मुंबईकरांना दिवाळी भेट! बेस्टच्या ताफ्यात येणार अत्याधुनिक डबल डेकर बसेस

मुंबईकरांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी बेस्ट प्रशासनाने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बेस्टच्या ताफ्यात लवकरच अत्याधुनिक डबल डेकर बसेस येणार आहेत. (Double Decker Buses are Ready to Come Back in mumbai)

मुंबईकरांना दिवाळी भेट! बेस्टच्या ताफ्यात येणार अत्याधुनिक डबल डेकर बसेस
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 11:10 AM

मुंबई: मुंबईकरांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी बेस्ट प्रशासनाने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बेस्टच्या ताफ्यात लवकरच अत्याधुनिक डबल डेकर बसेस येणार आहेत. एक-दोन नव्हे तर तब्बल 100 डबल डेकर बसेस रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. (Double Decker Buses are Ready to Come Back in mumbai)

बेस्ट प्रशासनाने बेस्ट उपक्रमातील जुन्या आणि वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या डबल डेकर बसेस मार्च 2021 पर्यंत भंगारात काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबदल्यात 100 नव्या डबल डेकर बसेस रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतच्या निविदा लवकरच काढल्या जाणार असल्याचं बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केलं. दोन दरवाजे, दोन जिने आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा या बसेसमध्ये समावेश असणार आहे. नव्या बसेसचे दरवाजे स्वंयचलित राहणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचीही खबरदारी घेण्यात आली आहे. सध्याच्या डबल डेकर बसेसला एकच दरवाजा आणि जिना आहे. शिवाय जुन्या बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही नाहीत.

बेस्ट उपक्रमातील डबल डेकर बसेसचा आगळावेगळा इतिहास आहे. मुंबईची शान असलेली डबल डेकर बस नेहमीच पर्यटकांच्या पसंतीस उतरलेली आहे. आता नव्या अत्याधुनिक बसेसला पर्यटक भरभरून प्रतिसाद देतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून बेस्टला प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. प्रवाशांच्या तिकीट दरातही मोठी वाढ न करण्यात आल्याने हा तोटा वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर नव्या बसेसद्वारे मुंबईकर प्रवाशांना बेस्टकडे वळवण्याचा बेस्ट प्रशासनाने पुन्हा प्रयत्न सुरू केला आहे.

नव्या डबल डेकर बसची वैशिष्ट्ये

  • १०० डबल डेकर बसेस बेस्टच्या ताफ्यात
  • दोन दरवाजे, दोन्ही दरवाजे स्वयंचलित
  • दोन जिने
  • सीसीटीव्ही कॅमेरे
  • बस थांब्यांची माहिती देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक बोर्ड
  • बसमधील दोन्ही वाहकांना संपर्कासाठी विशेष सुविधा

संबंधित बातम्या:

मुंबईत 81 मार्गांवर 2500 बेस्ट बसेस सुरु, सोशल डिस्टन्सिंग, मास्क बंधनकारक

बेस्ट बसेस आजपासून मुंबईच्या रस्त्यावर, बसमधून प्रवाशांच्या प्रतिक्रिया

(Double Decker Buses are Ready to Come Back in mumbai)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.