Corona Update | नवी मुंबईत दिवसभरात 128 नवे कोरोनाबाधित, बाधितांचा आकडा 4 हजार 189 वर
नवी मुंबईत आज (17 जून) दिवसभरात 128 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (New Mumbai Corona Update). त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजार 189 वर पोहोचला आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईत आज (17 जून) दिवसभरात 128 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (New Mumbai Corona Update). त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजार 189 वर पोहोचला आहे. याशिवाय दिवसभरात 5 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरात आतापर्यंत एकूण 129 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे (New Mumbai Corona Update).
नवी मुंबईतील नेरुळ, तुर्भे, कोपरखैरणे आणि ऐरोली हे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. या चारही भागांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे या भागात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवणं हे प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे.
दिवसभरात कुठे किती रुग्ण आढळले?
बेलापूर – 13 नेरुळ – 16 वाशी – 17 तुर्भे – 22 कोपरखैरणे – 27 घणसोली – 16 ऐरोली – 14 दिघा – 03
2 हजार 457 रुग्णांनी कोरोनावर मात
नवी मुंबईत दिवसभरात 102 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये नेरुळचे 4, वाशीचे 22, तुर्भेचे 16, कोपरखैरणेचे 23, घणसोलीचे 21, ऐरोलीचे 8 तर दिघाच्या 8 रुग्णांचा समावेश आहे. नवी मुंबईत आतापर्यंत 2 हजार 457 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात सध्या 1 हजार 603 रुग्णांवर उपचार सुरु आहे.
गेल्या पाच दिवसात नवी मुंबईत दररोज किती नवे रुग्ण आढळले?
12 जून – 129 रुग्ण
13 जून – 191 रुग्ण
14 जून – 169 रुग्ण
15 जून – 95 रुग्ण
16 जून – 63 रुग्ण
17 जून – 129 रुग्ण
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 16 हजार 752 वर
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे (Maharashtra Corona Update). कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी दररोज दोन ते तीन हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. राज्यात आज (17 जून) दिवसभरात 3 हजार 307 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 16 हजार 752 वर पोहोचला आहे (Maharashtra Corona Update).
राज्यात आज दिवसभरात 1 हजार 315 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 50.68 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 59 हजार 166 रुग्ण बरे झाले आहेत. तर 51 हजार 921 रुग्णांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.