चोरीस गेलेले दागिने आठ वर्षानंतर मिळाले, आर्थिक अडचण असताना पोलिसांची मोठी कामगिरी

पोलिसांनी तपासात संदीपला लुटणारे चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून संदीपचे चोरी गेलेले दागिने हस्तगत केले.

चोरीस गेलेले दागिने आठ वर्षानंतर मिळाले, आर्थिक अडचण असताना पोलिसांची मोठी कामगिरी
डॉलर इंडेक्स 93.435 च्या उच्च स्तरावर पोहोचला आहे. परदेशी बाजारात सोनं 0.4 टक्क्यांनी घसरून 1,893.17 डॉलर प्रति औंसवर गेलं आहे. तर इतर मौल्यवान धातूंमध्ये चांदी 1 टक्क्यांनी घसरत 24.05 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. प्लॅटिनम 0.3 टक्क्यांनी घसरत 854.59 डॉलर प्रति औंसवर पोहोचलं आहे.
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 7:28 AM

ठाणे : चोरी गेलेल्या वस्तू शक्यतो परत मिळत नाहीत हे आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे. अशात सोन्या-चांदीच्या वस्तू तर मिळणं कठीण असतं. पण चोरी गेल्याच्या तब्बल 8 वर्षांनंतर दागिने पुन्हा मिळाले तर? तुम्हाला विश्नास नाही बसणार पण आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना चोरीस गेलेले दागिने आठ वर्षानंतर पोलिसांनी मिळवून दिले आहेत. (stolen jewelry recovered after eight years achievement of the police )

दिवा इथं राहणारा संदीप घाग हा तरुण 2012 साली कामानिमित्त कल्याणला आला होता. रेल्वे ट्रॅकवरून चालत जात असताना काही चोरट्याने त्याला हटकले. त्याच्या जवळील असलेल्या दागिने घेऊन चोरटे पसार झाले. पोलिसांनी तपासात संदीपला लुटणारे चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून संदीपचे चोरी गेलेले दागिने हस्तगत केले.

संदीप घाग यांची लॉकडाउनमुळे नोकरी गेली. आई आजारी आहे. घराची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. या परिस्थितीत त्यांच्याकडे काही पैसे नाही. तो आर्थिक विवंचनेत असताना त्याला एक फोन आला. तो फोन कल्याण जीआरपी पोलिसांचा होता.सं दीपला सांगितले तुमचे गेलेले दागिने सापडले आहेत. तुम्ही घेऊन जा. हे ऐकुन संदीपला आश्चर्य वाटले. कारण, या घटनेला आठ वर्ष उलटून गेली आहेत.

मात्र, त्याला पैशांची गरज होती. कल्याण जीआरपीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मीक सार्दुल यांनी लवकरात लवकर संदीपचे दागिने त्यांच्या सुपूर्त केले पाहिजे असी सूचना संबंधित पोलीस अधिकारी रवींद्र आव्हाड यांना केली. आज संदीप घाग आपल्या वडिलांसोबत कल्याण जीआरपी इथं आले.

यावेळी पोलिसांच्या हस्ते त्यांचे 70 हजार रुपये किमतीचे दागिने त्याला परत करण्यात आले. ज्याच्याकडे पैसे नाही त्याच्यासाठी हा मोठा आधार आहे . संदीप घाग यांनी मनापासून पोलिसांचे आभार मानले आहेत.

इतर बातम्या – 

उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमधून चांदीची बंदूक चोरीला, चोरटा गजाआड

घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरीचा डाव, 38 लाखांचा ऐवज लंपास

(stolen jewelry recovered after eight years achievement of the police)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.