कांदिवलीत वाढीव वीजबिलाची होळी, रास्तारोको, पोलीस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट; भातखळकर पोलिसांच्या ताब्यात
भाजप कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणा देत रास्तारोको करत वाढीव वीजबिलाची होळी केली. (bjp agitation against electricity bill)
मुंबई: वीजबिल माफीसाठी भाजपने कांदिवलीत आज जोरदार आंदोलन केलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणा देत रास्तारोको करत वाढीव वीजबिलाची होळी केली. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न केला. त्यातच पोलिसांनी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनाही ताब्यात घेतलं. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी त्याला विरोध केल्याने पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. (bjp agitation against electricity bill in mumbai atul bhatkhalkar detained)
वाढीव वीजबिल माफीसाठी आज राज्यभरात ठिकठिकाणी भाजपने आंदोलन छेडलं आहे. मुंबईत कांदिवलीमध्ये भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात शेकडो भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात महिलांचा सर्वाधिक सहभाग होता. आंदोलकांनी हातात भाजपचे झेंडे घेऊन जोरजोरात घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
यावेळी आंदोलकांनी सरकारचा निषेध म्हणून रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करत चक्काजाम केला. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यानंतर या आंदोलकांनी वीज बिलाची होळी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना पांगवता यावं म्हणून पोलिसांनी अतुल भातखळकर यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे आंदोलक अदिकच संतप्त झाले. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याने वातावरण अधिकच तापले. (bjp agitation against electricity bill in mumbai, atul bhatkhalkar detained)
पोलीस ठाण्याला घेराव
पोलिसांनी भातखळकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन समता नगर पोलीस ठाण्यात आणले. त्यामुळे आंदोलकांनीही समता नगर पोलीस ठाण्याच्या दिशेने मोर्चा वळवला असून पोलीस ठाण्याला घेराव घातला आहे. जोपर्यंत भातखळकरांना सोडण्यात येणार नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्याबाहेरून हटणार नाही, अशी भूमिका घेत आंदोलकांनी पोलीस ठाण्याबाहेरच घोषणाबाजी सुरू केली आहे. त्यामुळे समता नगर पोलीस ठाण्याबाहेरही तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
VIDEO | MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 AM | 23 November 2020 https://t.co/1Fg4iTIeFf @CMOMaharashtra #fastnews
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2020
(bjp agitation against electricity bill in mumbai, atul bhatkhalkar detained)
संबंधित बातम्या:
मुख्यमंत्री घरी बसलेले असतील तर राज्य धोक्याच्या वळणावरच; अतुल भातखळकरांचा टोला
सरकार पलटलं, वाढीव वीजबिलामुळे जनता भरडली; बावनकुळेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
वीजबिल माफीसाठी गरज पडल्यास खळ्ळखट्यॅक आंदोलन करणार, मनसे आक्रमक