छत्तीसगड, महाराष्ट्रातून 100 नक्षलवाद्यांची मध्य प्रदेशात घुसखोरी; अर्धसैनिक दल घेणार झाडाझडती

छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील सुमारे 100 नक्षलवाद्यांनी मध्य प्रदेशात घुसखोरी केली आहे. (100 Naxals sneaked into Madhya Pradesh from Chhattisgarh, Maharashtra)

छत्तीसगड, महाराष्ट्रातून 100 नक्षलवाद्यांची मध्य प्रदेशात घुसखोरी; अर्धसैनिक दल घेणार झाडाझडती
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 4:35 PM

भोपाळ: छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील सुमारे 100 नक्षलवाद्यांनी मध्य प्रदेशात घुसखोरी केली आहे. मध्य प्रदेशात बेस वाढवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून या नक्षलवाद्यांनी ही घुसखोरी केली असून या नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने अर्धसैनिक दलाच्या सहा तुकड्यांची मागणी केंद्राकडे केली आहे. राज्यातील बालाघाट आणि आदिवासी बहुल मंडला जिल्ह्यात हे नक्षलवादी घुसले असण्याची शक्यता असून या ठिकाणी हे अर्धसैनिक दलाचे जवान तैनात करण्यात येणार असल्याचं मध्य प्रदेश पोलिसांनी सांगितलं. (100 Naxals sneaked into Madhya Pradesh from Chhattisgarh, Maharashtra)

गेल्या काही महिन्यांपासून छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातून हे 100 नक्षलवादी मध्य प्रदेशात घुसले आहेत. या भागात आपला जनाधार वाढवावा यासाठी या नक्षलवाद्यांनी ही घुसखोरी केली आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवरून बालाघाट जिल्ह्यात हे नक्षलवादी आले आहेत, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. बालाघाट आणि मंडला जिल्ह्यात नक्षलवाद्यांचे सहा समूह सक्रिय आहेत. गेल्या वर्षी मंडलामध्ये खटिया मोचा दलम आला होता, असंही हा अधिकारी म्हणाला.

अर्धसैनिक दलाच्या सहा तुकड्या तैनात

काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी बालाघाट येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी नक्षल प्रभावित बालाघाट आणि मंडला येथे अर्ध सैनिक दलाच्या सहा तुकड्या तैनात करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. तर, नक्षलवाद्यांना अटकाव करण्यासाठी प्रशिक्षित मध्य प्रदेश पोलिसांची हॉक फोर्स बालाघाटमध्ये यापूर्वीच तैनात करण्यात आली आहे. त्याशिवाय सीआरपीएफची एक तुकडीही बालाघाटमध्ये तैनात असल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.

तीन महिला माओवाद्यांचा एन्काउंटर

नोव्हेंबर आणि डिसेंबर 2020मध्ये बालाघाट जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी नक्षलवाद्यांशी पोलिसांची चकमक उडाली. यावेळी तीन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. मारण्यात आलेल्या महिला नक्षलवाद्यांमध्ये दोघी छत्तीसगडच्या तर एक महिला नक्षलवादी महाराष्ट्रातील रहिवासी होती. तर सप्टेंबरमध्ये एका नक्षलवाद्याला पकडण्यात यश आलं होतं, असंही या पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात राहणारी नक्षलवादी महिला शारदा हिच्यावर आठ लाखाचं बक्षिस होतं. तिच्यावर मध्य प्रदेशाने तीन लाख तर छत्तीसगड पोलिसांनी पाच लाखांचं बक्षिस ठेवलं होतं. गेल्या वर्षी 6 नोव्हेंबर रोजी पोलीस चकमकीत ती मारल्या गेली. बस्तरमधील सावित्री ऊर्फ अयोठे आणि महाष्ट्रातील गडचिरोलीच्या शोभा या नक्षली महिला डिसेंबरमध्ये मारल्या गेल्या होत्या. या दोघींवर प्रत्येकी 14 लाखांचं बक्षिस होतं. (100 Naxals sneaked into Madhya Pradesh from Chhattisgarh, Maharashtra)

संबंधित बातम्या:

भारतीय रेल्वेची खास ‘लाईफलाईन एक्सप्रेस’, प्रत्येक भारतीयाचा अभिमान!

बिहारमध्ये पुन्हा नितीश-लालूंच्या कचाट्यात भाजप? भाजपचे ‘सुमो’ सक्रिय

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा पोलिसांवर मोठा हल्ला, 14 जवान जखमी, 13 बेपत्ता

(100 Naxals sneaked into Madhya Pradesh from Chhattisgarh, Maharashtra)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.