धक्कादायक ! 11 वर्षाच्या मुलाकडून वडिलांचा ईमेल आयडी हॅक, 10 कोटींची खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी

एका अकरा वर्षाच्या मुलाने आपल्याच वडिलांचा ईमेल आयडी हॅक करत 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे (11 year old boy demand rupees 10 crore extortion from his Father)

धक्कादायक ! 11 वर्षाच्या मुलाकडून वडिलांचा ईमेल आयडी हॅक, 10 कोटींची खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 2:52 PM

लखनऊ : सायबर क्राईम ही समस्या दिवसेंदिवस जास्त गंभीर होताना दिसत आहे. अनेकांना या माध्यमातून लुबाडलं जात आहे. मात्र, उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका अकरा वर्षाच्या मुलाने आपल्याच वडिलांचा ईमेल आयडी हॅक करत 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे इयत्ता पाचवीत शिकणारा हा मुलगा युट्यूबवर हॅकिंग शिकला. त्यानंतर त्याने आपल्याच वडिलांचा ईमेल आयडी हॅक केला. पोलिसांनी तपास केला असता धमकीचा मेल हा पीडित वडिलाच्या घराच्या आयपी अ‍ॅड्रेसवरुन पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली. या सर्व प्रकाराची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत (11 year old boy demand rupees 10 crore extortion from his Father).

गेल्या आठवड्यात गाझियाबादच्या वसुंदरा कॉलनीत राहणाऱ्या एका व्यक्तीला अचानक धमकीचा फोन आला. या मेलमध्ये 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. यासोबतच 10 कोटी रुपये नाही दिले तर तुमचे अश्लील फोटो सार्वजनिक करु, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला जीवे मारु, अशी धमकी देण्यात आली. त्याचबरोबर संबंधित मेल एका हॅकर्स ग्रुपकडून पाठवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता (11 year old boy demand rupees 10 crore extortion from his Father).

हॅकर्सचा ईमेल पाहून संबंधित व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय हैराण झाले. त्यांनी भरपूर विचार केला. पोलिसांना याबाबत माहिती द्यावी की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला. पण अखेर संबंधित व्यक्तीने तातडीने पोलीस ठाणे गाठत सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्या व्यक्तीने आपल्याला आलेला ईमेल पोलिसांना दाखवला. पोलिसांनी सर्व ईमेल सविस्तर वाचला. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली.

सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर ईमेल कोणत्या आयपी अ‍ॅड्रेसहून पाठवण्यात आलाय याचा तपास केला. या तपासात पोलिसांच्या हाती जी माहिती लागली त्याने त्यांनाच मोठा धक्का बसला. कारण ईमेल आयडीचा आयपी अ‍ॅड्रेस हा तक्रादार व्यक्तीच्या घरच्याच आयपी अ‍ॅड्रेसवर पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तपासाचं एक पाऊल पुढे टाकत तक्रारदार व्यक्तीच्या घरच्यांची चौकशी केली.

पोलिसांनी तक्रारदार व्यक्तीच्या 11 वर्षीय मुलाची चौकशी केली असता त्या मुलाने आपला गुन्हा कबूल केला. याशिवाय यूट्यूबवर आपण हॅकिंग शिकल्याची कबुली त्याने पोलिसांसमोर दिली. या मुलाला काही दिवसांपूर्वी कम्प्युटर क्लासदरम्यान सायबर क्राईम म्हणजे काय? त्यापासून कसं वाचावं हे शिकवण्यात आलं होतं. मात्र, तरीही मुलगा आपल्या वडिलांसोबत अशाप्रकारे का वागला? याचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

मॉडेलिंगचे अमिष दाखवून 14 वर्षीय मुलगी वेश्या व्यवसायात आणल्याचा आरोप, इव्हेंट मॅनेजरसह 2 कास्टिंग डायरेक्टरला अटक

छेडछाडीतून तरुणाचा खून, पाच वर्षांनंतर पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.