दुसरा प्रस्ताव दिला, राज्यपाल विचार करतो म्हणाले, आम्ही राजकीय भाष्य करणार नाही : जयंत पाटील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Jayant Patil meet Governot Bhagat Singh Koshyari) यांनी लवकर निर्णय घ्यावा, यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज (28 एप्रिल) राजभवन येथे जावून राज्यपालांची भेट घेतली.

दुसरा प्रस्ताव दिला, राज्यपाल विचार करतो म्हणाले, आम्ही राजकीय भाष्य करणार नाही : जयंत पाटील
Follow us
| Updated on: Apr 28, 2020 | 7:50 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीबाबत (Jayant Patil meet Governot Bhagat Singh Koshyari) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लवकर निर्णय घ्यावा, यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज (28 एप्रिल) राजभवन येथे जाऊन राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना स्मरणपत्र दिलं आणि उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती केली. या विनंतीवर राज्यपालांनी विचार करतो, असं म्हटलं असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली (Jayant Patil meet Governot Bhagat Singh Koshyari).

“राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांना आम्ही 9 एप्रिल रोजी पत्र पाठवल होतं. विधानपरिषदेच्या ज्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या त्यासंदर्भात ते पत्र होतं. दरम्यान आम्हाला राज्यपालांकडून कोणतीही माहिती मिळाली नसल्यामुळे, काल पुन्हा मंत्रिमंडळ बैठकीत त्याबाबत निर्णय घेऊन आम्ही स्मरणपत्र पाठवलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचं शिफारस पत्र आम्ही राज्यपालांना दिलं आहे”, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

“राज्याच्या मंत्रिमंडळाने दुसऱ्यांदा ठराव करुन जो प्रस्ताव आपल्याला दिलेला आहे, त्यावर आपण लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती राज्यपालांना करण्यात आली. राज्यपालांनी यावर विचार करतो असं सांगितलं आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.

“आम्ही आता कोणतेही राजकीय भाष्य करणार नाही. यासंदर्भात लवकरच राज्यपाल कायदेशीर निर्णय घेतील. राज्यात स्थिर सरकार असायला हवं. आम्ही सध्या मुख्यमंत्र्यांसह सर्व यंत्रणा कोरोनाविरोधात लढण्यात गुंतलेलो आहोत. राज्यपाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होण्याआधी हा प्रस्ताव मंजूर करतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या :

देशात कोरोनाचा कहर, 24 तासात 1543 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 29,435 वर

उत्तर प्रदेशमध्ये मंदिरात झोपलेल्या 2 साधूंची हत्या, उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथ यांना फोन

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.