दहावी पास युवक बनला IPS, गणवेश घालून गावात गेला, बाईकवर फिरला, मग…
आयपीएस गणवेश घालून गुरुवारी बाईकवर फिरणे मिथिलेशला महागात पडले. पोलिसांपर्यंत त्याची माहिती गेली. त्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी त्याला पकडले. मग त्याने दोन लाख रुपये देऊन नोकरी देणाऱ्या मनोज सिंहचे नाव पोलिसांना सांगितले.
बिहारमधील दहावी पास युवक आयपीएसचा गणवेश घालून गावात फिरु लागला. घरी जाऊन आईला आपण पोलीस अधिकारी झाल्याचे सांगितले. विट्यांच्या भट्टीवर मजुरी करणाऱ्या आईला मुलगा पोलीस अधिकारी झाल्यानंतर आनंदाला पारावर राहिला नाही. मग हा बनावट आयपीएस महागड्या बाईकवर गावात फिरु लागला. त्याची माहिती पोलिसांपर्यंत गेली. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. मग दहावी पास युवक दोन लाख रुपये देऊन आयपीएस झाल्याचे समोर आले. त्याला दोन लाख रुपयांत आयपीएसचा गणवेश देणाऱ्या व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली आहे.
IPS गणवेश घालून बाईकवर फिरला
बिहारमधील सिंकदरा जिल्ह्यात बनावट आयपीएसचा प्रकार उघड झाला आहे. केवळ दहावी पास असलेला मिथिलेश कुमार हा युवक 2 लाख रुपये देऊन बनावट IPS अधिकारी बनला. गावात जाऊन आईला आपण पोलीस अधिकारी झाल्याचे सांगितले. भोळ्या आईला मुलाला पोलीस अधिकारीच्या गणवेशात पाहून आनंद झाला. IPS गणवेश घालून बाईकवर तो फिरु लागला. परंतु पोलिसांपर्यंत माहिती गेल्यानंतर दोन दिवसांत त्याचा गणवेश उतरवेला गेला. मिथिलेश ज्या महागड्या पल्सर दुचाकीवर फिरत होता, ती त्याला हुंडा म्हणून मिळाली होती. पोलिसांनी पकडल्यानंतर मिथिलेशने सांगितले की, खैरा येथील मनोज सिंह याने आयपीएसची नोकरी देण्यासाठी त्याच्याकडून दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर पोलिसांचा गणवेश परिधान करुन पाठवले.
मामांकडून घेतले दोन लाख
मिथिलेशने आयपीएस होण्यासाठी मामांकडून 2 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर त्याने हे पैसे मनोज सिंह याला दिले. मनोज सिंह याने त्याला आयपीएसचा गणवेश आणि लायटर असलेली बंदूक दिली. तो गणवेश परिधान करुन मिथिलेश गावात आला. त्यानंतर दहावी पास मिथिलेश आयपीएस कसा झाला? हा प्रश्न गावकऱ्यांनाही पडला. परंतु त्याला पोलीस अधिकाऱ्याची नोकरी मिळाल्यामुळे गावकरी आनंदात होते.
असा पकडला गेला…
आयपीएस गणवेश घालून गुरुवारी बाईकवर फिरणे मिथिलेशला महागात पडले. पोलिसांपर्यंत त्याची माहिती गेली. त्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी त्याला पकडले. मग त्याने दोन लाख रुपये देऊन नोकरी देणाऱ्या मनोज सिंहचे नाव पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मनोज सिंह याला पकडले. या प्रकरणी मनोज सिंह आणि मिथिलेश कुमार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.