‘भिकेत मिळालेल्या आमदारकीचा वापर महाराष्ट्रासाठी करा’, निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल कोट्यातून (Nilesh Rane slams CM Uddhav Thackeray) विधान परिषदेवर नेमणूक करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

'भिकेत मिळालेल्या आमदारकीचा वापर महाराष्ट्रासाठी करा', निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
Follow us
| Updated on: Apr 09, 2020 | 4:36 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल कोट्यातून (Nilesh Rane slams CM Uddhav Thackeray) विधान परिषदेवर नेमणूक करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, याच मुद्द्याचा धागा पकडत भाजप खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “भिकेमध्ये मिळालेल्या आमदारकीचा उपयोग महाराष्ट्रासाठी करा”, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे (Nilesh Rane slams CM Uddhav Thackeray).

निलेश राणे नेमकं काय म्हणाले?

“उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी पनवती असले तरी स्वत:साठी नशिबवान आहेत. त्यांना सगळं बसल्या-बसल्या मिळालं. आता आमदारकीदेखील राज्यपालांनी बसल्याठिकाणी दिली. भिकेमध्ये मिळालेल्या आमदारकीचा उपयोग महाराष्ट्रासाठी करा”, अशी खोचक टीका निलेश राणे यांनी केली. निलेश राणे वारंवार शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. याअगोदरही त्यांनी अशाप्रकारची टीका केली आहे.

उद्धव ठाकरे राज्यपालांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर

‘कोरोना’ संकटामुळे विधानपरिषद निवडणूक लांबणीवर गेली असली, तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदार होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नेमणूक करण्याची शिफारस करण्यात आली आहे. (CM Uddhav Thackeray Vidhan Parishad MLA)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शिवसेनेच्या नेतृत्वात कॉंग्रेस राष्ट्रवादीसह स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने एकमताने हा निर्णय घेतला. घटनात्मक पेच निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय झाला.

मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यांच्या आत विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचं सदस्य होणं संविधानानुसार बंधनकारक असतं. अन्यथा, मंत्र्याचं पद धोक्यात येण्याची शक्यत असते. उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्याला पाच महिने होत आले असून कोरोनाच्या संकटामुळे विधानपरिषदेची निवडणूक लांबणीवर पडली आहे.

सध्या राज्यपाल नियुक्त दोन जागा रिक्त आहेत. त्यातल्या एका जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली गेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच्या बैठकीला उपस्थित नव्हते. लवकरच ते विधानपरिषदेचं सदस्यत्व स्वीकारतील.

संबंधित बातम्या :

पुढील वर्षभर सर्व आमदारांच्या वेतनात 30 टक्के कपात, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 महत्त्वाचे निर्णय

कोरोना संकटकाळात सरकारचा पेचही सुटला, उद्धव ठाकरे राज्यपालांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.