Income Tax: मजुरास दहा हजार रुपये पगार, दोन कोटींची आयकर नोटीस, काय आहे हे प्रकरण

income tax notice: राजीव यांच्या या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सरकारी यंत्रणेचा निष्काळजीपणा समोर आला आहे. एका गरीब व्यक्ती जो आयकर स्लॅबमध्ये येत नाही, त्याला 2 कोटींहून अधिक कराची नोटीस पाठवण्यात आली. आता याप्रकरणी पुढे काय कारवाई होते हे पाहायचे आहे.

Income Tax: मजुरास दहा हजार रुपये पगार, दोन कोटींची आयकर नोटीस, काय आहे हे प्रकरण
Tax Notice
Follow us
| Updated on: Sep 26, 2024 | 4:24 PM

आयकर विवरणपत्र म्हणजेच आयकर रिटर्न दाखल करणारे देशात काही टक्केच लोक आहेत. आयकर विभागाकडून विवरणपत्र दाखल झालेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाते. तसेच ज्या लोकांचे उत्पन्न आयकर मर्यादा असलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे, त्यांचा शोधही घेतला जातो. आयकर विभागाच वेगळाच किस्सा बिहारमधून समोर आला आहे. आयकर विभागाने दहा हजार रुपये महिन्याला म्हणजेच वर्षाला एक लाख 20 हजार रुपये कमवणाऱ्या व्यक्तीला नोटीस पाठवली आहे. ही नोटीस तब्बल 2 कोटी 3 हजार 308 रुपयांचा कर भरण्याची आहे. एका तेल व्यापाऱ्याकडे नोकरी करणाऱ्या राजीव कुमार वर्मा यांना ही नोटीस आली आहे. हे प्रकरण बिहारमधील गया जिल्ह्यातील आहे.

काय आहे नोटीसमध्ये

आयकर विभागाने राजीव कुमार वर्मा यांना 2 कोटी 3 हजार 308 रुपये कर भरण्याची नोटीस पाठवली आहे. या नोटीसीनुसार त्यांना 67 लाख रुपये दंडही केला आहे. ही सर्व रक्कम दोन दिवसांत भरण्याचे म्हटले आहे. आयकर विभागाची ही नोटीस मिळाल्यावर राजीव हे प्रचंड घाबरले. ते गेल्या चार दिवसांपासून कामावरसुद्धा जात नाही. शेवटी ते गया येथील आयकर विभागाच्या कार्यालयात गेले. त्यावेळी त्यांना पटना येथे जाण्याचे सांगण्यात आले.

नेमके काय आहे प्रकरण?

2015 मध्ये राजीव यांनी कॉर्पोरेशन बँकेत 2 लाख रुपयांची मुदत ठेव (FD) केली होती. त्यांना पैशांची गरज असल्यामुळे 2016 मध्ये ती मुदत ठेवची पावती त्यांनी तोडली. परंतु अचानक आयकर विभागाने त्या प्रकरणात त्यांना 2 कोटी 3 हजार 308 रुपये आयकरची नोटीस पाठवली. आयकर विभागाचा आरोप आहे की, राजीव यांनी 2015-16 मध्ये 2 कोटी रुपयांची मुदत ठेव केली होती. त्याचा कर अद्याप भरला नाही.

हे सुद्धा वाचा

राजीव यांच्या या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सरकारी यंत्रणेचा निष्काळजीपणा समोर आला आहे. एका गरीब व्यक्ती जो आयकर स्लॅबमध्ये येत नाही, त्याला 2 कोटींहून अधिक कराची नोटीस पाठवण्यात आली. आता याप्रकरणी पुढे काय कारवाई होते हे पाहायचे आहे.

बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन.
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?.
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन.
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले.
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु.
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट.
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत.
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा.
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?.
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी.