AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAN Card : पॅन कार्ड खरं की खोटं, कसं ओळखावं? फॉलो करा ‘या’ स्टेप्स आणि घरबसल्या जाणून घ्या

पॅन कार्ड (PAN Card) आयडीमध्ये क्यूआर कोड (QR Code) जोडणं सुरू झालं आहे. ज्यांच्याकडे जुलै 2018नंतर बनवलेलं पॅन कार्ड आहे, त्यांच्यामध्ये एक QR कोड एम्बेड (Embed) केलेला आहे. पॅन कार्डवर तयार केलेला QR कोड बनावट आणि अस्सल पॅन ओळखतो.

PAN Card : पॅन कार्ड खरं की खोटं, कसं ओळखावं? फॉलो करा 'या' स्टेप्स आणि घरबसल्या जाणून घ्या
पॅन कार्ड
| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 8:29 PM
Share

मुंबई : गेल्या काही वर्षांत ओळखीशी संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झालीय. त्यानंतर पॅन कार्ड (PAN Card) आयडीमध्ये क्यूआर कोड (QR Code) जोडणं सुरू झालं आहे. ज्यांच्याकडे जुलै 2018नंतर बनवलेलं पॅन कार्ड आहे, त्यांच्यामध्ये एक QR कोड एम्बेड (Embed) केलेला आहे. पॅन कार्डवर तयार केलेला QR कोड बनावट आणि अस्सल पॅन ओळखतो. हे तपासण्यासाठी केवळ आयकर विभागानं जारी केलेला स्मार्टफोन आणि अॅप आवश्यक आहे.

जाणून घेऊ शकता घरबसल्या… कोरोनाच्या काळात बनावट पॅनकार्डची प्रकरणं सातत्यानं वाढत आहेत. अशा परिस्थितीत तुमच्याकडे असलेलं पॅनकार्ड खरं की बनावट हे जाणून घेणं आवश्यक आहे. पॅन कार्ड खोटं आहे की खरं हे आता तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता. पॅन कार्डचं महत्त्व किती आहे, याचा विचार केल्यास आपल्याला ही गोष्ट माहीत असणं आवश्यक आहे, की पॅन कार्डच्या 10 अंकांच्या माध्यमातून तुम्ही बँक खातं उघडणं, मालमत्ता खरेदी करणं किंवा विकणं, वाहन खरेदी करणं किंवा विकणं, ITR भरणे अशा अनेक गोष्टी करू शकता. पण आजकाल बनावट पॅनकार्डची अनेक प्रकरणं समोर येत आहेत आणि ती कशी थांबवता येतील, याचा विचार सुरू आहे.

कोणताही थेट फायदा नाही, मात्र… पॅन कार्ड हे एक सरकारी दस्तावेज आहे. याचा कोणताही थेट फायदा नाही परंतु बँकिंग आणि नॉन-बँकिंग प्रकरणांमध्ये ते खूप मदत करतं. आर्थिक व्यवहारांपासून ते बँक खातं उघडण्यापर्यंत पॅनकार्ड आवश्यक आहे. याशिवाय मालमत्तांची खरेदी-विक्री, आयकर रिटर्न भरणं यासह अनेक महत्त्वाच्या कामांसाठी पॅन कार्डचा वापर केला जातो.

पॅन कार्ड खोटं आहे की खरं, कसं ओळखावं? सर्वप्रथम, तुम्हाला आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर जावं लागेल. इथं तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला ‘Verify your PAN details‘ या लिंकवर क्लिक करावं लागेल. यानंतर, युझर्सना पॅन कार्ड तपशील (पॅन कार्ड तपशील कसा तपासायचा) भरावा लागेल. यामध्ये तुम्हाला पॅन नंबर, पॅन कार्डधारकाचं पूर्ण नाव, त्याचा वाढदिवस इत्यादी माहिती दिली जाईल. योग्य माहिती भरल्यानंतर, पोर्टलवर एक मेसेज येईल, की प्रविष्ट केलेली माहिती तुमच्या पॅन कार्डशी जुळते की नाही. अशा प्रकारे तुम्ही पॅन कार्डचा खरेपणा सहज शोधू शकता.

108 MP बॅक आणि डुअल सेल्फी कॅमेरा, Vivo चा नवीन स्मार्टफोन बाजारात, किंमत…

1 जानेवारीपासून Zomato आणि Swiggy वरुन जेवण ऑर्डर करणं महागात पडणार! जाणून घ्या कारण

Vodafone Idea चे Disney+ Hotstar बेनिफिटवाले प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद, जाणून घ्या डिटेल्स

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.