपासून लागू

आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank)आपल्या क्रेडिट कार्डच्या संबंधित सर्व सेवांचे शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये उशीरा कर्ज फेडीवर आकारण्यात येणाऱ्या शुल्काचा देखील समावेश आहे. याबाबत बँकेकडून माहिती देण्यात आली आहे.

आयसीआयसीआय बँकेकडून क्रेडिट कार्डशी संबंधित सर्व शुल्कांमध्ये वाढ, नवे दर दहा फेब्रुवारीपासून लागू
Credit Card
| Edited By: | Updated on: Jan 11, 2022 | 6:15 AM
Share

नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank)आपल्या क्रेडिट कार्डच्या संबंधित सर्व सेवांचे शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये उशीरा कर्ज फेडीवर आकारण्यात येणाऱ्या शुल्काचा देखील समावेश आहे. याबाबत बँकेकडून माहिती देण्यात आली आहे. बँकेच्या वतीने आपल्या ग्राहकांना एक एसएमएस देखील पाठवण्यात आला आहे. या एसएमएसमध्ये बँकेने म्हटले आहे की, आम्ही आमच्या ग्राहकांना कळू इच्छितो की बँकेने क्रेडिट कार्डशी संबंधित सर्व सेवांवरील शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दहा फेब्रुवारीपासून सुधारित दर लागू होतील. नव्या दरानुसार बँकेच्या सर्व प्रकारच्या क्रेडिट कार्डवर 2.50 टक्के ट्रांझेक्शन फी आकारली जाईल. ही फी कमीत कमी 500 रुपयांपर्यंत असू शकते. तसेच ऑटो डेबिट फेल झाल्यास किंवा चेक बाऊंस झाल्यास देखील संबंधित ग्राहकांकडून दोन टक्के दंड वसूल करण्यात येईल.

किती विलंब शुल्क लागणार?

बँकेच्या नव्या नियमानुसार जर तुमच्याकडे बँकेची 100 रुपये थकबाकी असेल तर त्यावर कोणतेही विलंब शुल्क आकारले जाणार नाही. मात्र ही रक्कम जर 100 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत असेल तर त्यावर विलंब शुल्क म्हणून तुमच्याकडून 100 रुपयांची वसुली करण्यात येईल. जर तुमच्याकडे 501 रुपयांपासून ते 5,000 रुपयांपर्यंतची थकबाकी असेल तर त्यासाठी तुमच्याकडून विलंब शुल्क म्हणून 500 रुपये आकारले जातील. जर ही थकबाकी 10,000 रुपये असेल तर 750 रुपये आणि 25,000 हजारांच्या आतील रकमेसाठी 900 आकारण्यात येणार आहेत.

लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड

ग्राहकांनी क्रेडिट कार्डशी संबंधित सेवांच्या शुल्कामध्ये करण्यात आलेल्या वाढीची नोंद घ्यावी, नवे शुल्क येत्या दहा फेब्रुवारीपासून लागू होतील. बँकेला सहकार्य करावे असे आवाहन देखील बँकेच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान ज्या ग्राहकांचे आयसीआसीआय बँकेमध्ये सॅलरी अकाऊंट आहे, अशा ग्राहकांसाठी बँकेच्या वतीने लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड देण्यात येते अशा क्रेडिट कार्डवर बँकेकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही.

संबंधित बातम्या

Atmanirbhar Bharat : आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेत नाव नोंदवण्यास मुदतवाढ, काय आहेत योजनेचे फायदे?

गोल्ड बाँडमध्ये गंतवणुकीची सोनेरी संधी आली चालून, स्वस्तात सोन्यात गुंतवणुकीच्या पायघड्या ठेवल्यात अंथरुण 

Post office | पोस्टाच्या ‘या’ बचत योजनेत दर महिन्याला कमाईची संधी 

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.