लहान मुलांसाठी शिवसेनेची अजान स्पर्धा; अजानला विरोध करणं गैर: पांडुरंग सकपाळ
भगवदगीता पठण स्पर्धेच्या धर्तीवर शिवसेनेच्या वतीने आता अजान पठण स्पर्धा घेण्यात येणार आहे. (shivsena leader pandurang sakpal on azan competition)
मुंबई: भगवदगीता पठण स्पर्धेच्या धर्तीवर शिवसेनेच्या वतीने आता अजान पठण स्पर्धा घेण्यात येणार आहे. मुस्लिम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून ही स्पर्धा घेण्यात येत असल्याचं सांगतानाच अजानला विरोध करणं चुकीचं असल्याचं मत शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी सांगितलं. (shivsena leader pandurang sakpal on azan competition)
मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहतो. त्यामुळे माझ्या कानावर रोजच अजान पडते. अजानमध्ये प्रचंड गोडवा असून अजानचं मला नेहमीच अप्रूप वाटत राहिलं आहे. त्यामुळेच मुस्लिम समाजातील मुलांसाठी अजानची स्पर्धा घेण्याचं माझ्या मनात आलं. अजान देणाऱ्या मुलांचे उच्चार, त्यांचा आवाज आणि पाठांतर पाहून त्यांना बक्षिस देण्यात येईल. या स्पर्धेचा खर्च शिवसेना करणार आहे, असं पांडुरंग सकपाळ यांनी सांगितलं.
मुस्लिम समाजातील लहान मुले अप्रतिम अजान देतात. त्यांच्या या कलागुणांना वाव देणं हा त्या मागचा हेतू आहे. अशी स्पर्धा देशात कुठे झाली असेल असं वाटत नाही. हा पहिलाच प्रयोग असून त्याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे, असंही ते म्हणाले. (shivsena leader pandurang sakpal on azan competition)
अजान किती मिनिटाची असते? केवळ पाच मिनिटाची. त्यामुळे या पाच मिनिटाच्या अजानमुळे कुणाला त्रास होत असेल तर ही गोष्ट मिठाच्या खड्यासारखी समजून त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. अजानची परंपरा खूप जुनी आहे. ती कालपरवा सुरू झालेली नाही. त्यामुळे त्याला विरोध करणंच गैर आहे. अशा लोकांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असंही ते म्हणाले. महाआरतीप्रमाणेच अजानचं महत्त्व आहे. प्रेम आणि शांतीचं ते प्रतिक आहे. त्यावर वाद घालणं उचित वाटत नाही, असंही ते म्हणाले. (shivsena leader pandurang sakpal on azan competition)
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 9 AM | 30 November 2020 https://t.co/3mX7rvFCvM @CMOMaharashtra #MaharashtraPolitics
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 30, 2020
संबंधित बातम्या:
चंद्रकांत पाटलांनी कधी आंदोलन केलंय का, जेलमध्ये गेलेत का; जयसिंगराव गायकवाडांचा हल्लाबोल
तुमच्या डोळ्याला आणि कानाला त्रास व्हावा म्हणूनच माझी नियुक्ती; राऊतांचा चंद्रकांतदादांना टोला
(shivsena leader pandurang sakpal on azan competition)